विमानात चुकूनही या 5 वस्तू घेऊन जाऊ नका, अन्यथा होईल जेल

Created By: Atul Kamble

2 March 2026

विमानप्रवासाचे नियम कठोर असतात. BCAS आणि DGCA चे नियम पाळावेच लागतात.काही प्रतिबंधित वस्तू कॅरी ऑन वा चेक-इनमध्ये आढळल्या तर सामान जप्त होण्यासोबत जेल देखील होऊ शकते. 

पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन, पेंट थिनर वा गॅसशी संबंधित पदार्थ विमानात नेण्यास मनाई असते. कारण त्याने आग लागण्याची शक्यता असते.

 फायरवर्क्स, फटाखे वा कोणताही स्फोटक साहित्य सुरक्षेच्या नियमांतर्गत संपूर्णपणे बॅन आहे.

 चाकू,कात्री वा कोणतीही टोकदार वस्तू हँड बॅगेत घेऊन जाऊ शकत नाही. काही प्रकरणात चेक-इन बॅगमध्ये देखील याची परवानगी दिली जात नाही.

 डॅमेज पॉवर बँक वा बॅटरीने आग लागण्याचा धोका असतो. यासाठीचे नियमही वेगवेगळे आणि कठोर आहेत.

 विमानात तुम्ही जास्त कॅश घेऊन जाऊ शकत नाही. एअरपोर्टवर ठराविक मर्यादेपलिकडे कॅश घेऊन जाऊ शकत नाही. जर रक्कम संशयित वाटली तर तुमची तपासणी होऊ शकते आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो.