AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई-विरारचा महापौर कधी निवडला जाणार? तारीख ठरली; 6 दिग्गज मैदानात, कोणाची वर्णी लागणार?

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून आजीव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. हितेंद्र ठाकूर कोणाच्या नावाची घोषणा करणार? जाणून घ्या सविस्तर.

वसई-विरारचा महापौर कधी निवडला जाणार? तारीख ठरली; 6 दिग्गज मैदानात, कोणाची वर्णी लागणार?
vasai virar municipal corporation
| Updated on: Jan 23, 2026 | 12:17 PM
Share

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० किंवा ३१ जानेवारीला महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या संमिश्र अनुभवानंतर, महापालिकेत आपली पकड मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यावेळी अत्यंत सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

वसई विरार महानगरपालिकेत सध्या महापौर पदाच्या शर्यतीत सहा नावे चर्चेत आहेत. तरी पक्षाचे संकटमोचक आणि रणनीतीकार आजीव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे. वसई-विरारच्या राजकारणात सर्व जाती-धर्मांना न्याय देण्यासाठी हितेंद्र ठाकूर नेहमीच सोशल इंजिनिअरिंगचा वापर करतात. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर, आता महापालिकेत सत्ता टिकवताना सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचे मोठे आव्हान ठाकूर यांच्यासमोर आहे. त्यामुळेच, ठाकुरांच्या मनात नक्की कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापौर पदासाठी चर्चेतील सहा चेहरे

  • आजीव पाटील: माजी स्थायी समिती सभापती आणि पक्षाचे रणनीतीकार. भाजपला रोखण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो
  • प्रवीण शेट्टी: माजी महापौर, दांडगा अनुभव असलेला चेहरा
  • प्रकाश रॉड्रीग्ज: माजी उपमहापौर आणि ख्रिश्चन बहुल पट्ट्यातील महत्त्वाचे नेतृत्व
  • कन्हैया बेटा भोईर: स्थानिक आगरी समाजाचे प्रतिनिधित्व
  • आलमगीर डायर: मुस्लिम समाजातून अनुभवी नेतृत्व
  • आफिफ जमील शेख: तरुण आणि नवा चेहरा म्हणून चर्चेत

आजीव पाटील यांचे नाव का चर्चेत?

नुकत्याच महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत, महापालिकेत आक्रमक झालेल्या भाजपाला रोखण्यासाठी आजीव पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक प्रवक्त्याची गरज पक्षाला भासत आहे. पाटील हे पक्षाचे संघटक सचिव असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे बोललं जात आहे.

दरम्यान २२ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेच्या महापौर पदासाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार वसई-विरार महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) साठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे आता बविआतील कोणत्याही गटातील अनुभवी नगरसेवकाला महापौर होण्याची संधी मिळू शकते. बविआ नेहमीच ख्रिश्चन, मुस्लिम, आगरी आणि उत्तर भारतीय अशा सर्व समाजांना प्रतिनिधित्व देते. जर आजीव पाटील यांना महापौर केले, तर उपमहापौर पदासाठी प्रकाश रॉड्रीग्ज (ख्रिश्चन) किंवा आलमगीर डायर (मुस्लिम) यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. जेणेकरून सोशल इंजिनिअरिंगचा समतोल राखला जाईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?