Tanushree Dutta : हा काय अश्लीलपणा…’आशिक बनाया आपने’ गाण्यावर तनुश्री दत्तानं दिलेली प्रतिक्रिया, निर्मात्याचा मोठा खुलासा
Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं 'आशिक बनाया आपने' गाण्यावर काय प्रतिक्रिया दिलेली, याबद्दल निर्मात्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी असतात, जी केवळ लोकप्रिय होत नाहीत, तर कलाकारांचं संपूर्ण करिअर बदलून टाकतात. असंच एक गाणं म्हणजे ‘आशिक बनाया आपने’. या गाण्यामुळे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा दडलेला आहे. नुकताच अभिनेता आणि दिग्दर्शक मेहमूद अली यांनी हा किस्सा सांगितला.
मेहमूद अली यांनी सांगितलं की, त्यांनी ‘चॉकलेट’ हा सिनेमा केल्यानंतर अभिनेता इम्रान हाश्मीसोबत त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याचदरम्यान इम्रानने त्यांना आपल्या एका मित्राबद्दल सांगितलं. हा मित्र ‘मर्डर’ सिनेमाचा असोसिएट डायरेक्टर होता आणि सिनेमातील गाण्यांसाठी त्याचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यानंतर मेहमूद अली आणि त्यांचे सहकारी त्या मित्राला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये गेले.
काय म्हणाले मेहमूद अली?
मेहमूद अली म्हणाले की, आम्ही ‘चॉकलेट‘ सिनेमा केला, त्यानंतर इम्रानसोबत चांगली मैत्री झाली. त्यानं सांगितलं की, माझा एक मित्र आहे, ‘मर्डर‘ सिनेमाचा असोसिएट डायरेक्टर आहे. त्यानं सिनेमातील गाण्यासाठी मोठं योगदान दिलंय. आम्ही मग ऑफिसमध्ये गेलो, त्यानं ‘आशिक बनाया आपने‘ सिनेमाची कथा सांगितली. ज्यावेळी, लंडनमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, तेव्हा आम्हाला असं वाटलं, काहीतरी चुकलंय. पण, मग लक्षात आलं आता आपल्याला सिनेमाचं टायटल ट्रॅक वाचवू शकेल. आम्ही गाण्यासाठी तनुश्रीला विचारलं. ती म्हणाली, ‘पॉर्न शूट करताय? रीलिज कुठे करणार?’ आम्ही तिला सांगितलं मग, ग्लॅमरसाठी करतोय. मग आम्ही ‘आशिक बनाया आपने‘ गाणं करायचं ठरवलं. कुणाल गांजावाला हे गाणं गाणार होता. पण, त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही हिमेश रेशमियाला विचारलं. त्या गाण्यानं हिमेश रेशमियाचं करिअर बनवलं.’ ‘पिंकविला‘ला दिलेल्या मुलाखतीत मेहमूद अली बोलत होते.
दरम्यान, ‘आशिक बनाया आपने’ हे गाणं प्रचंड गाजलं आणि तनुश्री दत्तालाही याच गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली.
