कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2026
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ही एक महत्त्वाची महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1983 झाली. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ही महानगरपालिका आहे. या महापालिकेत डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी ही ठिकाणं येतात. या महानगरपालिकेत मोठी लोकसंख्या आणि शहरी मतदारसंघ असल्यामुळे ठाणे जिल्हा व एमएमआर भागातील राजकारणात अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. केडीएमसीच्या निवडणुकीत एकूण 122 नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत. केडीएमसीत यंदा पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. 2015 च्या निवडणुकीनुसार 122 नगरसेवकांची संख्या आहे. त्यानुसार 31 पॅनल तयार करण्यात आले. 31 पैकी 29 पॅनल हे चार सदस्यीय आहे, तर दोन पॅनल हे तीन सदस्यांचे आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मागील वेळी शिवसेना हाच मोठा पक्ष होता.
मोठी बातमी! महायुतीत उभी फुट? मागण्या मान्य झाल्या तरच….भाजपाच्या टोकाच्या भूमिकेमुळे अघटित घडणार?
भाजपाने शिंदे गटाकडे मोठी मागणी केली आहे. आमची मागणी मान्य केली तरच युती होईल, अन्यथा युती होणार नाही, अशी थेट भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 25, 2025
- 6:32 pm