AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojna : लाडकी बहिणीचा हफ्ता बंद झाल्यास काय करावं? ई-केवायसीतील चूक कशी दुरुस्त करावी? पुन्हा मिळू शकतो लाभ

Ladki Bahin Yojna : ई-केवायसी करताना चूक झाल्याने अनेक लाडक्या बहिणींचा हफ्ता बंद झाला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही चूक दुरुस्त कशी करावी, याबद्दलची माहिती दिली आहे. यासंदर्भात प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojna : लाडकी बहिणीचा हफ्ता बंद झाल्यास काय करावं? ई-केवायसीतील चूक कशी दुरुस्त करावी? पुन्हा मिळू शकतो लाभ
ladki bahin ekycImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2026 | 12:11 PM
Share

Ladki Bahin Yojna : ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हफ्ता बंद झाल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. याविषयी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया करताना अनेकांकडून चुकीची माहिती भरली गेली, त्यामुळे काहींचे हफ्ते बंद झाले होते. ही चूक दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित विभागाला तातडीने दिल्या आहेत,” असं ते म्हणाले. त्याचसोबत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळालेला नाही, त्यांना तो लवकरच मिळेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.

काय म्हणाले पंकज भोयर?

“माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी लाडकी बहीण योजना या राज्यातल्या आमच्या महिला भगिनींकरता सुरू केली, त्यातल्या काहींचे पैसे ई केवायसी केल्यानंतर प्रलंबित आहेत. त्या संदर्भात तातडीने प्रशासनाची बैठक बोलविण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा अंगणवाडी सुपरवायझर यांच्या माध्यमातून ज्या ज्या आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्याची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मला असं वाटतं की ईकेवायसी करताना काही माहिती चुकीची भरण्यात आली, त्यामुळे हे पैसे खात्यात जमा होणं बंद झालं असेल. तर या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत,” असं भोयर यांनी सांगितलं.

याविषयी ते पुढे म्हणाले, “लाडक्या बहिणींच्या थकलेल्या हफ्त्यांसंदर्भात तातडीने संबंधित विभागासोबत बैठक घेतली. ई-केवायसीतील चूक दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. लाडक्या बहिणींनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी सेविकांजवळ किंवा शहरातल्या लाडक्या बहिणींनी आपल्या भागातल्या अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स, संपर्क क्रमांक द्यायचा आहे. पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून लाडक्या बहिणींचा हफ्ता पुन्हा सुरू करण्यात यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”

लाडक्या बहिणींचा हफ्ता रखडल्यानंतर अनेकांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयासमोर गर्दी केली होती, काहींनी तर ठिय्याच मांडला होता. अखेर याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ई-केवायसी भरताना चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा व्हेरिफिकेशन करून त्यांना पूर्ववत लाभ देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या निर्णयामुळे अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

ई-केवायसी भरताना चूक झाल्यास काय करावं?

  • लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स आणि संपर्क क्रमांक जमा करावा.
  • त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडून त्याची पडताळणी केली जाईल.
  • पडताळणीनंतर लाडक्या बहिणींचा लाभ पूर्ववत होईल.

भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.