AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेताना राहुल गांधी खाली पडले आणि त्यांना उचलण्यासाठी पोलिसांना धडपड करावी लागली, असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसने या घटनेवरून मोदी सरकारवर हुकूमशाहीची टीका केली आहे.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
rahul gandhi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 7:40 PM
Share

देशातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे प्रचंड गर्दी जमली होती. वातावरण तापलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. राहुल गांधी यांनाही ताब्यात घेतलं. राहुल गांधी यांना ताब्यात घेताना प्रचंड गोंधळ झाला. राहुल गांधी खाली पडले. त्यांना उचलण्यासाठी पोलीस धडपड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर तीन ते चार तासापासून राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच त्यांनी ट्विट करून देशातील नागरिकांना या ठिय्या आंदोलनात येण्याचं आवाहन केलं. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांची धरपकड केली. राहुल गांधी यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. यावेळी राहुल गांधी यांनी नकार दिला. राहुल गांधी जमिनीवर झोपले. त्यामुळे त्यांना उचलण्यासाठी पोलीस धडपड करत होते. राहुल गांधी यांनी दोन्ही हात छातीला लावले. एका पायाचा जमिनीवर जोर दिला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेणे पोलिसांना कठिण गेले. राहुल गांधींचे अंगरक्षक एकीकडे पोलिसांना हटवत होते. तर दुसरीकडे पोलीस राहुल गांधींना उचलण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, काही वेळाने पोलिसांनी राहुल गांधींना झपकन उचलले. राहुल गांधी यांना चोहोबाजूंनी पोलिसांनी उचलल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यात हे दृश्य दिसत आहे.

काँग्रेसने ट्विट केला व्हिडीओ

काँग्रेसने हा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाहा मोदींची हुकूमशाही. देशातील विरोधी पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने वागवलं जात आहे. लज्जास्पद… असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. काँग्रेसने सोबत व्हिडीओही ट्विट केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नेत्यांची रिघ

दरम्यान, कालच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तरुण जखमी झाले. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक तरुणांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. या आंदोलनाचे पडसाद आजही उमटले.

कालच्या आंदोलन चिघळल्यानंतर आज अनेक पक्षाच्या नेत्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दीपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अखिलेश यादवही आंदोलन स्थळी आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही जोरदार निदर्शने केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलिसांनी अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...