Video: रेल्वेच्या जेवणात सापडला भांडी घासायचा स्क्रबर, प्रवाशाने केला व्हिडीओ व्हायरल
3rd AC मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने जेव्हा पॅण्ट्रीकारमधून १५० रुपयांची व्हेज थाळी मागविली, तेव्हा त्यांना अंदाजही नव्हता की त्यांच्या जेवणात अशी वस्तू सापडेल...

रेल्वे प्रवासात मिळत असलेल्या अन्नाचा दर्जाबद्दल अनेकदा प्रवाशांच्या तक्रारी येत असतात. कधी जेवणात अळ्या सापडतात तर कधी आंबलेले जेवण पुरवले जाते. पेंट्रीकार तसेच रेल्वेच्या कंत्राटी टेकेदारांकडून हे अन्न पुरवले जात असते. आता रेल्वेत दिले जात असलेल्या अन्नाच्या दर्जाबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ट्रेनच्या 3AC कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी प्रश्न उभा राहिला आहे.
3rd AC मधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने जेव्हा पॅण्ट्री कारमधून १५० रुपयांची थाली खरेदी केली, तेव्हा त्याला अंदाजही नसेल की त्याच्या थाळीत भांडी घासायचा लोखंडी तारेचा काथ्या सापडेल. या घटनेमुळे प्रवाशाला मोठा धक्का बसला आहे.
अर्धे जेवण झाले होते…
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पाहाता येईल की प्रवासी आपल्या सीटवर बसून मोठ्या आवडीने जेवण करत होता. अर्धे जेवण संपल्याने त्यांनी जशी वाटीतून डाळ उचलली तर त्यात लोखंडी तारेची जाळी पडलेली होती. या तारेच्या जाळीला पाहून प्रवाशाला धक्काच बसला. या प्रवाशाने लागलीच याचा व्हिडीओ तयार केला. जेव्हा प्रवाशाने पॅण्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ही गोष्टी सांगितली. तर त्यांना या प्रकरणात येथेच मिटवण्याचा सल्ला दिला. सर तुम्ही ही थाळी सोडा आणि आम्ही तुम्हाला दुसरी थाळी आणून देतो असे या प्रवाशाला कर्मचारी समजावू लागले. मात्र, प्रवाशाने रिप्लेसमेंट घेण्यास साफ नकार दिला आणि रेल्वेच्या विरोधात तक्रार करण्याचा इरादा बोलून दाखवला.
सोशल मीडियावर हंगामा : 150 रुपयात लोखंडाचे न्युट्रिशियन
हा व्हिडीओ जसार सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तसा लोकांचा रागाचा पारा वाढला आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर अनेकांनी बोल सुनावले. युजर्सने रेल्वे सेवा आणि IRCTC च्या कॅटरिंग सेवेवर आपला राग काढला आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने टीका करत लिहिले की १५० रुपयाच्या डाळ – भाता सोबत लोखंडाचा एस्क्ट्रा न्युट्रिशियन मोफत दिला जात आहे. रेल्वेने निष्काळजीपणाची हद्द केली आहे.
येथे पोस्ट वाचा –
15636 ट्रेन में पेंट्री स्टॉप द्वारा खाना 150 में बेचा जा रहा है। साथ में खाने स्टील भी खिला रहे है बात करने हॉस्पिटल में भी भेजेंगे ।irctc आपका यही स्वच्छ रेलवे है IRCTC please 🙏🙏 @IRCTCofficial @RailwaySeva @AshwiniVaishnaw https://t.co/U8bhucqCjf
— amit awasthi (@amitawasth30825) November 10, 2026
दुसऱ्या एका युजरने लिहिले की जर हे चुकून पोटात गेले असते तर प्रवाशाच्या जीवावर बेतले असते. अशा पॅण्ट्रीकारचे लायसन्स तातडीने रद्द व्हायला हवे. अनेक लोकांनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करत म्हटले आहे की पॅण्ट्री कारमध्ये स्वच्छतेचे मानकांची कठोर तपासणी केली जायला हवी असे म्हटले आहे.
