Sanjay Raut on Ajit Pawar Plane Crash | अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. अजित पवार यांच्या अपघातामागे 100 टक्के घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. अजित पवार यांच्या अपघातामागे 100 टक्के घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवार यांनी आपल्या दाव्यांना आधार देताना काही छायाचित्रे सादर केली तसेच विमान उड्डाणाशी संबंधित काही तांत्रिक बाबींचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याचाही संदर्भ देत संशय व्यक्त केला. मात्र, त्या नेत्याचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “पूर्व विदर्भातील ते नेते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे? त्यांचे नाव सांगण्यात काहीच हरकत नाही,” असे राऊत म्हणाले. तसेच, “जर त्या नेत्याने अजित पवारांची मुद्दाम उशिरा भेट घेतली असेल आणि कारने जाण्याचा प्लॅन रद्द करायला लावला असेल, तर त्या नेत्याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “अशी कोणती फाईल होती की त्या दिवशी सही झाली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. याशिवाय, “अजित पवारांकडे असलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते नेते आले होते का?” असा संशय व्यक्त करत राऊत यांनी या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी करण्याची गरज अधोरेखित केली. दरम्यान, या सर्व आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 11, 2026 11:34 AM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत

