व्हिटामिन्स E चे फायदे काय ? कोणत्या पदार्थात असते ?
Created By: Atul Kamble
01 March 2026
व्हिटामिन ई हे त्वचेचे पोषण करते त्यावर सुरुकत्या पडू देत नाही.केसांसाठी ते फायद्याचे असते. ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवते. हृदय, डोळ्यांचे आरोग्य चांगले राखते. इंफ्लामेशनपासून लढण्यास मदत करते.
व्हिटामिन्स ई अनेक फळ आणि भाज्यात आढळते. नट्स आणि सीड्स त्याचा चांगला सोर्स आहेत. असे 5 नट्स आणि बिया पाहूयात ज्यात व्हिटामिन ई जास्त असते.
हेल्थलाईनच्या मते १ औंस सुर्यफुलांच्या बियात ७.४ मिलीग्रॅम व्हिटामिन्स ई असते. जे तुमच्या रोजच्या गरजेच्या ४९.५ टक्के आहे. तुम्ही या बिया भाजून थेट खाऊ शकता.
१ औंस बदामात सुमारे ६.८ मिलीग्रॅम व्हिटामिन्स ई असते. जे रोजच्या गरजेच्या ४५ टक्के आहे.
जर तुम्ही १ औंस म्हणजे सुमारे २८.३५ ग्रॅम रोस्टेड हेजल नट्सचे सेवन करत असाल तर तुम्हाला ४.३ मिलीग्रॅम व्हिटामिन्स ई मिळते. जे रोजच्या गरजेचे २९ टक्के आहे.
पाईन नट्स ज्याला चिलगोजा म्हटले जाते. १ औंस पाईन नट्समध्ये २.९ मिलीग्रॅम असते. जे शरीराच्या रोजच्या गरजेचे २० टक्के आहे.
१ औंस भुईमुगाच्या शेंगात २.२ मिलीग्रॅम व्हिटामिन्स ई असते. जे शरीराच्या रोजच्या गरजेचे १५ टक्के असते.