AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा ट्विस्ट… भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत, शिंदे वंचितसोबत तर एमआयएम…? राज्यात महापौरपदासाठी मोठ्या खेळी काय?

Mayor Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठा ट्विस्ट... भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत, शिंदे वंचितसोबत तर एमआयएम...? राज्यात महापौरपदासाठी मोठ्या खेळी काय?
Shivsena ubt and BJPImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 19, 2026 | 4:00 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या असून त्याचे निकाल हाती आले आहेत. भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. निकालानंतर आता महापौर कोण होणार याची चर्चा सुरू आहे. काही महापालिकांच्या निकालामुळे पेच निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी करून हा पेच सोडवणे गरजेचे आहे. राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमधील चित्र पाहता, भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे. तसेच एका महापालिकेत काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि दुसऱ्या शिंदे वंचित सोबत हा‍तमिळवणी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता

चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार असल्याचे विधान शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी केले आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या या ऑफरमुळे काँग्रेसवर दबाव वाढू शकतो. शिवसेना उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेसचा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप शिवसेना उबाठाला महापौर पद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापूरात काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

कोल्हापूरात काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी याबाबत बोलताना पडद्यामागे महत्त्वाची काय सुरू असल्याची माहिती दिली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 34 आणि शिंदेंचे 15 नगरसेवक एकत्र आल्यावर सत्ता स्थापन करणे शक्य असल्याने या युतीबाबत आता बैठकांना वेग आला आहे.

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे शिंदेच्या शिवसेनाचा महापौर बसणाऱ

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे 40 वर गेले आहे तर भाजपकडे 37 नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेला पाठिंबा देत पत्र सुपूर्द केले आहे. त्यामुळे शिंदेचा महापौर झाल्यास उपमहापौर वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टी एकत्र येण्याची शक्यता

मालेगावात एमआयएमकडून मोठी राजकीय हालचाल सुरू आहे. एमआयएमने इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. जातीयवादी पक्ष व शक्तींना रोखण्यासाठी ही युती होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शहरहितासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत मुफ्ती इस्माईल यांनी दिले आहे.

KDMC मध्ये शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी महापौर पदावरून आता शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र सत्ता समीकरणांची मांडणी सुरू असल्याने राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. येथे भाजपाचे 50 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 53 असे मिळून एकूण 103 महायुतीचे नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळ असूनही महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमधील तणाव कायम असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांकडून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, उद्धव ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून समर्थन मिळवण्यासाठी गुप्त प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटातील चार ते पाच नगरसेवक संपर्कात असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...