Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या शशिकांत शिंदेंच्या लेखातील काही मुद्द्यांवर सुनील तटकरेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला असता, या शिंदेंच्या विधानाला तटकरेंनी चुकीचे ठरवले. दादांची भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका अनेक वर्षांपासूनची आणि पक्षाच्या कोअर ग्रुपमध्येही स्पष्ट होती, असे तटकरेंनी नमूद केले.
अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या शशिकांत शिंदेंच्या लेखातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या लेखात शिंदेंनी असे म्हटले होते की, “अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्रांमुळे अजित दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता.” या विधानाला तटकरेंनी चुकीचे ठरवले आहे. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अयोग्य असल्याचे तटकरे म्हणाले.
सुनील तटकरेंनी स्पष्ट केले की, अजित पवारांची भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका अनेक वर्षांपासूनची होती. २०१४, २०१६-१७ आणि २०१९ मध्येही त्यांची हीच भूमिका होती, ज्याचा त्यांनी स्वतः वारंवार उल्लेख केला. तटकरे स्वतः त्या काळात प्रदेशाध्यक्ष असताना चर्चेच्या अंतिम टप्प्यांमध्ये सहभागी होते. दादांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेतही हे मत स्पष्टपणे मांडले होते की, भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थिर राहू शकते आणि केंद्राची मदत मिळू शकते. शिंदेंच्या लेखाचे शीर्षक भावपूर्ण निरोप अजित दादांना असल्याने तो दादांच्या निधनानंतरच लिहिला गेल्याचे तटकरेंनी नमूद केले.
Published on: Feb 13, 2026 04:41 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
