AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar on Ajit Pawar Death : अजितदादांचा घातपात? पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका? रोहित पवार यांनी काय म्हटलं?

अजित पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवारांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे. पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही अपघाताविषयी प्रश्नचिन्ह असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. या प्रकरणी अमित शहांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी कुटुंबीयांची भूमिका आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Death : अजितदादांचा घातपात? पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका? रोहित पवार यांनी काय म्हटलं?
अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका ?
| Updated on: Feb 11, 2026 | 2:32 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षातूनही या शंका व्यक्त केल्या जात असून आता अजितदादांच्या कुटुंबीयांकडूनही या शंका व्यक्त गेल्या आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजितदादांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली. आजही रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हीच शंका बोलून दाखवली आहे. तसेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही तेच असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सादरीकरण करत अजित पवार यांच्या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पार्थला मी भेटलो. त्याच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच अमोल मिटकरी, रुपाली पाटील वगैरे राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्या सांगण्यावरूनच ते भेटले असावे. पार्थ आणि जयच्या मनात अपघाताविषयी शंका आहे. शंका नसती तर त्यांच्या पक्षाचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले नसते. अपघात का झाला? कसा झाला? याची माहिती आम्हाला हवी आहे. त्यासाठी आम्ही हे करत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

अमित शाह यांना भेटणार

सुप्रिया सुळे यांनी आज अमित शाह यांची भेटीची वेळ मागितली आहे. माझ्या वतीने त्यांनी ही वेळ मागितली आहे. आमचा कोणत्याही पक्ष किंवा सरकारवर आरोप नाही. पण या घटनेची चौकशी झाली पाहिजे. अमित शाह यांना भेटून आम्ही त्यांना तशी मागणी करणार आहोत. यात घातपात आहे, असं आमचं म्हणणं आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

त्या दिशेने तपास व्हावा

थायलंडमध्ये एका पायलटने जाणूनबूजून विमान पाडलं होतं. का पाडलं होतं? त्याची चौकशी झाली. त्या अपघाताची माहिती समोर आली. ही माहिती कशी बाहेर आली? त्या चौकशी एजन्सी कोणत्या होत्या? हे पाहून, त्याची माहिती घेऊन त्या दिशेनेही तपास केला पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.

काही प्रश्न…

यावेळी रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोर्टात जायचं नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सी चांगली चौकशी करतील. बाहेरच्या एजन्सीलाही चौकशीत घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...