2 मार्च 2026
Created By: संजय पाटील
श्रीलंकेचा दासुन शनाका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. दासुनने 23 सामन्यांमध्ये 21 षटकार खेचले आहेत.
शनाका याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा विराजमान आहे. रोहितने 14 सामन्यांमध्ये 19 षटकार लगावले आहेत.
इंग्लंडच्या जोस बटलर याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 14 सामन्यांत 17 षटकार लगावले आहेत.
विंडीजच्या ख्रिस गेल याने कर्णधार म्हणून 9 सामन्यांत 17 षटकार लगावले आहेत.
भारताचा महेंद्रसिंह धोनी याने कर्णधार असताना 33 सामन्यांमध्ये 16 षटकार लगावले होते.
स्कॉटलँडच्या रिची बेरिंग्टन याने कर्णधार म्हणून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 12 सामन्यांत 12 षटकार लगावले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 12 षटकार लगावले आहेत.