tv9 Marathi Special Report | शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
ज्यांच्याविरोधात प्रचारात रान उठवलं त्यांनाच पाठिंबा दिल्याबद्दल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या यावर अखेर राज ठाकरेंनी ट्विट द्वारे भूमिका मांडली.
लोकसभेत भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यानंतर यावेळी पालिकेत मनसेने शिंदेंना दिलेल्या लवचिक पाठिंब्याची चर्चा सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदेंना मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. ज्यांच्याविरोधात प्रचारात रान उठवलं त्यांनाच पाठिंबा दिल्याबद्दल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या यावर अखेर राज ठाकरेंनी ट्विट द्वारे भूमिका मांडली. राजकरणात बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही. मी एक शब्द आज पुन्हा देतो आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल असं ट्विट करत राज ठाकरेंनी चर्चंना उत्तर दिलंय.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

