पिंपरी - चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026
देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका ( स्थापना१९८२ ) इ.स. १९८६ साली महानगरपालिकेत रुपांतरीत झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मागील निवडणूक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली आहे.आता पावणे नऊ वर्षांनी या महानगर पालिकेची निवडणुक होत आहे. यावेळीही चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी ही निवडणूक ह़ोत आहे.
Laxman Hake: माना वा नका मानू पण ओबीसींनी पवारांना… लक्ष्मण हाके यांनी भात्त्यातून बाण काढलाच, काय दिला इशारा
Laxman Hake Criticized Sharad Pawar And Ajit Pawar: पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. नेमका तोच धागा पकडून प्रा.लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तर त्याचवेळी त्यांनी एक मोठा इशाराही दिला आहे.
- Reporter Sambhaji Munde
- Updated on: Jan 27, 2026
- 12:33 pm
आता थेट कायदा हातात घ्यायचा, ZP निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा एल्गार, निवडणूक अधिकाऱ्याला…
Ajit Pawar NCP: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या दोन्ही ठिकाणी बहुमतापासून राष्ट्रवादी दूर राहिली. त्याचवेळी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शड्डू ठोकले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 22, 2026
- 11:02 am
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी सस्पेन्स वाढवला, राजकीय भूकंप होणार?
Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील महापालिकेतील दारुण पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्यातच निकालानंतर अजितदादांनी पुण्यात थेट शरद पवार यांची भेट घेतली. राज्यात काय घडतायेत मोठ्या घडामोडी, काय म्हणाले अजितदादा?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 17, 2026
- 1:33 pm
Sharad Pawar-Ajit Pawar: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊनही काहीच करू शकले नाही, पवार कुटुंबाचं भविष्य काय असेल?
Sharad Pawar-Ajit Pawar: या महापालिकेत ठाकरे ब्रँडच्या पराभवापेक्षा ठळक चर्चा झाली ती पवारांची पॉवर कमी झाल्याची. पुतण्याचे उगवतीचे नेतृत्व आणि काकांचे मावळते नेतृत्वाचे रंग पुसत चालल्याची चिंतेने पुण्यातील राष्ट्रवादीच्या आकाशात काळोख झाला आहे. या पराभवाचे चिंतन होईलच. पण राष्ट्रवादीची दिशा काय असेल, या दोन शकलं असलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राजकीय भूकंप होईल का? याची चर्चा सध्या रंगली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 17, 2026
- 11:42 am
Pimpari – Chinchwad Result : शरद पवारांच्या तुतारीचा आवाज बंद! अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
महाराष्ट्र निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गट शून्य जागांवर आहे, तर पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने पुण्यात 110 जागांचा टप्पा गाठल्याचे दिसते. काँग्रेसला नऊ, शिंदे शिवसेनेला आणि मनसेला प्रत्येकी एक, तर दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 56 जागा मिळाल्या असून, मिरवणुकीदरम्यान लाठीचार्ज झाल्याची घटनाही घडली.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 4:55 pm
Maharashtra Municipal Election Results 2026 : पिंपरीमधून विलास लांडेंचे पुतणे पिछाडीवर
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या निकालात भाजप-शिंदे युतीने आघाडी घेतली आहे. पिंपरी प्रभाग ७ मधून विलास लांडेंचे पुतणे पिछाडीवर आहेत. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या योगिता कदम, मनसे आणि भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 12:40 pm
Pimpari Election Results 2026 : पिंपरीत पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी आघाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2026 च्या प्रारंभिक कलांनुसार, मुंबईतील 46 जागांच्या मतमोजणीत भाजप-शिंदे युतीने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पहिल्या कलांमध्ये मुंबईत भाजप-शिंदे युतीचे वर्चस्व दिसत आहे, तर मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचीही लक्षणीय आघाडी आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 10:19 am
Maharashtra Election Final Results Winners 2026 LIVE : उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026 LIVE Counting and Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर होणार. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 17, 2026
- 11:07 pm
PMC, PCMC, KMC Election Results 2026 LIVE : नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला पुणेकरांनी घरी बसवले; मुरलीधर मोहोळ बरसले
Pune Pimpri Chinchwad Kolhapur Ichalkaranji Solapur Sangli Election Results 2026 LIVE Counting in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागायला सुरूवात झाली आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सहा महापालिकांचा निकालही लागताना दिसत आहेत. पाच ते आठ वर्षानंतर या महापालिकांची निवडणूक झाली. त्याचे निकाल आज येत असून सर्वांना उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. खासकरून या महापालिकेत भाजपची कामगिरी कशी होते? याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकालाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट जाणून घ्या.
- manasi mande
- Updated on: Feb 9, 2026
- 11:23 am
PCMC Election Results 2026 LIVE : भाजपची सत्ता कायम राहणार का? पिंपरी चिंचवडकरांचा काैल नेमका कोणाला? जाणून घ्या
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काही वेळात हाती येईल. भाजपाची सत्ता कायम राहणार असा दावा केला जात आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:22 am
PCMC Election Results 2026 LIVE : अजित पवारांना थेट धक्का, भाजपाची तगडी फाइट..
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 12:55 pm
PCMC Election Results 2026 LIVE : राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? काय स्थिती, जाणून घ्या
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक दिवसांनंतर राज्यात अखेर महापालिकेच्या निवडणुका झाल्या. 29 महापालिकेचे निकाल हळूहळू पुढे येत आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:22 am