नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026
नवी मुंबई महापालिका 1992 साली अस्तित्वात आली. नगरसेवक पदाच्या एकूण 111 जागा या महापालिकेत आहेत. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेकडे अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.
Mahapalika Election Result | नवी मुंबईत भाजपकडून जल्लोषाला सुरुवात, प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. 8 मधून भाजपचे गणेश सपकाळ विजयी झाले आहेत. तब्बल १२०० मतांनी त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jan 16, 2026
- 4:12 pm
NMMC Election 2026 : नवीमुंबईत भाजपाच्या गणेश नाईक यांची सरशी, शिंदे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
नियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवीमुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांत ४९९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणूकांत मुख्य लढत भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षातच आहे.भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jan 16, 2026
- 4:01 pm
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का
Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर
- Namrata Patil
- Updated on: Jan 16, 2026
- 10:00 pm
Ganesh Naik: राज्याच्या मंत्र्यालाच मतदार यादीतील घोळाचा मोठा फटका! मोठ्या कसरतीनंतर गणेश नाईकांनी केले मतदान
Ganesh Naik Voter List Confusion: राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत EVM मशीनमध्ये बिघाडाच्या वार्ता येत असतानाच मतदार याद्यांमधील घोळाने मतदार बेजार झाल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यच नाही तर दस्तूरखुद्द राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांना या घोटाळा फटका बसला. त्यांना मतदान केंद्र शोधण्यासाठी कसरत करावी लागली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 15, 2026
- 2:36 pm
Ganesh Naik: फक्त परवानगी द्या…शिंदेंचा टांगा पलटीच नाही, तर त्यांचे घोडे पण बेपत्ता करू…नाईकांच्या वक्तव्याने एकच खळबळ
Ganesh Naik Criticized Eknath Shinde: ठाणे आणि नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत विस्तवही जात नाही. नवी मुंबईत तर गणेश नाईक यांनी अगोदरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. पक्षानं परवानगी दिल्यास शिंदेंचे घोडे पण बेपत्ता करण्याची भाषा नाईकांनी वापरली
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 10, 2026
- 10:21 am
एकनाथ शिंदेंनी डाव टाकला! ऐन निवडणुकीत भाजप-काँग्रेससह ठाकरे बंधूंनाही मोठा धक्का, असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Shiv Sena : एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे, भाजप आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांना मोठा धक्का दिला आहे. नेरूळ विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 5, 2026
- 4:51 pm
मोठी बातमी ! ऐन निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडली; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीत खळबळ
BJP : आज नवी मुंबईत भाजपकडून मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला ऐन निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 2, 2026
- 10:15 pm
Shivsena-BJP: सत्तेत मित्र, महापालिकेत शत्रू; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीच नाही तर या 12 ठिकाणी महायुतीत बिनसलं, राजकारणातील नवीन समीकरणं काय?
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 pm