Sushma Andhare | चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी होताच सुषमा अंधारे यांचे मोठे विधान; म्हणाल्या तो निर्णय…
चंद्रपूर महापालिकेतील राजकारणात नविन वळण आलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने सत्तेत सामील होऊन भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर महापालिकेतील राजकारणात नविन वळण आलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने सत्तेत सामील होऊन भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय संपूर्णपणे स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी पक्षाने स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. अंधारे यांनी स्पष्ट केले की, कोणासोबत युती करावी, आघाडी कशी असावी याचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे. “स्थानिक लोकांनी आपला वेळ, पैसा आणि शक्ती पूर्णपणे ओतली आहे, त्यामुळे युतीसंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांचा आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी याबाबत पुढे अधोरेखित केले की, ही पक्षाची भूमिका राज्यभर जशी आहे, तशीच चंद्रपूरमध्येही आहे.
Published on: Feb 10, 2026 03:46 PM
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

