बीपी लो झाला असेल तर काय खावे ?

Created By: Atul Kamble

01 March 2026

लो ब्लड प्रेशरमध्ये चक्कर येते, कमजोरी आणि थकवा जाणवतो. योग्य वेळी योग्य आहार घेतल्यानंतर रक्तप्रवाह चांगला होतो. बीपी संतुलनात मदत मिळते.

 लो ब्लडप्रेशर झाले तर मर्यादित प्रमाणात मीठ, सुप, ताक वा मठ्ठा घेतल्याने सोडियमची पातळी सुधारते. ब्लडप्रेशरला अचानक घसरण्यापासून हे वाचवते.

पुरसे पाणी पिणे, नारळ पाणी आणि ओआरएस घेतल्याने डिहायड्रेशन होत नाही. शरीरात संतुलन कायम राहाते. ज्यामुळे लो बीपीची लक्षणे कमी होतात.

केळी, संत्री, डाळिंब, बीट आणि पालक सारखे पर्याय फायद्याचे असतात. यातील पोषक तत्वांनी ब्लड फ्लो चांगला राखण्यास मदत मिळते.

डाळी, दूध, दही, अंडी आणि पनीर सारखे प्रोटीन सोर्स शरीराला ताकद देतात. नियमित सेवन केल्याने कमजोरी घटते आणि बीपी स्थिर  राखण्यास मदत होते.

एकदम जेवण्याऐवजी दिवसभरात काही अंतराने थोडे-थोडे खाल्ल्याने चांगले वाटते. त्यामुळे अचानक बीपी घसरण्याचे प्रमाण कमी होते आणि एनर्जी कायम रहाते. 

चहा वा कॉफी मर्यादित घेतल्याने काही काळ बीपी वाढू शकतो. मात्र जास्त सेवनापासून दूर राहावे. त्यामुळे घाबरणे, अस्वस्थता आणि झोपेची समस्या होणार नाही.