AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayatollah Khamenei: इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे? ना कोणता फोटो, ना मृतदेह दफन केल्याचा पुरावा, सत्य काय?

Ayatollah Khamenei Big Update: खोमेनी यांच्या मृत्याला आता तीन दिवस उलटले आहेत. पण त्यांचा मृतदेह अद्याप समोर आलेला नाही, ना त्यांच्या अंतिम संस्काराची बातमी समोर आलेली नाही. डोृतनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी त्यांचा मृतदेह पाहिलाय असा दावा करण्यात येत आहे. काय आहे सत्य?

Ayatollah Khamenei: इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे? ना कोणता फोटो, ना मृतदेह दफन केल्याचा पुरावा, सत्य काय?
इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 03, 2026 | 4:33 PM
Share

Where is Ayatollah Khamenei Dead Body: सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या निधनानंतर इराणचे उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरू आहे. पण त्याचवेळी खोमेनी यांचा मृतदेह कुठे आहे, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. कारण खोमेनी ठार झाल्याचे वृत्त इराणी वृत्तवाहिन्यांवरून देण्यात आले. पण त्यांचा मृतदेह अथवा त्यांचे दफनविधी कुठेच दिसला नाही. शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या एका भीषण हल्ल्यात खोमेनी हे कुटुंबासह ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. खोमेनी हे सरकारी कार्यालयात असताना हा भीषण हल्ला करण्यात आला होता. त्यांचे सहकारी सुद्धा या हल्ल्यात ठार झाल्याचे मानल्या जात आहे. रेव्हेल्युशनरी गार्डचे प्रमुख मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा सलाहकार अली शमखानी यांच्यासोबत बैठक सुरू असतानाच मोठा स्फोट झाला. त्यात खोमेनी जागीच ठार झाले.

ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी पाहिले शव

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, स्ट्राईकनंतर खोमेनींचा मृतदेह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाहिला. खोमेनी यांचा मृतदेह छिन्न-विच्छन्न झाला होता. इमारतीच्या ढिगाऱ्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या मृतदेहाचा फोटो घेण्यात आला. तो फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवण्यात आला. हा फोटो कोणी आणि कसा काढला याची माहिती समोर येऊ शकले नाही.

कान मीडियानुसार, सुरुवातीला मोसादच्या गुप्तहेरांनी खोमेनींचा मृतदेह अगोदर ताब्यात घेतला. त्याविषयीचे कागदपत्रे तयार केली. त्यानंतर मृतदेह तिथेच सोडला. खोमेनींची ओळख पटवणारे सर्व कागदपत्रे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पाठवण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमाविषयी इराणने अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त दिलेले नाही. वक्तव्य केलेले नाही.

दफनविधी झाला की नाही?

अधिकृतपणे इराणने खोमेनी यांच्या अंतिम संस्कारविषयी कोणतीच माहिती समोर आणलेली नाही. खोमेनींचा दफनविधी झाला की नाही याविषयी पण सस्पेन्स कायम आहे. पण दोन चर्चा सुरू आहेत. पहिली चर्चा अशी आहे की त्यांचा अंतिम संस्कार तेहरानमध्ये होऊ शकतो. इराणचे पहिले सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी यांचा अंतिम संस्कार हा तेहरानमध्येच झाला आहे. तेहरानमधील बेहश्त-ए ज़हरा कब्रिस्तानमध्ये त्यांना दफन करण्यात आले आहे.

दुसरी चर्चा खोमेनी यांचे मूळ गाव मशहद येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मशहद येथे शियांचे 8 वें इमाम अली इब्न मूसा अल-रजा यांना दफन करण्यात आले होते. हे इराणचे पवित्र स्थळ मानण्यात येते. 2024 मध्ये खोमेनींचे जवळचे इब्राहिम रईसी यांना इथेचे चिरविश्रांती मिळाली होती. तर अजून एक तर्क असा बांधण्यात येतो की, युद्ध संपल्यावर इराणमध्ये खोमेनी यांचा दफनविधी करण्यात येईल. हिजबुल्लाह चीफ हसन नसरुल्लाह याचा दफनविधी सुद्दा मृत्यूच्या 5 महिन्यानंतर झाला होता. त्या अंत्यविधीवेळी खोमेनी उपस्थित होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...