AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Election Results 2026 LIVE : आजचा दिवस खास ! करवीर नगरीत प्रभाग 19 -20 मध्ये कोण वाजवणार विजयी चौघडे ? वाचा निकाल एका क्लिकवर

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान झालं असून कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही नागरिकांनी उत्साहाने मतदान केलं. यात प्रभाग 19 आणि 20 चाही समावेश असून इथे आता कोण विजयी पताका फडकावतं ते लौकरच कळेल. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होईल. वाचू या प्रभागाची सविस्तर माहिती

Kolhapur Election Results 2026 LIVE : आजचा दिवस खास ! करवीर नगरीत प्रभाग 19 -20 मध्ये कोण वाजवणार विजयी चौघडे ? वाचा निकाल एका क्लिकवर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक
| Updated on: Jan 16, 2026 | 6:03 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होऊन प्रचार, सभा, सर्व पार पडलं. काल महापालिकांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात मतदानही झाली. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठही काल मतदान पार पडलं असून करवीर निवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. या निवडणुकीत पूर्वीप्रमाणे प्रत्येकी एकेक नगरसेवक नव्हे तर यंदा 4 नगरसेवत निवडून द्यायचे आहेत. त्यामुळो कोल्हापूरकरांनी काल सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावत आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान केलं.

आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात मतदानाचा निकाल लागण्यास सुरूवात होईल. तत्पूर्वी कोल्हापूरचा महत्वाचा भाग असलेला प्रभाग 19 आणि 20 यांची माहिती जाणून घेऊ.

प्रभाग क्रमांक 19

प्रभाग क्रमांक 19 मध्ये यंदा 27 हजार 983 इतके मतदार असून 4019 अनुसूचित जातीचे मतदार तर 128 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. म्हाडा कॉलनी, ताराराणी कॉलनी, कळंबा फिल्टर हाऊस, बालाजी पार्क पासून ते कळंबा जेल परिसर, स्टेट बँक कॉलनी , तपोवन परिसर, जामसंडेकर नगर इथपर्यंत हा परिसर पसरलेला आहे.

उत्तरेला मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नाल्यावरील पुलापासून पश्चिमेस तपोवन पत संस्थेपर्यंत तर पूर्वेस जरनगर मुख्य रस्त्याने मनपा हद्दीपर्यंत हा परिसर आहे. तसेच दक्षिणेला जरनगर मुख्य र्ता मनपा हद्दीपासून दक्षिणेस नरके मळा हद्दीने मनपा हद्दीपर्यंत आणि पश्चिमेला तपोवन पतसंस्था जुनी मोरे कॉलनी तेथून दक्षिणेस मनपा हद्दीने कळंबा तलाव उत्तर बाजू मनपा हद्दीपर्यंत प्रभाग क्रमांक 19 परसला आहे. उथे आता विजयाचं कमळ फुलतं की धनुष्यबाण, घड्याळ,

प्रभाग क्रमांक 20

कोल्हापूरमधला प्रभाग क्रमांक 20 म्हणजे गजबजलेला , वर्दळीचा भाग. इथे एकूण 32 हजार 121 मतदारांची संख्या असून 3497 अनुसूचित जातीचे तर 281 मतदान हे अनुसूचित जमातीचे आहेत. नवनाथ नगर, सुर्वे नगर, प्रथमेश नगर, साळोखे नगर पासून पसरलेला हा भाग जिवबा नाना पार्क, महालक्ष्मी कॉलनी, बुद्धीहाळकर पाटील नगर परिसरापर्यंत आहे, एवढी त्याची व्याप्ती आहे.

उत्तरेला राजलक्ष्मी नगर नाल्यापासून पश्चिमेस दिप्ती पार्क अपार्टमेंटसमोरील राधानगरी ते रिंग रोडने उत्तरेस रि स नं 1487 च्या उत्तर हद्दीने पश्चिमेस मनपा हद्दीपर्यंत हा भाग आहे. तसेच पूर्वेला कळंबा जेल उत्तर हद्दीपासून मुख्य रस्त्याने कळंबा ग्रामपंचायत पर्यंत तेथून पश्चिमेस कळंबा ग्रामपंचायतच्या जवळ महानगरपालिकेपर्यंत आहे.

दक्षिणेला कळंबा नाका महानगरपालिका हद्दीपासून पश्चिमेस मनपा हद्दीने जिवबा नाना पार्क दक्षिण बाजूने पुईखडी पंपिंग स्टेशनच्या दक्षिण हद्दीने राधानगरी रोडपर्यंत तेथून पश्चिमेस मनपा हद्दीने बालिंगा रि स नं 213 च्या दक्षिण हद्दीपर्यंत आहे.

आणि पश्चिमेला रि स नं 206 पश्चिम बाजू मनपा हद्दीपासून दक्षिणेस मनपा हद्दीने रि स नं 213 चे दक्षिण हद्दीपर्यंत इतका हा परिसर पसरलेला आहे.

आता 19 आणि 20 या दोन्ही प्रभागांमध्ये आता कोणत्या पक्षांचे नगरसेवक विजयाचा झेंडा फडकावून महानगरपालिकेत जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होऊन, आज दिवसभरात इथल्या निकालाचं चित्र नक्कीच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कोल्हापूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.