AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांवर मफलरमॅनचा आरोप, आता वादात सत्यजीत तांबेंची उडी, भलीमोठी पोस्ट चर्चेत

रोहित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांवर मफलरमॅनचा गंभीर आरोप केला. आता या वादावर सत्यजीत तांबेंनी भाष्य केलं आहे. त्यांची भलीमोठी पोस्ट चर्चेत आली आहे.

रोहित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांवर मफलरमॅनचा आरोप, आता वादात सत्यजीत तांबेंची उडी, भलीमोठी पोस्ट चर्चेत
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 9:24 AM
Share

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार अपघात प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांना वाचवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. आता या वादात आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली आहे.  अजितदादा यांच्या विमान अपघाताशी कोणताही आधार नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाव जोडणे, हा गंभीर प्रकार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. सत्यजीत तांबे यांनी या वादात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 सत्यजीत तांबे यांची पोस्ट जशीच्या तशी 

सत्यजीत तांबे म्हणाले, ‘आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं’.

‘रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही. शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, असे तांबे म्हणाले.

‘म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं, असेही तांबे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान