Dattatray Bharne | राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; दत्ता भरणे यांचा ठाम विश्वास
सध्याच्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा जोर धरून आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे प्रतिक्रिया देत म्हणाले, विलिनीकरणाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच बोलतील. सुनेत्रा पवार विलिनीकरणावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे.
सध्याच्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा जोर धरून आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे प्रतिक्रिया देत म्हणाले, विलिनीकरणाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच बोलतील. सुनेत्रा पवार विलिनीकरणावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यावर सुनेत्रा पवार ह्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून राज्यशासनाकडून जे काही कामे आहेत, त्याबद्दल दिल्लीत बैठक झाली. बैठकीत अजित दादांच्या पेंडिंग विषयावरही चर्चा झाली. त्यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा देखील होता का? असे प्रश्न उपस्थित केले गेले, यावर आपण बोलण्यापेक्षा स्वतः सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील असं देखील दत्ता भरणे म्हणाले.
Published on: Feb 12, 2026 04:51 PM
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

