Maharashtra Election Final Results Winners 2026 LIVE : उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026 LIVE Counting and Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर होणार. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

Maharashtra Mahanagar Palika Election Final Results 2026 LIVE Counting and Winner Updates : राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एक्झिटपोलही पुढे आले. एक्झिटपोलच्या आकड्यांनी अनेकांची थेट झोप उडाली. अनेक प्रस्थापितांना धक्का बसताना दिसला. काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. राज्यात सत्तेत असलेले पक्ष काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होती. शेवटी राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागले आहेत. मोठ्या नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची निवडणूक बनलीये. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, नांदेड, सांगली, सातारा या महापालिकांच्या निवडणुकीकडे (Maharashtra Election) राज्याच्या नजरा दिसल्या. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. प्रशासनाकडून या निवडणुकीचे जय्यत तयारी करण्यात आली होती.
LIVE NEWS & UPDATES
-
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही – अमेय घोले
आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत. आम्हाला आमचे नेते एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची काही गरज नाही.आम्ही सगळे पक्ष चिन्हावर निवडणूक जिंकलोय असे नव निर्वाचित नगरसेवक अमेय घोले यांनी म्हटले आहे.
-
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
श्रीकांत शिंदे ठरले उल्हासनगरमध्ये गेमचेंजर
शिवसेना शिंदे गटाकडे 38 नगरसेवक तर भाजप कडे 37
उल्हासनगरमध्ये आता शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होण्याची शक्यता
-
-
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांनी कडेगावमध्ये आज स्वर्गीय पतंगराव कदम यांना अभिवादन केलं आहे. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस 31 जागांवर निवडणूक लढवली होती,यामध्ये काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आले आहेत,या नूतन नगरसेवकांनी आज कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विश्वजीत कदम यांची भेट घेतली
-
केडीएमसीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची बैठक
केडीएमसीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खसदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक
महापौर पदाच्या रणनीतीसाठी बैठक असल्याची सूत्रांची माहिती
केडीएमसी महापालिकेत घडामोडींना वेग
-
उल्हासनगर महापालिका शिंदे शिवसेना झेंडा फडकणार का?
उल्हासनगर महापालिकेवर कोणाची सत्ता येणार? वंचित बहुजन आघाडी ठरणार किंगमेकर. भाजप आणि शिवसेना बहुमत पासून दूर असल्याचे चित्र. वंचित बहुजन आघाडीचे २ विजयी उमेदवार अज्ञातस्थळी. वंचित बहुजन आघाडी शिंदे यांच्या शिवसेनेला देणार समर्थन सूत्रांची माहिती
-
-
धनगर समाजामुळे धाराशिव जिल्ह्यात तणावाचं वातावरण
धनगर समाजातील आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दीपक बोराडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी औसा–तुळजापूर रोडवर खंडाळा गावच्या पाटीवर टायर पेटवून आंदोलन सुरू केलं आहे.
-
Kdmc मध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची ठाण्यात बैठक
Kdmc मध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची ठाण्यात बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खसदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. महापौर पदाच्या रणनीतीसाठी बैठक असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
-
रक्तबंबाळ तरुणाला पोलीस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन
जळगावात गणेश नगर येथे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन करत गोंधळ सुरु आहे. सत्यजित गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव असून धारधार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगत हल्ला करणाऱ्यांना अटक करत कारवाईची मागणी केली जात आहे.
-
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र लढणार:मंगळवारी घोषणा- रोहित पवार
पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा निर्णय उशिरा झाल्याने आमची सत्ता आली नाही- रोहित पवार भारतीय जनता पार्टी हा शेवटच्या लेवलला जाऊन लढणारा पक्ष आहे स्थानिक पातळीवर त्यांनी आर्थिक आणि प्रशासनाची ताकद वापरून सत्ता मिळवली -रोहित पवार
-
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई महापाैर आमचा व्हावा ही आमची इच्छा…
मुंबई महापाैर आमचा व्हावा ही आजही आमची इच्छा आहे असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांच्याबद्दल स्पष्ट बोलले देवेंद्र फडणवीस…
नुकताच राज ठाकरे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन राज ठाकरे यांचा कोणताही फायदा झाला नाही पण राज ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंना फायदा झाला.
-
Maharashtra Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पुण्याच्या विजयाबद्दल मोठे विधान…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पुण्याचा दादा पुण्याची जनता आहे. पुण्यात भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठे विधान केले.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली मनातील खंत…
मला मुंबईकरांकडून नक्कीच जास्त अपेक्षा होती. कारण आम्ही गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबईमध्ये खूप काम केली. मुंबईकर आम्हाला अधिक आर्शिवाद देतील, असे आम्हाला वाटले होते.
-
BMC Election Results 2026 : उद्धव ठाकरे यांचे महापाैर पदाबद्दल अत्यंत मोठे विधान…
मुंबईच्या महापाैर पदाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईचा महापाैर आमचा व्हावा, ही आजही आम्ही इच्छा आहे.
-
देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला
मुंबईकरांना वाटत नाही जर वाटत असतं तर मतदान केलं नसतं, मराठी आणि हिंदीत महापौर होणार… मुंबईच्या विकासासाठी काम करू…खरं आहे, शिंदेंच्या शिवसेनेला कमी धागा मिळाल्या ही वस्तुस्थिती, अनेकांनी ठाकरेंना झुकतं माप दिलं, मराठीच्या स्पिरीटचा शिंदेंना फटका बसला…शिंदे साहेब आत्मचिंतन , आत्मपरिक्षण करणारा नेता आहे, ते डगमगणारे नाहीत, त्यामुळे भविष्यात युतीत लढल्यानेच फायदा आहे… महायुती अभेद्य ठेवली तर त्याचा परिपाक चांगला असेल
-
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा…
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. यावेळी दोघांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवाबद्दल चर्चा केल्याचे सांगितले जात आहे
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
महापालिकेच्या विजयानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरे बंधूना डिवचल आहे. महापालिकेवर सत्ता आल्यानंतर त्यांनी म्हटले की, मराठी माणूस एकवटला आहे.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा…
कल्याण, डोबिंवलीत आमचे उमेदवार पळवले, असा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केला. यासोबतच त्यांनी म्हटले की, सत्ताधारी एकमेकांचे पैसे क पकडत होते.
-
शर्मिला ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे आैक्षण…
मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांचे आैक्षण शर्मिला ठाकरे यांच्याकडून करण्यात आले. शिवतिर्थावर विजयी उमेदवारांना बोलावण्यात आले.
-
मुंबईत 8 आंबेडकरी पक्षांनी 164 जागा लढवूनही हाती भोपळा
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात ३० जागांवर विजय मिळाला असला तरी मुंबईत काँग्रेसबरोबर आघार्ड 45 जागा लढवून एकही जागा मिळवता आली नाही. धक्कादायक म्हणजे मुंबईत 8 आंबेडकरी पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र यातील एकाही पक्षाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही.
-
रवी राणा यांचा थेट मोठा गेम, अखेर..
भाजपचा गेम रवी राणा यांनी केला आहे..युवा स्वाभिमानने शिस्तीने भाजपचा गेम केला. भाजप आता युवा स्वाभिमान समोर लाचार झाली आहे. भाजपला आता युवा स्वाभिमानच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहे.. लंगड सरकार आता अमरावती मध्ये त्यांचं स्थापन केल जाणार आहे..
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांचे मनसे सैनिकांना मोठा आवाहन, थेट म्हणाले…
राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून राज ठाकरेंच्या पक्षाला मोठे अपयश मिळाले. मुंबई फक्त सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंनी मोठे आवाहन कार्यकर्त्यांना केले असून त्यांनी म्हटले की, खचून न जाना कामाला लागा…
-
आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत- संजय राऊत…
नुकताच संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊतांनी म्हटले की, आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले आहेत.
-
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक…
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल पुढे आली असून शरद पवारांच्या पक्षासोबतच थेट अजित पवारांच्या एनसीपीलाही मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक बारामतीमध्ये होणार आहे.
-
BMC Mahapalika Election Results : बारामतीच्या घडामोडींकडे संपूर्ण राज्याच्या नजरा..
महापालिकांच्या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीची साथ सोडून चक्क काका शदर पवार यांचा हात पकडला होता. मात्र, त्यांच्या पक्षांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.
-
Maharashtra Election Results 2026 : उद्वव ठाकरेंनी मनसेचा वापर करून घेतला – संतोष धुरी यांची टीका
उद्धव ठाकरे यांनी मनसेचा फक्त वापर करून घेतला असे म्हणत भाजपचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी ठाकरेंच्या सेनेसह मनसेवरही निशाणा साधला. आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार ? असा सवालही धुरी यांनी मनसेला विचारला आहे.
-
बारामती – शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार हे त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी गेले आहे आहेत. सुप्रिया सुळे तसेच अमोल कोल्हे हे देखील गोंविदबागेतील निवासस्थानी उपस्थित आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरू.
-
Maharashtra Election Result 2026 : पुण्यात आमदारांच्या पुढील पिढीला महापालिका निवडणुकीत 50 टक्के यश
पुणे शहराचे प्रतिनिधित्व केलेल्या आमदारांच्या पुढील पिढीला महापालिका निवडणुकीमध्ये 50 टक्के यश मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले सहापैकी पाच आमदारपुत्र अन्य पक्षांतून आले आहेत. तर भाजपमध्ये प्रवेश करूनही एका आमदारपुत्राला पराभवाला सामोरे जावे लागले. दोन माजी आमदारांच्या पत्नीला पराजयाचा सामना करावा लागला.
-
धाराशिव – सावंत काका पुतण्याचं बिनसलं , धनंजय सावंत जिल्हापरिषदेला वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे सावंत कुटुंबियांमध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांनी स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीसाठी वापरण्यात आलेल्या बॅनरवर कुठेही आमदार तानाजी सावंत यांचा फोटो वापरला नसल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं.
-
Maharashtra Election Results 2026 : विनोद मुळूक बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, पाच स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड
बीड नगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे बीडमध्ये पाहायला मिळाले.
-
Maharashtra Election Results 2026 : पुणे – महापालिका निवडणुकीत 18 प्रभागात भाजपाचा विजयी चौकार
पुण्यातील महापालिका निवडणुकीत 18 प्रभागात भाजपाने विजयी चौकार लगावला आहे. 41 प्रभागापैकी 18 प्रभागात भाजपाचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहे.
कसबा,पर्वती,कोथरूड, शिवाजीनगर,या बालेकिल्यासह वडगाव शेरी खडकवासला हडपसर विधानसभा मतदारसंघात पॅनलचा समावेश आहे.
-
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं निधन
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं निधन झालं आहे. काल रात्री 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचं निधन झालं, आज दुपारी 12 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
-
Maharashtra Election Results 2026 : जालन्यात निकालानंतर काँग्रेस-सेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी
जालन्यात निकालानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेस-सेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. मिलन चौक या संपूर्ण परिसरातील ही घटना असून हाणामारीमुळे तणाव वाढला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत खडसेंची बडबड यशस्वी ठरली नाही – उल्हास पाटील यांची टीका
जळगाव महापालिका निवडणूकीनंतर माजी खासदार उल्हास पाटील यांनी खडसेंवर जोरदार टीका केली. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत खडसेंची बडबड यशस्वी ठरली नाही. लोकांचा एकनाथ खडसेंवर आता विश्वास राहिलेला नाही असे टीकास्त्र त्यांनी सोडलं.
जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खातही उघडता आलं नाही त्यावरून उल्हास पाटलांनी खडसेंना धारेवर धरलं.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : पुण्यात भाजप व काँग्रेसचे शहराध्यक्ष सोडता इतर पक्षाच्या शहराध्यक्षांचा पराभव
पुणे महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष आणि माजी पदाधिकाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे व काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे वगळता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ,मनसे, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष पराभूत झाले.
-
BMC Mahapalika Election Results : मुंबई भाजपा शिवसेना शिंदेंचीच…
मुंबई महापालिकेवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. शेवटपर्यंत मोठी लढत महापालिकेवर बघायला मिळाली. भाजपाचाच महापाैर होणार हे स्पष्ट झालंय.
-
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट…
मुंबई महापालिकेच्या निकालात मोठा ट्वविस्ट आला असून 10 जागांवर सर्वकाही गणित आडले असून कॉंग्रेस किंगमेकर ठरत आहे. भाजपा बहुमतापासून दूर जात आहे.
-
मुंबईच्या निकालात सर्वात मोठा ट्वविस्ट, भाजपाला सर्वात मोठा धक्का, कॉंग्रेसच किंगमेकर..
महापालिका निवडणुकीचा निकाल येत असून मुंबई महापालिकेवर आमचीच सत्ता आल्याचा दावा भाजपाने केला असता आता मोठा ट्ववि्ट आला असून भाजपाचे बहुमत हुकताना दिसत आहे.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट पहिली प्रतिक्रिया…
महाराष्ट्राचे आभार… राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या…महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले..
-
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
काँग्रेस 28 आणि उबाठा 6 यांची मनपावर एकत्रित सत्ता येण्याचा मार्ग मोकळा. चंद्रपुरात मोठा उलटफेर, भाजपला धक्का. राज्यात महायुतीची घोडदौड असताना चंद्रपूर ठरले अपवाद
-
Maharashtra Election Results 2026 : पराभवानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रक्रिया..
पराभवानंतर अजित पवार यांनी मोठी प्रक्रिया देत म्हटले की, जनतेचा काैल मी आदराने स्वीकर करतो..
-
Maharashtra Election Results 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया..
राज्यातील महापालिका निवडणुकीची आकडेवारी पुढे येत असून संजय राऊत यांनी यावर प्रक्रिया दिली. अटीतटीची लढत सध्या सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. ठाकरेंना आव्हान द्यायचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले..
-
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय थेट दिले…
रवींद्र चव्हाण यांनी विजयानंतर महापालिका निवडणुकीच्या यशाचे श्रेय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना दिले आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे यांच्या सेनेला मोठा झटका
शिंदेंच्या शिवसेनेतील माझी महापौर वैजयंती घोलप यांच्या पॅनलचा पराभव. ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर ,अर्पणा भोईर, स्वप्नाली केने ,संकेत भोईर विजयी
-
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नंबर 2 चा पक्ष..
छत्रपती संभाजीनगरचा निकाल हाती येत असून एमआयएम हा नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. भाजपा एक नंबरचा पक्ष ठरलाय…
-
Mumbai Municipal Election Results 2026 : माझ्या पोरानं ठाकरेंची इज्जत काढली, सोमय्या यांची थेट टिका…
किरीट सोमय्या यांनी नुकताच मुंबई महापालिकेच्या निकालावर बोलताना म्हटले की, माझ्या पोराने ठाकरेंची इज्जत काढली. किरीट सोमय्या यांचा मुलाचा विजय मुंबई महापालिका निवडणुकीत झाला आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : जळगाव महापालिकेत महायुतीचा दणदणती विजय…
जळगाव महापालिकेत महायुतीने 75 जागेपैकी 70 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने जळगाव महापालिकेत 46 जागेवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. विजयानंतर भाजप कार्यालयात बाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांसोबत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरल्याचं बघायला मिळालं
-
BMC Mahapalika Election Results : किशोरी पेडणेकर विजयी…
किशोरी पेडणेकर यांचा विजय झाला असून शिवसेना ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत.
-
Maharashtra Election Results 2026 : धुळे महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता…
29 महापालिकांचे निकाल येत असून धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्याचे दिसतंय. धुळ्यात भाजपाने धमाकेदार कामगिरी केली आहे.
-
Pune Nagarsevak Election Results 2026 : सोनाली आंदेकर विजयी, थेट जेलमधून…
आंदेकर टोळीतील सदस्य सोनाली आंदेकर विजयी झाल्या असून थेट जेलमधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती .रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झाला.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी…
जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली असून जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा करिश्मा बघायला मिळत आहे.
-
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
महापालिका निवडणुकीत 75 पैकी भाजपचे 46, शिवसेनेचे 22 आणि राष्ट्रवादीचा 1 असे महायुतीचे 69 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. विधानसभा, नगरपरिषदा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत देखील भाजप आणि शिंदे सेना वरचढ असल्याचे पाहायला मिळाले…महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे 5 उमेदवार निवडून आले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा देखील फोडता आलेला नाही.
-
Election Results 2026 : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्याचा अजित पवारांनी लावली सुरंग…
अमरावतीमध्ये भाजपाला तसा धक्का बसल्याचे दिसतंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाने धमाकेदार कामगिरी केली.
अमरावती महानगरपालिका
एकूण जागा-87
22 पैकी 17 प्रभागातील 67 उमेदवार विजयी.
भाजप-17 काँग्रेस- 15 युवा स्वाभिमान-4 एमआयएम-6 राष्ट्रवादी अजित दादा- 17 BSP-3 शिवसेना शिंदे-3 शिवसेना ठाकरे-1 प्रहार-1
-
Pune Municipal Election Results 2026 : शिवसेना ठाकरे गट पुण्यात 0 वर, धक्का…
पुणे महापालिकेचा निकाल हाती येत आहेत. जवळपास निकाल आले असून एकाही जागेवर आघाडी घेण्यात शिवसेना ठाकरे गटाला यश मिळाले नाही. अजूनही शिवसेना ठाकरे गट झिरोवर आहे
-
Nashik Nagarsevak Election Results 2026 : नाशिकमध्ये भाजपाची एकहाती सत्ता, थेट गाठला 62 चा आकडा…
नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता, भाजपने गाठला 62 चा जादुई आकडा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक केली होती प्रतिष्ठेची. शिंदेंची शिवसेना ठरला दोन नंबरचा पक्ष
-
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार यांच्यासह शरद पवारांनी धक्का…
अजित पवार यांनाच नाही तर शरद पवारांच्या पक्षालाही मोठी धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये हातून सत्ता जाताना दिसत आहे.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : देवेंद्र फडणवीस यांचा थेट अमित साटम यांना फोन…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निकालावर थेट अमित साटम यांना फोन केला. यावेळी ते शुभेच्छा देताना दिसले.
-
Pune Nagarsevak Election Results 2026 : तानाजी सावंत यांना धक्का, थेट मुलाचाच…
तानाजी सावंत यांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे. थेट पुण्यातून मुलाचा पराभव. हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल.
-
BMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची थेट एक हाती सत्ता, अजित पवारांना दणका…
पिंपरी चिंचवड महापालिकेचे निकाल पुढे येत असून अजित पवारांना मोठा दणका बसला असून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. भाजपालाने थेट धक्का अजित पवारांना दिला. भाजपा 84 जागेवर आघाडीवर आहे तर अजित पवार गट 34 वर आघाडी…
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, थेट व्हिडीओ…
शिवसेना ठाकरे गटाच्या निकालानंतर नितेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवत धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते पेग्विंन म्हणते जय श्रीराम म्हणत हसत आहेत.
उद्धवजी आणि पेंग्विन ला
जय श्री राम 🚩🚩 pic.twitter.com/HCz2aSp43y
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 16, 2026
-
Pune Election Results 2026 : अजित पवारांना राजकारणातील सर्वात मोठा धक्का, पुण्यासह…
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक निकाल येत असून अजित पवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची युतीची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाचा हात पकडला होता. मात्र, अजित पवारांचे उमेदवार पिछाडीवर असून भाजपाने जोरदार मुसंडी मारली.
-
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका…
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाचा धक्का बसताना दिसत आहे. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाच्या दोन्ही मंत्र्यांचे मुले आघाडीवर आहेत.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाचा गड गेला, मोठी खळबळ…
अकोल्यातील सर्व 80 जागांचे निकाल हाती येत असून भाजपा 40 जागांवर आघाडीवर दिसत आहे. हा मोठा धक्का भाजपाला म्हणाला लागेल, कारण अकोला हा भाजपाचा गड मानला जातो. फक्त 40 जागांवर आघाडीवर भाजपा आहे.
-
Latur Nagarsevak Election Results 2026 : लातूर महापालिकेतून हैराण करणारी अपडेट…
लातूरमध्ये वंचित आणि कॉंग्रेसची एकहाती सत्ता येताना दिसत आहे. हा मोठा दणका भाजपाला म्हणावा लागेल. गेल्या निवडणुकीत भाजपाकडे महापालिकेची सत्ता होती. मात्र, यावेळी पराभवाचा सामना करावा लागत आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : मालेगावात चर्चेत नसलेल्या पक्षाची थेट धमाकेदार कामगिरी…
मालेगावात सगळेच फेल, चर्चेत नसलेल्या पक्षाची जोरदार मुसंडी बघायला मिळत आहे.
मालेगाव महापालिका विजयी उमेदवार…
भाजप – 02 शिवसेना – 18 इस्लाम – 19 सपा – 05 काँग्रेस – 01 एमआयएम – 04 इतर – 01
-
Nashik Municipal Election Results 2026 : भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का…
स्वतःच्या घरात भाजपचे ४ तिकीट घेणाऱ्या बडगुजर यांना मोठा धक्का. प्रभाग २५ चा निकाल समोर, ४ पैकी २ जागेवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी
-
Maharashtra Election Results 2026 : सोलापूरमध्ये 54 जागांवर भाजपा आघाडीवर
सोलापूरमध्ये 54 जागांवर भाजपा आघाडीवर असून मोठे यश भाजपाला मिळाल्याचे बघायला मिळत आहे. प्रणिती शिंदे कॉंग्रेससाठी मैदानात उतरल्या आहेत.
-
PCMC Municipal Election Results 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का, अजित पवारांनी..
अजित पवार आणि शरद पवार गट यांना पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोठे यश मिळताना दिसत आहेत. काकांचा हात पकडून अजित पवार भाजपाला धक्का देतांना सुरूवातीच्या कलानुसार दिसत आहे.
-
भाजपा शिवसेना 133 जागांवर आघाडीवर, मुंबई महापालिकेत कोणाचा महापाैर?
मुंबई महापालिकेचा निकाल हाती येत असून भाजपा आणि शिवसेना 133 जागांवर आघाडीवर आहे. एकहाती दोन्ही पक्षांची सत्ता येण्याची शक्यता आहे.
-
BMC Election Results 2026 : मुंबईत एकनाथ शिंदे यांना थेट धक्का, दोन…
मुंबईत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून समाधान सरवणकर आणि वायकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा एक मोठा धक्का शिंदेंना म्हणावा लागेल.
-
भाजपाची मुंबई महापालिकेत विजयी वाटचाल, तब्बल 80 जागांवर आघाडी..
मुंबईमध्ये भाजपाची विजयी वाटचाल सुरू असून भाजपाचा पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर महापाैर बसू शकतो. मुंबई महापालिकेत भाजपा 80 जागांवर आघाडीवर आहे.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : लातूरमध्ये भाजपाला मोठा दणका, ते एक विधान ठरतंय, पराभवाला कारणीभूत
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये जाणून धक्कादायक विधान विलासराव देशमुख यांच्याबद्दल केले होते. त्यानंतर आता लातूर महापालिकेचे निकाल येत असून भाजपाला मोठा धक्का बसला असून कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसतंय.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या भावाचा पराभव, भाजपाला धक्का…
अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का ; साई नगर प्रभागात भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय पराभूत. रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे विजयी..आमदार रवी राणांनी केली होती साईनगर मधील निवडणूक प्रतिष्ठेची
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाची राज्यात मोठी लाट..
महापालिका निवडणुकीचे कल हाती येत असून जवळपास महापालिकांवर भाजपाची दमदार कामगिरी बघायला मिळत आहे. लाट भाजपाची आल्याचे दिसतंय.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का…
अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव, यासोबतच भाजपाचीही निराशजनक कामगिरी.
-
Pune Nagarsevak Election Results 2026 : पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय आईचा पराभव…
पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय झाला असून त्यांच्या आईचा मात्र पराभव झाला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. आता निकाल हाती येत आहेत.
-
BMC Mahapalika Election Results : भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची मुंबईत जोरदार कामगिरी..
भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने मुंबईत युती म्हणून निवडणुका लढल्या. आता सत्तेसाठी अगदी जवळ असल्याचे बघायला मिळत आहे. मोठी लढत मुंबई महापालिकेत बघायला मिळत आहे.
-
सोलापूरमध्ये भाजपाची जोरदार कामगिरी, प्रणिती शिंदेचा धक्का…
सोलापूरमध्ये भाजपाची जोरदार कामगिरी बघायला मिळत आहे. तब्बल 45 जागांवर भाजपाची सोलापूरमध्ये आघाडी बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता
अमरावती मध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय दुसऱ्या फेरीत तबल 1530 मतानी पिछाडीवर. रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे 1530 मतांनी आघाडीवर.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपा 85 पार, ठाकरे बंधू 67 पार, जाणून घ्या संपूर्ण आकेडवारी…
मुंबई महापालिकेचे निकाल हाती येत असून मोठी बाजी भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट मारताना दिसत आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष सुरूवातीच्या आकड्यांवरून ठरत असून शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला.
-
Maharashtra Election Results 2026 : एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात गेम? भाजपाची मुसंडी..
ठाण्यात भाजपा 14 शिवसेना शिंदे गट 10 वर आघाडीवर आहे. शिवसेना आणि शिंदेची येथे युती आहे. मात्र, ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे.
-
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : तेजस्वी घोसाळकर विजयी..
मुंबईमध्ये भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या शिवसेना ठाकरे गटात होत्या.
-
Municipal Corporation Pune Election Results 2026 : अजित पवारांना भाजपाचा धक्का, पुण्यात थेट…
पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला असून भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून अजित पवारांच्या गटाचे उमेदवार पिछाडीवर असून हा थेट धक्काच म्हणावा लागेल.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई महापालिकेचा पहिला निकाल हाती, कॉंग्रेसचा पहिला विजय..
मुंबईचा पहिला निकाल हाती आला असून आशा काळे कॉंग्रेसच्या विजयी झाल्या आहेत. हा मुंबई महापालिकेचा पहिला निकाल आहे.
-
Pune Municipal Election Results 2026 : अजित पवार यांच्या पदरी निराशाच? पुण्यासह पिंपरी चिंचवड…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र येऊन निवडणुका लढताना दिसले. भाजपाच्या विरोधात थेट निवडणुका लढताना अजित पवारांचा पक्ष दिसला. मात्र, म्हणावी तशी कामगिरी अजिबात करण्यात अजित पवार यांच्या पक्षाला जमली नाही.
-
Maharashtra Election Results 2026 : जळगावात शिंदे गटाला मोठे यश..
जळगावात शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले असून पहिला विजय मिळाला आहे.
-
पुणे महापालिकेत आबा बागुल पिछाडीवर, धक्का…
पुणे महापालिकेचे निकाल हाती येत असून आबा बागुल पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. हा मोठा झटकाच म्हणावा लागेल.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात काटेकी टक्कर..
महापालिकांचे निकाल हाती येत असून मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या मोठी टक्कर बघायला मिळत आहे.
-
BMC Election Results 2026 : भाजपा शिवसेना शिंदे गट 73 जागांवर आघाडीवर
मुंबई महापालिकेचे सुरूवातीचे कल हाती येत असून भाजपा शिंवसेना ठाकरे गट तब्बल 73 जागांवर आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : पुण्यातून धक्कादायक बातमी पुढे, शिवसेना ठाकरे गटाला धक्का…
पुण्यातून वसंत मोरे यांच्या पूत्र पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत मोरे यांचा मुलगा ही निवडणूक लढत आहे.
-
Municipal Corporation Nanded Election Results 2026 : नांदेडमध्ये भाजपाचा बोलबाला, अशोक चव्हाण यांची बाजी…
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हाती येत असून नांदेड महापालिकेत भाजपा आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.
-
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपाच, ठाकरेंची हवा…
राज्यातील 29 महापालिकांचे कल हाती येत असून मुंबई महापालिकेत भाजपा धमाल करताना दिसत आहे. 50 जागांवर आघाडीवर आहे. यासोबत शिवसेना शिंदे गटही धमाका करताना दिसत आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : गरवारे स्टेडियम वरील मतमोजणी केंद्रावरील गोंधळ कायम
प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने उमेदवार प्रतिनिधींची गर्दी. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम. निवडणूक निरिक्षक मतमोजणी केंद्रावर दाखल, उमेदवारांनी मांडली कैफियत.
-
Panvel Municipal Election Results 2026 : पनवेलमध्ये भाजपची मोठी आघाडी
पनवेलमध्ये भाजपने आपली विजयाची परंपरा कायम राखल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. सिडको क्षेत्रातील नागरी प्रश्नांचा प्रभाव या निकालांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : कल्याण डोंबिवलीत भाजपा आघाडीवर, शिंदेंना धक्का…
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 21, 22 ,23 ,24 ,29 आणि 30 प्रभाकर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये डोंबिवलीत भाजप आघाडीवर. सुरुवातीला टपाल मत मोजली सुरू आहे.
-
Municipal Corporation Latur Election Results 2026 : लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका,
लातूरमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र, आता लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका बसताना दिसत असून भाजपा लातूर महापालिकेत पिछाडीवर आहे.
-
जालना मतमोजणी केंद्रावर पोलिस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये बाचाबाची
उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश करताना उडाला गोंधळ. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उडाला गोंधळ..पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला काढले बाहेर..प्रशासनाचा कारभार नियोजन शून्य असल्याचा भाजपच्या उमेदवाराचा आरोप
-
BMC Election Results 2026 : मुंबई युती जोरदार, भाजपा शिवसेनेचे अर्धशतक…
महापालिकेचे कल हाती येत असून मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट 50 जागांवर आघाडीवर आहे.
-
Municipal Corporation Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून मोठी आघाडी मिळवली आहे
पुणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून 33 जागांवर आघाडीवर आहे.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : ठाकरे गटाला अत्यंत मोठा झटका, थेट…
सुरूवातीच्या कलांनुसार, ठाकरे गटाला मोठा झटका बसताना दिसत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट आघाडीवर दिसत आहे.
-
Chandrapur Municipal Election Results 2026 : चंद्रपुरात आम्ही शंभर टक्के सत्ता स्थापन करू आणि आमचे बहुमत असेल – विजय वडेट्टीवार
अपेक्षित निकाल लागतील. यंत्रणाच्या खूप वापर झाला. पैशाच्या खूप वापर झाला. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना रान मोकळं करून दिल होतं. अशाही परिस्थितीत काँग्रेसला पोषक निकाल असेल. चंद्रपूर , अमरावती, कोल्हापूर लातूर ,जालना असे अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल. चंद्रपुरात आम्ही शंभर टक्के सत्ता स्थापन करू आणि आमचे बहुमत असेल. आणि बाकीच्या अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल किंवा काँग्रेस दुसऱ्याला घेऊन सत्तेत राहील सगळ्याला धक्का देणारे निकाल असतील.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपाची आघाडी कायम…
मुंबई महापालिकांचे कल पुढे येताना दिसत असून भाजपाची आघाडी बघायला मिळत आहे. भाजवा आणि शिवसेना शिंदे यांची युती धमाल करताना दिसत आहे.
-
BMC Mahapalika Election Results : पहिल्या कलामध्ये भाजपाची बाजी..
मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने घेतली आहे आघाडी. भाजपा आणि शिंदे 22, ठाकरे बंधू 10 याप्रमाणे..
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : काही सेकंदात पहिला कल हाती…
काही सेकंदात पहिला कल हाती येईल. 29 महापालिकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
-
पोस्टल मतमोजणीला सुरूवात.. उमेदवारांची धाकधूक वाढली..
राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदान मोजणी केली जात आहे. काही वेळात आकडे हाती येतील.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन सुरू
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. संभाजीनगरमध्ये मोठा राडा बघायला मिळत आहे. हेच नाही तर थेट ठिय्या आंदोलन केले जात आहे.
-
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : पोस्टल मतमोजणीला सुरूवात..
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका असून 9.55 मिनिटाला पोस्टल मतमोजणीला सुरूवात होईल. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
Municipal Corporation Nashik Election Results 2026 : 15 मिनिटात महानिकालाला होणार सुरूवात
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल अवघ्या 15 मिनिटांनी सुरू होतील . काल मतदान झाले आणि आज मतमोजणीला सुरूवात होईल.
-
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वी मोठा राडा होताना दिसत आहेत. उमेदवाऱ्यांच्या प्रतिनिधींविरोधात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
-
Municipal Corporation Mumbai Election Results 2026 : मुंबई महापालिकेबद्दल चंद्रकांत पाटील यांचा थेट दावा आणि…
मुंबई महापालिकेच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. निकाल येण्यास काही मिनिटे शिल्लक असताना चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेवर दावा करत म्हटले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा मुंबई महापालिकेत 130 च्या खाली येणार नाही, चंद्रकांत पाटील यांनी थेट महापालिकेचा निकालच सांगून टाकला आहे.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : चंदक्रांत पाटलांचा अत्यंत मोठा दावा, थेट म्हणाले…
महापालिका निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही मिनिटे राहिली असून निकालाबद्दल बोलताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबईत आम्ही 130 च्या खाली येणार नाहीत.
-
Maharashtra Election Results 2026 : काही वेळातच महापालिका निवडणुकीच्या निकालाला सुरूवात..
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही वेळातच महापालिकेचे निकाल होती येतील.
-
Maharashtra Election Results 2026: 29 महापालिकांचा आज महानिकाल…
राज्यातील 29 महापालिकांचा आज महानिकाल असून काही वेळात एका मागून एक महापालिकांचे निकाल हाती येताना दिसतील.
-
Municipal Corporation PCMC Election Results 2026 : महेश लांडगे अजित पवारांसाठी ठरणार वरचढ?
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांनी भाजपाचा मोर्चा सांभाळला. यावेळी महेश लांडगे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करतानाही दिसले. आता एकमतच्या एक्झिटपोलनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता येणार आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असून शकतो.
-
[Municipal Corporation Nashik Election Results 2026 : नाशिकमध्ये पुन्हा इंजिन धावणार की?
नाशिक महापालिकेवर भाजपाकडून दावा केला जात आहे. यासोबतच मनसे पुन्हा नाशिकमध्ये गड राखणार का? हे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : EVM मशीन घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग
EVM मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागे ठाकरेंच्या सेनेकडून बाईकवरून पाठलाग. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क.. EVM मशीन स्ट्रॉंगरूम पर्यत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवडीतील गाडयांचा केला पाठलाग
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : शिंदेंच्या गेम नक्की केला कोणी?
राज्यातील सर्वाधिक चर्चेत ठरलेली निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची आहे. प्रत्येकाकडून या महापालिकेवरील सत्तेवर दावा केला जात आहे. एकमतच्या एक्झिटपोलनुसार, मुंबई महापालिकेवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल. मात्र, ठाकरेंपेक्षा कमी उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून येतील. यावरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे की, शिंदेंचा गेम नक्की केला कोणी?
-
BMC Mahapalika Election Results : राज ठाकरे यांची ती एक चूक ठरणार मोठी?
राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज मतमोजणी आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येते याच्यावर राज्याच्या नजरा आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली. मात्र, एक्झिटपोलनुसार, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात येत नाही.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : 15 हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरणार..
आज राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 10 वाजता निकालाला सुरूवात होईल. तब्बल 15 हजाराहून अधिक उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात…
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर एक एक करून निकाल हाती येतील. राज्यातील 29 महापालिकांची मतदान मोजणी सुरू होईल.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई पालिकेची सत्ता ठाकरेंच्या हातून जाण्याचा अंदाज, थेट एक्झिटपोलने उडवली खळबळ…
एक्झिटपोलनुसार, मुंबईची सत्ता ठाकरेंचा हातून जाणार असल्याचे दिसत आहे. देवा भाऊ मुंबई महापालिकेवर आपला झेंडा लावतील, असे चित्र आहे.
-
Mumbai Municipal Election Results 2026 : एक्झिटपोलनुसार मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का…
एक्झिटपोलनुसार मोठा धक्का ठाकरे बंधूना बसताना दिसत आहे. 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेतून जाताना दिसत आहे.
-
Maharashtra Election Results 2026 : पिंपरी चिंचवडच्या निकालाकडे राज्याच्या नजरा…
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाविरोधात अजित पवार गट लढताना दिसत आहे. यासोबतच भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप करताना अजित पवार दिसले.
-
Maharashtra Municipal Election Results 2026 : 8 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात..
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल आज लागणार असून 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचा नजरा आहेत.
-
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
सोलापूर महापालिकेसाठी आज मतदान पार पडले आहे. याचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख यांच्या मुलाच्या विजयाचे बॅनर लागले आहे. ‘आम्ही भावी नाही पर्मनंट’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
-
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
मतदार यादीत नावे असूनही आणि वेळेत मतदान केंद्रावर प्रवेश करूनही तसेच अडीच तास रांगेत उभे राहूनही दोन महिलांना मतदानापासून वंचित रहावे लागले. 18 व्या क्रमांकाचे बूथ चे टोकन दिले , मात्र मतदान 15 क्रमांकाचे बूथमध्ये होतं, तिकडे गेल्यावर मतदान प्रक्रिया संपली होती.जळगाव शहरातील प्रभाग 1 मधील गेंदालाल मिल परिसरातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
-
संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार – किशोर शितोळे
प्रभाग रचना करताना आम्ही आधीच आक्षेप नोंदवले होते. मात्र प्रत्यक्षात पत्नीचे मतदान एका प्रभागात, तर पतीचे दुसऱ्या प्रभागात झाले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मतदानासाठी पाठवण्यात आले, हे गंभीर आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणूक आयोगाने असे का केले, याचा तपास झाला पाहिजे. याबाबत आम्ही अधिकृत तक्रार करणार आहोत असे किशोर शितोळे यांनी म्हटले आहे.
-
ठाण्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद
ठाण्यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झाला आहे. उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्याने अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी त्यांना जाब विचारला आहे. पोलिसांना तक्रार करताच पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले आहेत.
-
BMC Election Exit Poll 2026 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊनही मनसेच्या पदरी निराशाच…
एक्झिटपोलनुसार, मनसेच्या पदरी निराशाच बघायला मिळत आहे. येणाऱ्या आकडेवारीनुसार, मनसेचा फार काही कामगिरी करताना आली नाहीये. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही फार काही धमाका करताना आली नाही.
-
Mumbai Election 2026 Exit Poll Results LIVE : एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत थेट धक्का…
एक्सिस माय इंडिया पोलनुसार, मुंबई महापालिकेत
भाजप-सेना – 131-151 ठाकरे-मनसे-पवार -58-68 काँग्रेस-वंचित -12-16 इतर – 6-12
भाजपला 42 टक्क्याहून अधिक वोट ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार इतरांना 13 टक्के वोट मिळणार
-
PCMC Election Exit Poll 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा ठरतोय सर्वात मोठा पक्ष..
पिंपरी-चिंचवड
भाजप – 64 शिवसेना- 09 राष्ट्रवादी – 51 शरद पवार – 02 काँग्रेस -01 मनसे – 01
-
Kolhapur Election Exit Poll 2026 : कोल्हापूरमध्ये महायुतीची सत्ता…
एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. राज्यातील 29 महापालिकेसाठी आज मतदान झाले..
-
BMC Election Exit Poll 2026 : ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का…
एक्झिटपोल पुढे येत असून जनमत एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिकेत पवार आणि ठाकरे बंधुंच्या मिळून जागा 58 ते 65 च्या मध्ये येण्याची शक्यता पोलनुसार आहे.
-
BMC Election Exit Poll 2026 : शिवसेना ठाकरे गटासोबतच मनसेला थेट धक्का…
पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईत भाजपाची थेट सत्ता. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिली आहे.
-
BMC Election Exit Poll 2026 : भाजपा शिवसेना शिंदे गटाची बाजी, एक्झिटपोलनुसार मोठा अंदाज…
शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मिळून मुंबईमध्ये 138 जागा येण्याचा अंदाज एकमत एक्झिटपोलनुसार, येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेवर थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल.
-
Maharashtra Municipal Election 2026 : मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता..
जनमतच्या एक्झिटपोलनुसार, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असून ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे. थेट भाजपा शिवसेनेच्या हाती सत्ता पोलनुसार दाखवण्यात आली आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : छत्रपती संभाजी प्रभागनगरच्या प्रभाग क्रमांक 23 मधील पुंडलिक नगर मतदान केंद्रावर गोंधळ.
साडेपाच पर्यंत मतदार गेटमध्ये आल्यानंतरही केंद्रप्रमुखाने मतदानास मज्जाव केल्याचा आरोप. भाजपाचे उमेदवार प्रदीप राठोड यांनी मतदान अधिकाऱ्याला विचारला जाब. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदार केंद्रावर रांगा.
-
सोलापुरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले
भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. भाजपानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील फोडले फटाके. आम्ही समोरच्या दिशेने येत असताना भाजपाचे काही कार्यकर्ते फटाके फोडत होते. त्यामध्ये आमचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आले मात्र किरकोळ वाद होता. भाजप नेत्यांना सत्तेचा गर्व आला आहे त्यामुळे ते असे वागत आहेत
-
Maharashtra Municipal Election 2026 : राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, थेट म्हणाले, शाई…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान मतदानानंतर बोटावरची शाई मिटली जात असल्याचा आरोप केला जात आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, सॅनिटायझरने बोटावरील शाई मिटली जाते.
-
मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून मतदान केंद्राच्या बाहेरच आंदोलन
मतदान केंद्राच्या बाहेर आंदोलनकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील महानगरपालिकेची अनाजी वस्ती शाळा मांजरी येथे बोगस मतदान झाल्याने संतप्त मतदारांचे मतदान केंद्राबाहेर आंदोलन..
-
Maharashtra Mahapalika Election : मतदान केंद्रावरील फोटो शेअर केल्याने गुन्हा दाखल…
मतदान केंद्रावरील फोटो शेअर करणे मतदाराला चांगलेच महागात पडले असून थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : धुळे महानगरपालिकेच्या अवधान गावातील मतदान केंद्रात प्रचंड मोठी गर्दी.
हजारो मतदार दुपारून मतदान करण्यासाठी पडला बाहेर… अवधान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मतदारांनी फुल.. सकाळी होता मतदारांमध्ये निरुत्साह..दुपारनंतर मात्र हजारो मतदारांची मतदान करण्या साठी मोठी गर्दी..
-
पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप
जळगावमध्ये प्रभाग 5 मधील अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप. वसंत सोनवणे असे मारहाणीत जखमी झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्याचे नाव आहे. गोंधळ सुरू असताना काय झाले हे पाहण्यासाठी गेलो असता अपक्ष उमेदवार पीयूष यांच्यासह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप..वसंत सोनवणे हे जखमी झाले आहे दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-
सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार टाकला
जुळे सोलापूर परिसरातील 1500 मतदारांनी बहिष्कार घातला. प्रभाग क्र. 26 मधील मतदारांनी हा बहिष्कार घातला आहे. रुबी नगर ते अमोल नगरपर्यत रस्ता केला जात नसल्याने मतदार आक्रमक. जोपर्यंत रस्ता करणार नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा ईशारा
-
Maharashtra Election 2026 : हातावरील शाई जाण्याच्या मुद्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात जुंपली
हातावरील शाई जाण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट, मनसे यांच्यात जुंपली असून गंभीर आरोप केली जात आहेत. ठाकरेंच्या आरोपाला भाजपाने थेट उत्तर दिले.
-
Maharashtra Municipal Election 2026 : आशिष शेलार यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच थेट सांगितला निकाल…
आशिष शेलार यांनी म्हटले की, मुंबईत 50 पेक्षा जास्त ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे डिपोर्झिट जाणार. निवडणुकीच्या निकालापूर्वीच त्यांनी हे विधान केले.
-
त्यांच्या बुद्धीत हेराफेरी, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर यांच्यावर संतापले आशिष शेलार..
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार यांनी म्हटले की, त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे.
-
मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य का? आशिष शेलार यांचा थेट सवाल…
मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का? हा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
-
Maharashtra Election 2026 : अखेर निवडणूक आयोगाने मान्य केली ती मोठी चूक
दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, मी मान्य करतो की, 2 टक्के EVM मध्ये बिघाड झाला आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 10 वर्षात नवीन मशीन खरेदी केल्या नसून या मशीन जुन्या झाल्या आहेत.
-
Maharashtra Mahapalika Election : निवडणूक आयोग करणार थेट कारवाई
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, खोटे व्हिडीओ किंवा एडीट करून व्हायरल केली जात असतील तर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. तसे निर्देशही देण्यात आली आहेत.
-
केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरली आहे- निवडणूक आयुक्त
नुकताच निवडणूक आयोगाने मोठा खुलासा करत निवडणूक आयोगाने सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरतो आणि ती शाई योग्यच आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला थेट निवडणूक आयुक्तांचे उत्तर
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट उत्तर दिले असून त्यांनी म्हटले की, सत्ताधाऱ्यांना कोणतीही मदत केली जात नाही. चुकीच्या गोष्टी सेट केल्या जात आहेत.
-
Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार पद? घडामोडींना प्रचंड वेग…
नुकताच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केली आहेत. सत्ताधारी पक्षाचे काम निवडणूक आयुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्ाचा आरोप केला जात आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : रश्मी ठाकरे यांनी दाखवला शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.
-
निवडणूक आयोगाचा स्टाफ दररोज काय करतो? उद्धव ठाकरेंचा मोठा प्रश्न…
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता. केलं काय. मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही मानत आहात.
-
Maharashtra Municipal Election 2026 : निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगितले निवडणुकीचा निकाल…
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक हारले आहेत, त्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत. निवडणूक पूर्ण होण्यापूर्वीच मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले…
-
निवडणूक आयुक्तांना निलंबित करा- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी थेट म्हटले की, राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. ते फुकटचा पगार घेत असल्याचा त्यांनी आरोप केला.
-
Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांचा अत्यंत गंभीर आरोप
निवडणूक जिंकण्यासाठी आटापीटा केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असून यादरम्यान त्यांनी बोटावरीला शाई पुसली जात असल्याचा आरोप केला.
-
Nagarsevak Election 2026 : शाई पुसून मतदान करता येणार नाही- राज्य निवडणूक आयोग…
शाई पुसून मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शाई पुसली जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : दानवेला अक्कल नाही… चंद्रकांत खैर यांचा चढला पारा…
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका करत चंद्रकांत खैरे यांनी म्हटले की, अंबादास दानवेला अक्कल नाही…
-
Maharashtra Election 2026 : एकनाथ शिंदे यांनी केले कुटुंबासह मतदान
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहन देखील लोकांना केले.
-
Nagarsevak Election 2026 : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंसह काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरे यांचे राजकारण काही दिवसांचे राहिले आहे त्यामुळे ते तशी वक्तव्य करत आहेत. उद्धव ठाकरेंना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते असे वक्तव्य करत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांना माझे आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या उमेदवारांची किमान नावे सांगावीत. खासदार प्रणिती शिंदे या राहुल गांधींना खुश करण्यासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात
-
Maharashtra Mahapalika Election : कल्याण पूर्व प्रभाग 18 मध्ये मतदानावेळी ईव्हीएम बंद
कल्याण पूर्व नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान अडथळा. महानगरपालिकेच्या प्रबोधन बाळासाहेब ठाकरे शाळेतील ईव्हीएम मशीन अचानक बंद. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये काही काळ संभ्रम व गोंधळ. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती व मतदान पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
-
Maharashtra Municipal Election 2026 : राज ठाकरेंचा आरोप, सचिन सावंतांचा खळबळ उडवारा व्हिडीओ…
मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यादरम्यानच नेते सचिन सावंत यांनी थेट शाई पुसली जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला.
-
नाशिकच्या सावता नगर परिसरात पैसे वाटत असल्याच्या अफवेने नागरिकांची गर्दी
सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालय बाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांकडून आरोप. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा बडगुजर यांच्या कार्यालय बाहेर गोंधळ. मुकेश शहाणे प्रभाग सोडून बडगुजर यांच्या कार्यालयावर चालून आल्याने झाला गोंधळ
-
Maharashtra Mahapalika Election : निवडणूक अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे वाद
टिटवाळा प्रभाग क्रमांक 3 मध्ये ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावात गोंधळ. शरद पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव चुकीने शेख अप्पाराव वाकोडे असे नमूद. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप. या प्रभागात भाजप, उद्धवसेना, वंचित आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात. निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी, कायदेशीर लढ्याचा इशारा — शेखर अप्पाराव वाकोडे
-
Maharashtra Municipal Election 2026 : जळगाव मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण
जळगाव शहरातील आर. आर. महाविद्यालय मतदान केंद्रावर प्रभाग तणावाचे वातावरण. मतदान सुरू असताना दोन गटात वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. बोगस मतदार पकडून त्याला चोप देण्यात आला होता, यानंतर या ठिकाणी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.अपक्ष उमेदवार पियुष पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णू भंगाळे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
-
Maharashtra Election 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत 16.03 टक्के मतदान
पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीत 11:30 वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान झाले आहे. सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडलीत असा अंदाज आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या आई-वडिलांसह मतदानाचा अधिकार बजावला आहे नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन महाविद्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर हेमंत पाटील यांनी हा मतदानाचा अधिकार बजावला आहे. मागील 74 वर्षापासून नांदेड शहरामध्ये असलेली एकाधिकारशाही या निवडणुकीमध्ये मोडीस निघेल असा विश्वास यावेळी हेमंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे
-
Maharashtra Municipal Election 2026 : रोहित पवार बनले अजित पवारांचे कैवारी, थेट पणे भाजपाला…
रोहित पवार पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले असून त्यांनी थेट अजित पवारांची बाजू घेत आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपावर टीका केली. लांडगेंची दहशत संपणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
-
Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदान केंद्रांवर
मुंबई महापालिकेच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे.
-
माजी नगरसेवक दिनकर आढाव बसलेल्या गाडीत सापडले पैसे
नाशिकच्या प्रभाग 17 माजी नगरसेवक दिनकर आढाव बसलेल्या गाडीत सापडले पैसे. भरारी पथकाची कारवाई, फॉर्च्युनर गाडी जमा. निवडणुकीत पैसे दिल्या प्रकरणी कारवाई .
-
राज ठाकरे यांनी केलेल सर्व आरोप खोटे, देवेंद्र फडणवीसांनी थेट पाडले तोंडावर…
मतदानाची नवीन पाडू मशीनबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला सांगण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हे आरोप चुकीचे आहेत. सर्व राजकीय पक्षांना ही मशीन दाखवण्यात आली होती.
-
महाराष्ट्राची जनता विकासाच्या पाठीमागे- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टिकेवरही उत्तर दिले.
-
Maharashtra Mahapalika Election : मतदानाचा हक्का बजावताच अमृता फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाल्या…
सर्वात महत्वाची महापालिका निवडणूक नागपूरची आहे. सर्वात मोठा मुद्दा विकास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले.
-
Municipal Corporation Nagpur Election 2026 : जळगाव बोगस मतदानाच्या आरोपातून एका तरुणाला देण्यात आला चोप
पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे तरुण थोडक्यात बचावला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कडे निघाले आहेत. बोगस मतदानासाठी आलेला तरुण चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे प्राथमिक माहिती
-
Maharashtra Mahapalika Election : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या आणि शिवसेनेच्या उमेदवार दर्शना झोल यांनी देखील बजावला मतदानचा हक्क. शहरातील भाग्यनगर येथील मतदाना केंद्रावर अर्जुन खोतकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत थांबत खोतकर कुटुंबियांनी बजावला मतदानचा हक्क. मतदानाला जाण्यापूर्वी खोतकर यांच्या पत्नीकडून करण्यात आले औक्षण. जालना महापालिकेत आमचंच बहुमत येईल असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला
-
Municipal Corporation Nashik Election 2026 : नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
शिवसेना शिंदे यांच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण दाबल्यानंतर ईव्हीएम मध्ये भाजपचा लाईट लागत असल्याचा दावा. मतदारांकडून देखील संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकवलं जात असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आरोप. प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ
-
Jalgaon Election Poll Percentage : जळगाव महानगरपालिका निवडणूक तब्बल इतके टक्के मतदान
जळगाव महानगरपालिका निवडणूक. सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत मतदान. पुरुष मतदान = 14494, स्त्री मतदान = 9654, एकूण मतदान = 24148. टक्केवारी = 5.5%
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले
धरमपेठ प्राथमिक शाळेतील बूथ वर करणार मतदान. यावेळी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस मतदान केंद्रावर पोहोचल्याचे बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : पाडू मशीनवरून राज ठाकरे यांचा गंभीर आरोप…
पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आली नसल्याचा नुकताच गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमध्ये पाडू मशीनवर निवडणुका घेतल्या जात आहेत.
-
Municipal Corporation PCMC Election 2026 : अजित पवारांच्या मदतीला धावून आले रोहित पवार…
भ्रष्टाचारावर अजित दादा बोलले, कुणाला लक्ष केलं नव्हतं. आमदारमहेश लांडगे अजित दादांना एकेरी बोलल्याने आमचं मतदान वाढलं. भाजपच मतदान राष्ट्रवादीकडे वळल. लांडगे यांची दहशत आहेच. भाजपला मिरची लागली आहे. वातावरण एवढं फिरेल अस वाटलं नसेल नागरिकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. सत्तेत असल्याने भाजपला हंकार, पैशांचा माज होता. भाजप नेत्यांच्या मनात आता भीती आहे. भाजप आधी सव्वाशे पार नार दिला होता. आता केवळ महापौर म्हणतायत…
-
Nagpur Election Poll Percentage : नागपूरमध्ये पहिल्या दोन तासात 7 टक्के मतदान
नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026. सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 7 टक्के नोंदवली गेली आहे.
-
महानगरपालिकेतील मतदान प्रक्रिया शांततेत- पोलीस आयुक्त प्रवीण पवार
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील मतदान हे शांततेत सुरू आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई असताना मोबाईल नेणारे 25 ते 30 मोबाईल जप्त केले आहेत. पैसे वाटपाच्या तक्रारी संदर्भात पोलिसांनी शहानिशा केली असून असा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
-
Nagarsevak Election 2026 : राज ठाकरे पोहोचले मतदानासाठी
राज ठाकरे सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित दिसत आहे.
-
पिंपरी चिंचवडमध्ये कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ
महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर हे थेट आरओच्या गाडीसमोर बसले. यामुळं तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि बोगस मतदान होतंय. असा आरोप यावेळी करण्यात आलाय. निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा वापर करतायेत असा आरोप ही करण्यात आला
-
Maharashtra Municipal Election 2026 : राज्य निवडणूक आयोगाकडून अत्यंत मोठी चूक…
बोटावरील शाई पुसली जात असल्याचे नुकताच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मान्य केले असून मार्कर पेन आयोगाकडून देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
-
Maharashtra Mahapalika Election : शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार..
मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला असून बोटावरील मार्कर खून पुसली जात असल्याचे मनपाने मान्य केले आहे. ही मार्कर पेन आयोगाकडून दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
-
Maharashtra Municipal Election 2026 : मनसे नेते अविनाश जाधव यांची निवडणूक अधिकाऱ्याविरोधात तक्रार
शिंदेंच्या शिवसेनेचे चिन्ह स्पष्ट दिसणारे बॅनर झळकत असल्याचा आरोप. वागळेतील निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्या विरोधात ऑनलाइन तक्रार दाखल. निवडणूकआचारसंहितेचा भंग करत करत असल्याची तक्रार. निवडणूक आयोग शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप
-
Municipal Corporation Pune Election 2026 : पुण्यात पहिल्या दोन तासांमध्ये 5.50 टक्के मतदान..
सकाळी मोठी गर्दी मतदान केंद्रावर बघायला मिळाली. आता पहिल्या दोन तासांच्या मतदानाची आकडेवारी पुढे येताना दिसत असून पुण्यात दोन तासांमध्ये 5.50 टक्के मतदान झाले आहे.
-
Maharashtra Municipal Election 2026 : भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची
भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली आहे. ठाकरे गटाच्या भगवा गार्डला पोलिसांनी 100 मीटरच्या दूर जाण्याच्या सूचना दिल्या असता वाद पेटला.
-
Nagarsevak Election 2026 : चंद्रकांत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..
चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सांगलीत भिडे गुरूजी यांनीही मतदानाचा हक्का बजावला आहे.
-
Maharashtra Election Poll Percentage : मतदानाचा अधिकार बजावताच प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप…
खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यादरम्यान माध्यमांसोबत बोलताना अत्यंत गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केले असून भापजाकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-
Maharashtra Election Poll Percentage : भाजपावर शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर आरोप
इंचलकरंजीत भाजपाने पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरेच्या शिवसेनेने केला आहे. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण मतदान केंद्राबाहेर बघायला मिळाले.
-
मतदान केंद्रांबाहेर लागल्या मतदारांच्या रांगा..
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला सुरूवात झाली असून मतदानाचा हक्का बजावण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून मोठी रांग मतदार केंद्राबाहेर बघायला मिळत आहे.
-
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये, ईव्हीएम मशीन बंद..
सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद. सकाळपासून मशीन बंद झाल्याने मतदान ठप्प. प्रभाग क्रमांक 20 मधील खोली क्रमांक चार मधील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड. मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा
-
Maharashtra Municipal Election 2026 : अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बजावला मतदानाचा अधिकार…
अभिनोत्री हेमा मालिनी यांनी नुकताच त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला आहे. लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे हेमा मालिनी यांनी म्हटले असून सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी मतदान करा असे त्यांनी म्हटले.
-
Municipal Corporation pune Election 2026 : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा अधिकार..
पुण्यातील वानवडी साळुंखे विहार प्रभागातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. वानवडीतील विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी मतदान केंद्रावर येत, लाईन मध्ये उभं राहात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे..त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निश्चित विजय होईल असं त्यांनी म्हंटलंय..
-
सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला संपूर्ण कुटुंबासोबत मतदानाचा अधिकार…
सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पोहोचले आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत.
-
Maharashtra Election Poll Percentage : भाजप आणि इतर सर्व उमेदवारांमध्ये मोठा राडा
भाजपच्या उमेदवारा विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांची निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार. सिडको एन 4 मधील संतवीरा या मतदान केंद्रावर गोंधळ. पोलिंग बूथ वर दिलेल्या पोलचीट वर भाजपचे चिन्ह आणि कोडींग असलेले टी-शर्ट घातल्याने दोन्ही शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी भाजपवर घेतला आक्षेप.
Published On - Jan 16,2026 6:43 AM
