AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500, सरकारने…

लाडकी बहीण योजना राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बहिणींसाठी आणली. या योजनेचा थेट फायदा सरकारला निवडणुकीत झाला. आता लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500, सरकारने...
ladki bahin yojana
| Updated on: Feb 03, 2026 | 12:21 PM
Share

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यात 1500 रूपये मदत मिळते. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा थेट असा झाला की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सातत्याने सांगण्यात आले. इतर विभागाचा निधी वळवण्यात आल्याचीही चर्चा रंगताना दिसली. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिला थेट रस्त्यावर उतरतानाही दिसल्या. केवायसी न झाल्याने अनेकांचे हप्ते थांबले. पण काही महिलांनी ई केवायसी करूनही त्यांचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. महिला बालकल्याण विभागाने अशा महिलांची घरी जाऊन चाैकशी करण्याचे आदेश दिले. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही नियम आणि अटही लागू करण्यात आल्या. मात्र, महिलांनी नियम बाजूला सारून अर्ज केली होती, आता त्याची पडताळणी केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्याने काही महिलांमध्ये नाराजी बघायला मिळाली. आता लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची तितकेड आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता थेट 4500 रूपये मिळणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत.

नुकताच लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना हसन मुश्रीफांनी म्हटले की, आधी तिजोरीची चाबी आमच्याकडे होती. अजित दादा गेल्यानंतर ते खाते मुख्यमंत्र्यांकडे गेले. अधिवेशन झाल्यावर ते खाते आमच्याकडे पुन्हा येणार आणि आम्ही तुम्हाला 2100 रूपये दिल्याशिवाय राहणार नसल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

यामुळे भविष्यात लाडक्या बहिणींनी 2100 रूपये प्रतिमहिन्याला हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 हून 2100 मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्यामध्येच आता थेट तीन महिन्यांचा राहिलेला हप्ता लाडक्या बहिणींना एकदमच मिळणार आहे. काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे तर अनेक महिलांचा तीन महिन्यांचा हप्ता राहिल्याचे सांगितले जात आहे तो एकदमच मिळणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी