वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2026
वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई-विरार या वेगाने वाढणाऱ्या शहराचा कारभार पाहणारी महानगरपालिका आहे. 3 जुलै 2009 साली या महानगरपालिकेची स्थापना झाली असून त्यात 4 नगरपरिषदा व 53 गावं समाविष्ट आहेत. या महानगरपालिकेचे मुख्यालय विरारमध्ये असून, ती पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि ई-गव्हर्नन्सवर लक्ष केंद्रित करते. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारील निकाल लागेल. या महापालिका क्षेत्रात 29 प्रभाग येतात. 28 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक यावेळी निवडून द्यायचे आहेत. तर 29 व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा एकूण 115 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : दिघेंच्या ठाण्यात ‘भाई’च की ‘ठाकरे’? सत्तेचा ‘ठाणे’दार कोण? झटपट निकाल थोड्याच वेळात…
Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरारसह एमएमआर क्षेत्रातील 8 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि कोण बाजी मारणार? पहा लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर.
- Namrata Patil
- Updated on: Jan 16, 2026
- 8:31 am