AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 4500 कधी मिळणार? शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खातं होणार फुल!

Ladki Bahin Yojana : पटापट खर्चाची यादी तयार करा! लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 4500 कधी मिळणार? शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खातं होणार फुल!
Ladki Bahin YojnaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 04, 2026 | 4:04 PM
Share

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते थकले होते. यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती, काही ठिकाणी आंदोलनेही झाली होती. आता हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळणार 4500 रुपये

महिला व बालविकास विभागाने या समस्येची दखल घेतली असून, ई-केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू केली आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा थकित हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदम ४,५०० रुपये (१,५०० × ३) जमा होणार आहेत. अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच फेब्रुवारी महिन्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल

-ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये मिळतील.

-ज्या महिलांना आधीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाईल.

कुठे चेक करावे?

ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या अपडेटनुसार आहे. ई-केवायसी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे जमा होतील. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (ladakibahin.maharashtra.gov.in) स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि त्याचा मोठा राजकीय फायदा महायुती सरकारला मिळाल्याचे दिसून आले. सध्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना या महिन्यात एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ