पोटाची चरबी वितळवायची असेल तर हे उपाय येतील कामी

Created By: Atul Kamble

01 March 2026

लठ्ठपणा आजची ज्वलंत समस्या बनली आहे. बारीक होण्यासाठी लोक तासन् तास जिममध्ये वेळ घालवत असतात.

 जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर रोज सकाळी काही ड्रिंक्स प्यायल्याने पोटाची चरबी वितळू शकते आणि शरीर देखील डिटॉक्स होईल

लिंबू आणि मध याचे मिश्रण असलेले पाणी अनेक सेलिब्रिटी सकाळी पितात.यामुळे शरीर हायड्रेट होत आणि बेली फॅट कमी होते. यात व्हिटामिन सी असते. 

कसे बनवाल - कोमट पाणी घ्या, त्यात एक चमचा मध टाका, अर्धा लिंबू रस मिक्स करा नंतर हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या

जिरे पाणी - जिऱ्यात फायबर, व्हिटामिन ए,सी,ई असते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे तत्वे असतात.

कसे बनवाल- जिऱ्याला एक ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे, सकाळी गाळून हे पाणी कोमट करुन प्यावे

दालचिनी पाणी - दालचिनीत सिनामाल्डिहाईड नावाचे तत्व असते. जे आरोग्यस चांगले असते. दालचिनीचे पाणी चरबी कमी करते.

 कसे बनवाल - दालचीनी रात्रभर एक ग्लासभर पाण्याती भिजवावी आणि सकाळी हे पाणी प्यावे, याशिवाय दालचीनी चहा वा पाण्यात उकळवून प्यावी