कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026
दहा वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुक होत आहे. कोल्हापूर महापालिकेची शेवटची निवडणूक १५ नोंव्हेंबर २०१५ रोजी झाली होती. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची मुदत नोंव्हेंबर २०२० मध्ये संपली आहे. मात्र, कोराेना, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.२०१५ रोजी एक सदस्यीय प्रभाग निवडणूक झाली होती. यंदा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. कोल्हापूर महानगर पालिकेत एकूण २० प्रभाग असून एकूण ८१ जागा आहेत. एकूण ४ लाख ९४ हजार ७११ मतदार असून त्यात २ लाख ४४ हजार ७३४ पुरुष आणि २ लाख ४९ हजार ९४० स्री मतदार आहेत.
Kolhapur: कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात, घडामोड काय?
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूरातील राजकारण नवीन वळणावर आले आहे. राजर्षी शाहू आघाडी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा होत आहे. काय आहे ही राजकीय घडामोड?
- Reporter Bhushan Patil
- Updated on: Dec 28, 2025
- 8:47 am