PCMC Election Results 2026 LIVE : पिंपरी चिंडवड महापालिका निवडणूक, भाजपा राष्ट्रवादीत तगडी फाइट..
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या.

राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. अनेक महापालिकांवर प्रशासकीय राज होते. शेवटी 29 महापालिकेच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करण्यात आली. 15 जानेवारी 2026 रोजी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागले. पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017 साली एकहाती भाजपाची सत्ता होती. मात्र, यंदाच्य निवडणुकीत संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रभाग क्रमांक 21 मध्ये मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीपर्यंत आहे. प्रभागातील मतदारांची संख्या एकून 40085 आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही एनसीपी एकत्र निवडणुका लढत असून भाजपासाठी हा मोठा झटका आहे. दुसरीकडे यामुळे प्रभाग 21 ची संपूर्ण समीकरणे बदलली आहेत.
प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगरपर्यंत असून मनपा हद्द व देहूरोड कॅन्टोमेंट हद्दीपासून निगडी-तळवडे शीवेच्या साई मंदिर व बुध्द विहारापासून पुर्वेस त्रिवेणी नगर रस्त्याने स्वामी विवेकानंद शाळेला जाणा-या रस्त्याच्या श्रीराम इंजि. वर्क्स गुरुदत्त सोसायटी सहयोगनगरपर्यंत आहे. प्रभाग 22 मध्ये 2017 च्या निवडणुकीच्या निकालानुसार, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता दिसते. तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे तर एक नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आले.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 वर भाजपचं वर्चस्व होते. मात्र, यावेळी ते वर्चस्व टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे असणार आहे. 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार वॉर्डांचा समावेश होता. भक्ती शक्ती परिसर, सेक्टर नंबर 24,25, 26, 27, केंद्रीय वसाहत या परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांची संख्या 36 हजार 947 एवढी आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 24 च्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 24 वर भाजप आणि शिवसेनेत तगडी फाइट दिसून झाली. या वॉर्डात मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आदी भागाचा समावेश आहे. प्रभाग 24 मध्ये 38 हजार मतदांची संख्या आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाल्हेकरवाडी, गुरुद्वार, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती, हा परिसर येतो तर उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईन आहे. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
