उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2026
उल्हासनगर महानगरपालिका (UMC) ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर शहराची मुख्य नागरी स्वराज्य संस्था आहे. ही महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असून शहराच्या नागरी सेवा, योजना आणि शहर विकास यासाठी जबाबदार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 20 असून तीन सदस्यीय प्रभाग 2 व चार सदस्यीय 18 प्रभाग आहेत. 78 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, 21 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 42 जागा सर्वसाधारण असून त्यापैकी 20 जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी 7 जागा अनुसूचित जाती (महिला), 1 जागा अनुसूचित जमाती (महिला), 11 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि 20 सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचे वर्चस्व आहे. सत्तेत असो वा नसो प्रत्येक प्रभागात कलानी कुटुंबाचे समर्थक आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता असणाऱ्या किंवा विरोधात असलेल्या पक्षाला उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाची मदत घ्यावी लागते. उल्हासनगरचे विद्यमान आमदार हे भाजपचे कुमार आयलानी आहेत. त्यांच्याविरोधात पप्पू कलानी हे विधानसभेच्या वेळी सक्रीय झाले होते. कलानी कुटुंबाने लोकसभेला श्रीकांत शिंदे यांना पाठींबा दिला होता.
भाजपाने डाव टाकला, एकत्र येताच ठाकरे बंधूंना मोठा दणका, अनेकांच्या हाती कमळ
Incoming in BJP : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. एकीकडे युतीची घोषणा होत असताना भाजपाने या दोन्ही पक्षांना मोठा दणका दिला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 7:19 pm