AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी…

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बारामती तालुक्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले.

Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी...
अजित पवार
| Updated on: Feb 10, 2026 | 12:27 PM
Share

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावत कसून प्रयत्न केले होते.अनेकांनी सभा घेत प्रचार केला. या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत अनेकांचं लक्ष लागलं होतं ते बारामती तालुक्याकडे. तिथे काय निकाल लागतो हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते. तेथील सहा गटांतील सर्व जागा या दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटाला मिळाल्या आहेत. 4 जागांवर भाजपचे उमेदवार होते, मात्र त्यांना मोठ्या पराभवाचा फटका बसला. पंचायत समितीच्या १२ पैकी २ जागा राष्ट्रवादीने भाजपसाठी सोडल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीत राष्ट्रवादीला 12 पैकी 10 जागांवर तर व भाजपला दोन जागांवर विजय मिळाला.

4 सभांपूर्वी अजित पवारांचं झालं निधन

28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झालं. जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीला जात होते. मात्र बारातमी जवळ आल्यावर लँडिगच्या दरम्यान त्यांचं विमान कोसळून मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्या दिवशी त्यांच्या बारामती तालुक्यातील 4 ठिकाणी सभा होणार होत्या. सकाळी 10 वाजता निरावागज येथे तर दुपारी 12 वाजता, पणदरे येथे त्यांची सभा होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता अजित दादांची करंजेपूल येथे सभा होणार होती आणि संध्याकाळी 5.30 वाजता ते सुपा येथील सभेत नागरिकांना संबोधित करणार होते. मात्र या सभासाठी बारामतील यायला निघाले असतानाच विमानाच अपघात झाला आणि त्याचं निधन झालं.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या, अजित दादांच्या सभा होत्या तिथेही निवडणूक होऊन मतदान झालं. व काल मतमोजणी होऊन निकाल लागला. मात्र तिथे कोण विजयी ठरलं, काय निकाल लागला हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

काय लागला निकाल ?

जिल्हा परिषद गटनिहाय निकाल :

सुपा गटामध्ये राष्ट्रवादीच्या पल्लवी प्रमोद खेत्रे ह्या 14 हजार 553 मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना 18,095 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार मोहिनी गणेश खैरे यांना 3 हाजर 52 मतं मिळाली. भाजपच्या वंदना विशाल कोकरे या तिसऱ्या स्थानी होत्या.

तर पणदरे गटातून राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगताप हे 17 हजार 536 मतांनी विजयी झाले. जगताप यांना 20 हजार 800 मतं मिळाली, मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले, भाजपचे सुरज अरविंद जगताप यांना3 हजार 264 मतं पडली.

निरावागज गटातून राष्ट्रवादीच्या शिवानी अभिजित देवकाते ह्या 20 , 544 मतांनी विजयी झाल्या. देवकाते यांना 21, 613 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार रोहित राजू भोसले हे त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत झाले, त्यांना 1 हजार 069 मतं पडली.

तर करंजेपूल गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेनका नवनाथ मगर या उमेदवार विजयी झाल्या. त्यांना एकूण 8 हजार 789 मतं मिळाली.  त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या उज्वलादिलीप सोराटे या पराभीत झाल्या, त्यांना 4 हजार 783 मतं मिळाली.

पंचायत समितीतही राष्ट्रवादीचा डंका

बारामती पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 10 जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. तर 2 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. पंचायत समिती गणनिहाय निकालात सुपा गणातून भाजपच्या उज्ज्वला पोपट खैरे ह्या 2,669 मतांनी विजयी झाल्या. खैरे यांना 7466 मतं, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या अपक्ष उमेदवार मनीषा हनुमंत चांदगुडे यांना 4797 मतं मिळाली.

पणदरे गणातून राष्ट्रवादीचे किरण रावसाहेब तावरे हे 6270 मतांनी विजयी झाले. तावरे यांना 8515 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मच्छिंद्र मनोहर तावरे यांना 2245 मतं मिळाली.

निरावागज गणातून राष्ट्रवादीचे नितीन अरुण काकडे हे 10, 490 मतांनी विजयी झाले. त्यांना 10, 985 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राज भरत कांबळे यांना फक्त 495 मते मिळाली.

करंजेपूल गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमोद भगवानराव काकडे विजयी झाले. त्यांना एकूण 18 हजार 089 मतं मिळाली.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.