AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया पॅनकेक; ट्राय करा ही चविष्ट आणि हेल्दी रेसिपी

मुलांच्या नाश्त्यासाठी रोज काय बनवावे, असा प्रश्न पडतो का? अशा वेळी कमी तेलात तयार होणारे सोया पॅनकेक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चविष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता मुलांना नक्की आवडेल.

मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया पॅनकेक; ट्राय करा ही चविष्ट आणि हेल्दी रेसिपी
Recipe for kidsImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Nov 11, 2026 | 6:09 PM
Share

मुलांच्या नाश्त्यासाठी रोज काय बनवावे, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. मुलांना नाश्त्यात रोज तेच तेच पदार्थ खायला दिले तर ते कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या आवडीसोबतच आरोग्याचीही काळजी घेणारे वेगवेगळे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. तुम्हालाही मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवायचा असेल, तर सोया पॅनकेकची ही रेसिपी नक्की ट्राय करा. सोयामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने हा नाश्ता पौष्टिक ठरू शकतो. विशेष म्हणजे कमी तेलात आणि कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी सोया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.

सोया पॅनकेक्स बनवण्यासाठी साहित्य

– १/४ कप सोया चंक्स – २ चमचे तांदळाचे पीठ – ३ चमचे बेसन – १/४ कप दही – बारीक चिरलेला कांदा – किसलेले गाजर – किसलेला कोबी – कोथिंबीर – २ हिरव्या मिरच्या – २ लसूण पाकळ्या – १/२ इंच आल्याचा तुकडा – २ चमचे तीळ – २ चिमूटभर ओवा – मीठ चवीनुसार

सोया पॅनकेक बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम सोया चंक्स भिजवा आणि फुलवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, दही, हिरवी मिरची, आले, लसूण घालून चांगले वाटून घ्या. आता एका भांड्यात सर्व बारीक चिरलेल्या आणि किसलेल्या भाज्या घ्या. त्यात सोया चंक्सचे मिश्रण मिक्स करा. तसेच बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, गरम मसाला, कोथिंबीर घाला. तसेच पांढरे तीळ घाला. सर्व चांगले मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडे

पाणी घालून जाडसर पिठ तयार करा

आता गॅसवर पॅन गरम करा. ते गरम झाल्यावर तेल घालून तयार केलेले पॅनकेकचे मिश्रण चमच्याने घेऊन थोडेसे पसरवा. लहान आकारातील असल्याने एका तव्यावर दोन ते तीन पॅनकेक बनवता येतात. खूप पातळ ठेवू नका. हे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करा.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान