PCMC Election Results 2026 LIVE : भाजपची सत्ता कायम राहणार का? पिंपरी चिंचवडकरांचा काैल नेमका कोणाला? जाणून घ्या
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काही वेळात हाती येईल. भाजपाची सत्ता कायम राहणार असा दावा केला जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली तर आज 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांचा अनेकांना फटका बसताना दिसतोय. 017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यंदा पूर्णपणे समीकरणे बदलली आहेत.
राष्ट्रवादीच्या कदम निकिता, वाघेरे उषा, आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम, भाजपचे वाघेरे संदीप बाळकृष्ण 2017 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीपर्यंत प्रभाग आहे. प्रभाग 21 वर भाजपाकडून दावा केला जात आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमाकं 22 काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगरपर्यंत आहे. यंदाच्या निवडणुकीत जोरदार लढत प्रभाग 22 मध्ये बघायला मिळाली. सर्वच पक्षांकडून या प्रभागावर दावा केला जातोय. प्रभाग क्रमांक 22 मध्ये एकूण 37738 मतदारांची संख्या आहे. 2017 च्या निवडणुकीत विजयी विनोद नढे, नीता पाडाळे, उषा काळे, संतोष कोकणे हे विजयी झाले होते. यंदा मात्र विजय कोणासाठीही सोप्पा नाही.
2017 मध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार वॉर्डांचा समावेश होता. या वॉर्डाच वाहतूक नगरी, भक्ती शक्ती परिसर, सेक्टर नंबर 24, केंद्रीय वसाहत या परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील एकूण लोकसंख्या 36 हजार 947 एवढी आहे. तर या प्रभागातील अनुसूचित जातींची संख्या 2,182 आणि अनुसूचित जमातींची संख्या 330 एवढी आहे. प्रभाग 23 मध्ये भाजपाचे वर्चस्व बघायला मिळाले.
प्रभाग 24 वर भगव्याचं वर्चस्व की कमळाचं वर्चस्व यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आदी भाग प्रभाग 24 मध्ये येतात. 24 मधील एकूण मतदार संख्या 38 हजार 779 एवढी आहे. प्रभाग 24 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये यंदा जोरदार लढत होती. मध्ये वाल्हेकर वाडी, गुरुद्वार, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती, उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईनपर्यंत प्रभाग आहे. भाजपाचे वर्चस्व सध्या प्रभाग 25 मध्ये बघायला मिळतंय.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
