AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : दिघेंच्या ठाण्यात ‘भाई’च की ‘ठाकरे’? सत्तेचा ‘ठाणे’दार कोण? झटपट निकाल थोड्याच वेळात…

| Updated on: Jan 16, 2026 | 7:48 AM
Share

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरारसह एमएमआर क्षेत्रातील 8 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि कोण बाजी मारणार? पहा लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर.

TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : दिघेंच्या ठाण्यात 'भाई'च की 'ठाकरे'? सत्तेचा 'ठाणे'दार कोण? झटपट निकाल थोड्याच वेळात...
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2026 07:45 AM (IST)

    KDMC Election Results 2026 LIVE: कल्याण-डोंबिवलीचा कौल कोणाला? १०२ प्रभागांसाठी आज मतमोजणी

    कल्याण-डोंबिवलीत मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या १०२ प्रभागांसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासूनच कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठ केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून, थोड्याच वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

  • 16 Jan 2026 07:42 AM (IST)

    Thane Municipal Election Results 2026 : ठाणे महापालिकांची प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी समोर

    ठाणे महापालिकांची प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

    प्रभाग समिती प्रभाग क्रमांक मतदानाची टक्केवारी (%)
    माजिवडा १, २, ३, ८ ५४.७५%
    वर्तकनगर ४, ५, ७ ५४.८६%
    लोकमान्य सावरकरनगर ६, १३, १४, १५ ५८.०९%
    वागळे १६, १७, १८ ५५.५३%
    नौपाडा कोपरी १९, २०, २१, २२ ५९.७९%
    उथळसर १०, ११, १२ ६०.६०%
    कळवा ९, २३, २४, २५ ५४.२९%
    मुंब्रा २६, ३१ ४७.५९%
    मुंब्रा ३०, ३२ ४९.१५%
    दिवा २७, २८ ५७.३७%
    दिवा २९, ३३ ५६.४५%
  • 16 Jan 2026 07:35 AM (IST)

    Thane Municipal Corporation Election Results 2026 : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 55.59 टक्के मतदान

    ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

  • 16 Jan 2026 07:27 AM (IST)

    Vasai Virar Election Results 2026 : वसई-विरारमध्ये महायुतीचे तगडे आव्हान

    हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा (BVA) गड समजल्या जाणाऱ्या वसई-विरारमध्ये महायुतीने यावेळी तगडे आव्हान दिले आहे. बहुजन विकास आघाडी आपला बालेकिल्ला राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 16 Jan 2026 07:22 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईचा एक्झिट पोल काय?

    मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच एक्झिट पोलच्या आकड्यांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतेक एक्झिट पोलनुसार (Axis My India आणि JVC), ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत महायुतीला (भाजप + शिवसेना – एकनाथ शिंदे) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

  • 16 Jan 2026 07:12 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

  • 16 Jan 2026 07:04 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : मतमोजणीची जय्यत तयारी सुरु

    ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

  • 16 Jan 2026 06:57 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, कल्याण, नवी मुंबईत बहुमतासाठी किती जागांची गरज?

    ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे पक्षीय बलाबल आणि बहुमताचे आकडे. कोणत्या पक्षाला किती जागांची गरज?

    महानगरपालिका एकूण जागा बहुमताचा आकडा विशेष टिप्पणी
    ठाणे (TMC) १३१ ६६ ४ जागांवर महायुती आधीच बिनविरोध
    कल्याण-डोंबिवली (KDMC) १२२ ६२ २० जागांवर महायुती बिनविरोध (भाजप १४, शिवसेना ६)
    नवी मुंबई (NMMC) १२२ ६२ गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला
    पनवेल (PMC) ७८ ४० भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
    मिरा-भाईंदर (MBMC) ९५ ४८ महायुती आणि अपक्षांमध्ये मोठी चुरस
    उल्हासनगर (UMC) ७८ ४० स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक
  • 16 Jan 2026 06:46 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू

    ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील ८ महापालिकांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू असणार आहे. सीसीटीव्ही आणि निमलष्करी दलाच्या देखरेखीखाली मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे.

  • 16 Jan 2026 06:41 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : कडेकोट पोलीस बंदोबस्तात स्ट्राँग रूम उघडल्या जाणार

    ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील मतमोजणी केंद्रांवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आगमन सुरु झाले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात काही वेळातच स्ट्राँग रूम उघडल्या जाणार आहेत.

  • 16 Jan 2026 06:36 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

    आज राज्याच्या २९ महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे तर नवी मुंबईत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल.

  • 16 Jan 2026 06:31 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : निकालाआधीच गुलालाची उधळण, राज्यात ६६ उमेदवार बिनविरोध विजयी

    मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार किंग ठरले आहेत. कल्याण-डोंबिवली (KDMC) मध्ये तब्बल २० जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे १४ आणि शिंदे गटाच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातही ४ जागांवर महायुतीने मतदानाआधीच खाते उघडले आहे.

  • 16 Jan 2026 06:26 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : मतदानाची टक्केवारी जाहीर

    काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

    • ठाणे : 43.96
    • कल्याण डोंबिवली : 38.69
    • नवी मुंबई- 45.51
    • उल्हासनगर : 34.88
    • भिवंडी निझामपूर – 38.21
    • मिरा भाईंदर : 38.34
    • वसई विरार : 45.75
    • पनवेल : 44.04
  • 16 Jan 2026 06:22 AM (IST)

    KDMC Mahapalika Election Results : कल्याण-डोंबिवलीत कोणाचे पारडे जड?

    KDMC Mahapalika Election Results : KDMC २०१५ निकाल : शिवसेना-भाजप युतीची सत्ता; कल्याण-डोंबिवलीत गेल्या वेळी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?

    • शिवसेना: ५२
    • भाजप: ४२
    • मनसे: ०९
    • काँग्रेस: ०४
    • राष्ट्रवादी: ०२
    • इतर: १३
  • 16 Jan 2026 06:18 AM (IST)

    Thane Election Results 2026 : ठाणे महानगरपालिका 2017 मध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता

    ठाणे महानगरपालिका २०१७ चे चित्र: शिवसेनेचा बालेकिल्ला! २०१७ च्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. तेव्हाचे पक्षनिहाय बलाबल

    • शिवसेना: ६७
    • राष्ट्रवादी (NCP): ३४
    • भाजप: २३
    • काँग्रेस: ०३
    • इतर/अपक्ष: ०४
  • 16 Jan 2026 06:12 AM (IST)

    NMMC Election Results 2026 LIVE : नवी मुंबईत २०१५ मध्ये कोणाचे वर्चस्व होते?

    NMMC Election Results 2026 LIVE : नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बाजी मारली होती

    • राष्ट्रवादी (NCP): ५२
    • शिवसेना: ३८
    • काँग्रेस: १०
    • भाजप: ०६
    • अपक्ष: ०५
  • 16 Jan 2026 06:07 AM (IST)

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, नवी मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील निकालांचा फैसला आज, तयारी पूर्ण

    Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदर या महत्त्वाच्या महापालिकांच्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतरचा हा पहिलाच मोठा स्थानिक निकाल असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

  • 16 Jan 2026 06:03 AM (IST)

    Thane, NMMC, KDMC LIVE Updates : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा निकालाचे Live Updates

    Thane, NMMC, KDMC LIVE Updates : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. महायुती आपला गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर सामना रंगला आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या रिंगणात महायुती बाजी मारणार का आणि वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व मोडीत निघणार का, याचा फैसला आता काही क्षणांतच होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत मतदारांनी कुणाला कौल दिला आहे. त्यासोबतच कोणता बालेकिल्ला शाबूत राहणार आणि कुठे उलथापालथ होणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या महापालिकांचे प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि दिग्गज नेत्यांच्या भविष्याचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या या लाईव्ह ब्लॉगला रिफ्रेश करत राहा.

Published On - Jan 16,2026 6:01 AM

Follow us
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.