AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Results 2026 LIVE Counting Winner : ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा गेम? भाजपाने थेट…

| Updated on: Jan 16, 2026 | 11:41 AM
Share

Maharashtra Municipal Corporation Election Results 2026 LIVE Counting and Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. एक एक करून निकाल हाती येत आहेत.

Maharashtra Election Results 2026 LIVE Counting Winner : ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा गेम? भाजपाने थेट...
Maharashtra Election Results 2026 LIVE

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2026 11:40 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात गेम? भाजपाची मुसंडी..

    ठाण्यात भाजपा 14 शिवसेना शिंदे गट 10 वर आघाडीवर आहे. शिवसेना आणि शिंदेची येथे युती आहे. मात्र, ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे.

  • 16 Jan 2026 11:37 AM (IST)

    Mumbai Nagarsevak Election Results 2026 : तेजस्वी घोसाळकर विजयी..

    मुंबईमध्ये भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या शिवसेना ठाकरे गटात होत्या.

  • 16 Jan 2026 11:29 AM (IST)

    Municipal Corporation Pune Election Results 2026 : अजित पवारांना भाजपाचा धक्का, पुण्यात थेट…

    पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला असून भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून अजित पवारांच्या गटाचे उमेदवार पिछाडीवर असून हा थेट धक्काच म्हणावा लागेल.

  • 16 Jan 2026 11:22 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई महापालिकेचा पहिला निकाल हाती, कॉंग्रेसचा पहिला विजय..

    मुंबईचा पहिला निकाल हाती आला असून आशा काळे कॉंग्रेसच्या विजयी झाल्या आहेत. हा मुंबई महापालिकेचा पहिला निकाल आहे.

  • 16 Jan 2026 11:16 AM (IST)

    Pune Municipal Election Results 2026 : अजित पवार यांच्या पदरी निराशाच? पुण्यासह पिंपरी चिंचवड…

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र येऊन निवडणुका लढताना दिसले. भाजपाच्या विरोधात थेट निवडणुका लढताना अजित पवारांचा पक्ष दिसला. मात्र, म्हणावी तशी कामगिरी अजिबात करण्यात अजित पवार यांच्या पक्षाला जमली नाही.

  • 16 Jan 2026 11:13 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : जळगावात शिंदे गटाला मोठे यश..

    जळगावात शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले असून पहिला विजय मिळाला आहे.

  • 16 Jan 2026 11:11 AM (IST)

    पुणे महापालिकेत आबा बागुल पिछाडीवर, धक्का…

    पुणे महापालिकेचे निकाल हाती येत असून आबा बागुल पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. हा मोठा झटकाच म्हणावा लागेल.

  • 16 Jan 2026 11:06 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात काटेकी टक्कर..

    महापालिकांचे निकाल हाती येत असून मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या मोठी टक्कर बघायला मिळत आहे.

  • 16 Jan 2026 11:04 AM (IST)

    BMC Election Results 2026 : भाजपा शिवसेना शिंदे गट 73 जागांवर आघाडीवर

    मुंबई महापालिकेचे सुरूवातीचे कल हाती येत असून भाजपा शिंवसेना ठाकरे गट तब्बल 73 जागांवर आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत.

  • 16 Jan 2026 10:58 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : पुण्यातून धक्कादायक बातमी पुढे, शिवसेना ठाकरे गटाला धक्का…

    पुण्यातून वसंत मोरे यांच्या पूत्र पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत मोरे यांचा मुलगा ही निवडणूक लढत आहे.

  • 16 Jan 2026 10:49 AM (IST)

    Municipal Corporation Nanded Election Results 2026 : नांदेडमध्ये भाजपाचा बोलबाला, अशोक चव्हाण यांची बाजी…

    नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हाती येत असून नांदेड महापालिकेत भाजपा आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.

  • 16 Jan 2026 10:45 AM (IST)

    Mumbai Nagarsevak Election Results 2026 : मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपाच, ठाकरेंची हवा…

    राज्यातील 29 महापालिकांचे कल हाती येत असून मुंबई महापालिकेत भाजपा धमाल करताना दिसत आहे. 50 जागांवर आघाडीवर आहे. यासोबत शिवसेना शिंदे गटही धमाका करताना दिसत आहे.

  • 16 Jan 2026 10:43 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : गरवारे स्टेडियम वरील मतमोजणी केंद्रावरील गोंधळ कायम

    प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने उमेदवार प्रतिनिधींची गर्दी. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम. निवडणूक निरिक्षक मतमोजणी केंद्रावर दाखल, उमेदवारांनी मांडली कैफियत.

  • 16 Jan 2026 10:36 AM (IST)

    Panvel Municipal Election Results 2026 : पनवेलमध्ये भाजपची मोठी आघाडी

    पनवेलमध्ये भाजपने आपली विजयाची परंपरा कायम राखल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. सिडको क्षेत्रातील नागरी प्रश्नांचा प्रभाव या निकालांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • 16 Jan 2026 10:36 AM (IST)

    Mumbai Nagarsevak Election Results 2026 : कल्याण डोंबिवलीत भाजपा आघाडीवर, शिंदेंना धक्का…

    डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 21, 22 ,23 ,24 ,29 आणि 30 प्रभाकर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये डोंबिवलीत भाजप आघाडीवर. सुरुवातीला टपाल मत मोजली सुरू आहे.

  • 16 Jan 2026 10:28 AM (IST)

    Municipal Corporation Latur Election Results 2026 : लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका,

    लातूरमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र, आता लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका बसताना दिसत असून भाजपा लातूर महापालिकेत पिछाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 10:26 AM (IST)

    जालना मतमोजणी केंद्रावर पोलिस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये बाचाबाची

    उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश करताना उडाला गोंधळ. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उडाला गोंधळ..पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला काढले बाहेर..प्रशासनाचा कारभार नियोजन शून्य असल्याचा भाजपच्या उमेदवाराचा आरोप

  • 16 Jan 2026 10:22 AM (IST)

    BMC Election Results 2026 : मुंबई युती जोरदार, भाजपा शिवसेनेचे अर्धशतक…

    महापालिकेचे कल हाती येत असून मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट 50 जागांवर आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 10:21 AM (IST)

    Municipal Corporation Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून मोठी आघाडी मिळवली आहे

    पुणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून 33 जागांवर आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 10:14 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : ठाकरे गटाला अत्यंत मोठा झटका, थेट…

    सुरूवातीच्या कलांनुसार, ठाकरे गटाला मोठा झटका बसताना दिसत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट आघाडीवर दिसत आहे.

  • 16 Jan 2026 10:09 AM (IST)

    Chandrapur Municipal Election Results 2026 : चंद्रपुरात आम्ही शंभर टक्के सत्ता स्थापन करू आणि आमचे बहुमत असेल – विजय वडेट्टीवार

    अपेक्षित निकाल लागतील. यंत्रणाच्या खूप वापर झाला. पैशाच्या खूप वापर झाला. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना रान मोकळं करून दिल होतं. अशाही परिस्थितीत काँग्रेसला पोषक निकाल असेल. चंद्रपूर , अमरावती, कोल्हापूर लातूर ,जालना असे अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल. चंद्रपुरात आम्ही शंभर टक्के सत्ता स्थापन करू आणि आमचे बहुमत असेल. आणि बाकीच्या अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल किंवा काँग्रेस दुसऱ्याला घेऊन सत्तेत राहील सगळ्याला धक्का देणारे निकाल असतील.

  • 16 Jan 2026 10:05 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपाची आघाडी कायम…

    मुंबई महापालिकांचे कल पुढे येताना दिसत असून भाजपाची आघाडी बघायला मिळत आहे. भाजवा आणि शिवसेना शिंदे यांची युती धमाल करताना दिसत आहे.

  • 16 Jan 2026 10:02 AM (IST)

    BMC Mahapalika Election Results : पहिल्या कलामध्ये भाजपाची बाजी..

    मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने घेतली आहे आघाडी. भाजपा आणि शिंदे 22, ठाकरे बंधू 10 याप्रमाणे..

  • 16 Jan 2026 10:01 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : काही सेकंदात पहिला कल हाती…

    काही सेकंदात पहिला कल हाती येईल. 29 महापालिकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

  • 16 Jan 2026 09:58 AM (IST)

    पोस्टल मतमोजणीला सुरूवात.. उमेदवारांची धाकधूक वाढली..

    राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदान मोजणी केली जात आहे. काही वेळात आकडे हाती येतील.

  • 16 Jan 2026 09:55 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन सुरू

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. संभाजीनगरमध्ये मोठा राडा बघायला मिळत आहे. हेच नाही तर थेट ठिय्या आंदोलन केले जात आहे.

  • 16 Jan 2026 09:51 AM (IST)

    Mumbai Nagarsevak Election Results 2026 : पोस्टल मतमोजणीला सुरूवात..

    राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका असून 9.55 मिनिटाला पोस्टल मतमोजणीला सुरूवात होईल. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • 16 Jan 2026 09:43 AM (IST)

    Municipal Corporation Nashik Election Results 2026 : 15 मिनिटात महानिकालाला होणार सुरूवात

    राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल अवघ्या 15 मिनिटांनी सुरू होतील . काल मतदान झाले आणि आज मतमोजणीला सुरूवात होईल.

  • 16 Jan 2026 09:36 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वी मोठा राडा होताना दिसत आहेत. उमेदवाऱ्यांच्या प्रतिनिधींविरोधात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • 16 Jan 2026 09:29 AM (IST)

    Municipal Corporation Mumbai Election Results 2026 : मुंबई महापालिकेबद्दल चंद्रकांत पाटील यांचा थेट दावा आणि…

    मुंबई महापालिकेच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. निकाल येण्यास काही मिनिटे शिल्लक असताना चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेवर दावा करत म्हटले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा मुंबई महापालिकेत 130 च्या खाली येणार नाही, चंद्रकांत पाटील यांनी थेट महापालिकेचा निकालच सांगून टाकला आहे.

  • 16 Jan 2026 09:24 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : चंदक्रांत पाटलांचा अत्यंत मोठा दावा, थेट म्हणाले…

    महापालिका निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही मिनिटे राहिली असून निकालाबद्दल बोलताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबईत आम्ही 130 च्या खाली येणार नाहीत.

  • 16 Jan 2026 08:55 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : काही वेळातच महापालिका निवडणुकीच्या निकालाला सुरूवात..

    राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही वेळातच महापालिकेचे निकाल होती येतील.

  • 16 Jan 2026 08:34 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026: 29 महापालिकांचा आज महानिकाल…

    राज्यातील 29 महापालिकांचा आज महानिकाल असून काही वेळात एका मागून एक महापालिकांचे निकाल हाती येताना दिसतील.

  • 16 Jan 2026 08:27 AM (IST)

    Municipal Corporation PCMC Election Results 2026 : महेश लांडगे अजित पवारांसाठी ठरणार वरचढ?

    राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांनी भाजपाचा मोर्चा सांभाळला. यावेळी महेश लांडगे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करतानाही दिसले. आता एकमतच्या एक्झिटपोलनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता येणार आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असून शकतो.

  • 16 Jan 2026 08:12 AM (IST)

    [Municipal Corporation Nashik Election Results 2026 : नाशिकमध्ये पुन्हा इंजिन धावणार की?

    नाशिक महापालिकेवर भाजपाकडून दावा केला जात आहे. यासोबतच मनसे पुन्हा नाशिकमध्ये गड राखणार का? हे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल.

  • 16 Jan 2026 08:09 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : EVM मशीन घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग

    EVM मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागे ठाकरेंच्या सेनेकडून बाईकवरून पाठलाग. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क.. EVM मशीन स्ट्रॉंगरूम पर्यत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवडीतील गाडयांचा केला पाठलाग

  • 16 Jan 2026 07:55 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : शिंदेंच्या गेम नक्की केला कोणी?

    राज्यातील सर्वाधिक चर्चेत ठरलेली निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची आहे. प्रत्येकाकडून या महापालिकेवरील सत्तेवर दावा केला जात आहे. एकमतच्या एक्झिटपोलनुसार, मुंबई महापालिकेवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल. मात्र, ठाकरेंपेक्षा कमी उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून येतील. यावरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे की, शिंदेंचा गेम नक्की केला कोणी?

  • 16 Jan 2026 07:52 AM (IST)

    BMC Mahapalika Election Results : राज ठाकरे यांची ती एक चूक ठरणार मोठी?

    राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज मतमोजणी आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येते याच्यावर राज्याच्या नजरा आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली. मात्र, एक्झिटपोलनुसार, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात येत नाही.

  • 16 Jan 2026 07:47 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : 15 हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरणार..

    आज राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 10 वाजता निकालाला सुरूवात होईल. तब्बल 15 हजाराहून अधिक उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.

  • 16 Jan 2026 07:02 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात…

    सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर एक एक करून निकाल हाती येतील. राज्यातील 29 महापालिकांची मतदान मोजणी सुरू होईल.

  • 16 Jan 2026 06:36 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई पालिकेची सत्ता ठाकरेंच्या हातून जाण्याचा अंदाज, थेट एक्झिटपोलने उडवली खळबळ…

    एक्झिटपोलनुसार, मुंबईची सत्ता ठाकरेंचा हातून जाणार असल्याचे दिसत आहे. देवा भाऊ मुंबई महापालिकेवर आपला झेंडा लावतील, असे चित्र आहे.

  • 16 Jan 2026 06:22 AM (IST)

    Mumbai Municipal Election Results 2026 : एक्झिटपोलनुसार मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का…

    एक्झिटपोलनुसार मोठा धक्का ठाकरे बंधूना बसताना दिसत आहे. 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेतून जाताना दिसत आहे.

  • 16 Jan 2026 05:53 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : पिंपरी चिंचवडच्या निकालाकडे राज्याच्या नजरा…

    पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाविरोधात अजित पवार गट लढताना दिसत आहे. यासोबतच भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप करताना अजित पवार दिसले.

  • 16 Jan 2026 05:42 AM (IST)

    Maharashtra Municipal Election Results 2026 : 8 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात..

    राज्यातील 29 महापालिकांचा निकाल आज लागणार असून 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचा नजरा आहेत.

  • 15 Jan 2026 10:58 PM (IST)

    सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

    सोलापूर महापालिकेसाठी आज मतदान पार पडले आहे. याचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख यांच्या मुलाच्या विजयाचे बॅनर लागले आहे. ‘आम्ही भावी नाही पर्मनंट’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.

  • 15 Jan 2026 09:12 PM (IST)

    जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

    मतदार यादीत नावे असूनही आणि वेळेत मतदान केंद्रावर प्रवेश करूनही तसेच अडीच तास रांगेत उभे राहूनही दोन महिलांना मतदानापासून वंचित रहावे लागले. 18 व्या क्रमांकाचे बूथ चे टोकन दिले , मात्र मतदान 15 क्रमांकाचे बूथमध्ये होतं, तिकडे गेल्यावर मतदान प्रक्रिया संपली होती.जळगाव शहरातील प्रभाग 1 मधील गेंदालाल मिल परिसरातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

  • 15 Jan 2026 08:47 PM (IST)

    संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार – किशोर शितोळे

    प्रभाग रचना करताना आम्ही आधीच आक्षेप नोंदवले होते. मात्र प्रत्यक्षात पत्नीचे मतदान एका प्रभागात, तर पतीचे दुसऱ्या प्रभागात झाले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मतदानासाठी पाठवण्यात आले, हे गंभीर आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणूक आयोगाने असे का केले, याचा तपास झाला पाहिजे. याबाबत आम्ही अधिकृत तक्रार करणार आहोत असे किशोर शितोळे यांनी म्हटले आहे.

  • 15 Jan 2026 08:23 PM (IST)

    ठाण्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद

    ठाण्यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झाला आहे. उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्याने अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी त्यांना जाब विचारला आहे. पोलिसांना तक्रार करताच पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले आहेत.

  • 15 Jan 2026 08:03 PM (IST)

    BMC Election Exit Poll 2026 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊनही मनसेच्या पदरी निराशाच…

    एक्झिटपोलनुसार, मनसेच्या पदरी निराशाच बघायला मिळत आहे. येणाऱ्या आकडेवारीनुसार, मनसेचा फार काही कामगिरी करताना आली नाहीये. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही फार काही धमाका करताना आली नाही.

  • 15 Jan 2026 07:29 PM (IST)

    Mumbai Election 2026 Exit Poll Results LIVE : एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत थेट धक्का…

    एक्सिस माय इंडिया पोलनुसार,  मुंबई महापालिकेत

    भाजप-सेना – 131-151 ठाकरे-मनसे-पवार -58-68 काँग्रेस-वंचित -12-16 इतर – 6-12

    भाजपला 42 टक्क्याहून अधिक वोट ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार इतरांना 13 टक्के वोट मिळणार

  • 15 Jan 2026 07:17 PM (IST)

    PCMC Election Exit Poll 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा ठरतोय सर्वात मोठा पक्ष..

    पिंपरी-चिंचवड

    भाजप – 64 शिवसेना- 09 राष्ट्रवादी – 51 शरद पवार – 02 काँग्रेस -01 मनसे – 01

  • 15 Jan 2026 07:12 PM (IST)

    Kolhapur Election Exit Poll 2026 : कोल्हापूरमध्ये महायुतीची सत्ता…

    एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. राज्यातील 29 महापालिकेसाठी आज मतदान झाले..

  • 15 Jan 2026 06:58 PM (IST)

    BMC Election Exit Poll 2026 : ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का…

    एक्झिटपोल पुढे येत असून जनमत एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिकेत पवार आणि ठाकरे बंधुंच्या मिळून जागा 58 ते 65 च्या मध्ये येण्याची शक्यता पोलनुसार आहे.

  • 15 Jan 2026 06:47 PM (IST)

    BMC Election Exit Poll 2026 : शिवसेना ठाकरे गटासोबतच मनसेला थेट धक्का…

    पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईत भाजपाची थेट सत्ता. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिली आहे.

  • 15 Jan 2026 06:42 PM (IST)

    BMC Election Exit Poll 2026 : भाजपा शिवसेना शिंदे गटाची बाजी, एक्झिटपोलनुसार मोठा अंदाज…

    शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मिळून मुंबईमध्ये 138 जागा येण्याचा अंदाज एकमत एक्झिटपोलनुसार, येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेवर थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल.

  • 15 Jan 2026 06:21 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता..

    जनमतच्या एक्झिटपोलनुसार, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असून ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे. थेट भाजपा शिवसेनेच्या हाती सत्ता पोलनुसार दाखवण्यात आली आहे.

  • 15 Jan 2026 06:19 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : छत्रपती संभाजी प्रभागनगरच्या प्रभाग क्रमांक 23 मधील पुंडलिक नगर मतदान केंद्रावर गोंधळ.

    साडेपाच पर्यंत मतदार गेटमध्ये आल्यानंतरही केंद्रप्रमुखाने मतदानास मज्जाव केल्याचा आरोप. भाजपाचे उमेदवार प्रदीप राठोड यांनी मतदान अधिकाऱ्याला विचारला जाब. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदार केंद्रावर रांगा.

  • 15 Jan 2026 06:13 PM (IST)

    सोलापुरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

    भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. भाजपानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील फोडले फटाके. आम्ही समोरच्या दिशेने येत असताना भाजपाचे काही कार्यकर्ते फटाके फोडत होते. त्यामध्ये आमचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आले मात्र किरकोळ वाद होता. भाजप नेत्यांना सत्तेचा गर्व आला आहे त्यामुळे ते असे वागत आहेत

  • 15 Jan 2026 05:07 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, थेट म्हणाले, शाई…

    राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान मतदानानंतर बोटावरची शाई मिटली जात असल्याचा आरोप केला जात आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, सॅनिटायझरने बोटावरील शाई मिटली जाते.

  • 15 Jan 2026 04:46 PM (IST)

    मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून मतदान केंद्राच्या बाहेरच आंदोलन

    मतदान केंद्राच्या बाहेर आंदोलनकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील महानगरपालिकेची अनाजी वस्ती शाळा मांजरी येथे बोगस मतदान झाल्याने संतप्त मतदारांचे मतदान केंद्राबाहेर आंदोलन..

  • 15 Jan 2026 04:19 PM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : मतदान केंद्रावरील फोटो शेअर केल्याने गुन्हा दाखल…

    मतदान केंद्रावरील फोटो शेअर करणे मतदाराला चांगलेच महागात पडले असून थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 Jan 2026 04:17 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : धुळे महानगरपालिकेच्या अवधान गावातील मतदान केंद्रात प्रचंड मोठी गर्दी.

    हजारो मतदार दुपारून मतदान करण्यासाठी पडला बाहेर… अवधान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मतदारांनी फुल.. सकाळी होता मतदारांमध्ये निरुत्साह..दुपारनंतर मात्र हजारो मतदारांची मतदान करण्या साठी मोठी गर्दी..

  • 15 Jan 2026 04:14 PM (IST)

    पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप

    जळगावमध्ये प्रभाग 5 मधील अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप. वसंत सोनवणे असे मारहाणीत जखमी झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्याचे नाव आहे. गोंधळ सुरू असताना काय झाले हे पाहण्यासाठी गेलो असता अपक्ष उमेदवार पीयूष यांच्यासह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप..वसंत सोनवणे हे जखमी झाले आहे दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 15 Jan 2026 04:13 PM (IST)

    सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार टाकला

    जुळे सोलापूर परिसरातील 1500 मतदारांनी बहिष्कार घातला. प्रभाग क्र. 26 मधील मतदारांनी हा बहिष्कार घातला आहे. रुबी नगर ते अमोल नगरपर्यत रस्ता केला जात नसल्याने मतदार आक्रमक. जोपर्यंत रस्ता करणार नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा ईशारा

  • 15 Jan 2026 04:01 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : हातावरील शाई जाण्याच्या मुद्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात जुंपली

    हातावरील शाई जाण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट, मनसे यांच्यात जुंपली असून गंभीर आरोप केली जात आहेत. ठाकरेंच्या आरोपाला भाजपाने थेट उत्तर दिले.

  • 15 Jan 2026 03:28 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : आशिष शेलार यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच थेट सांगितला निकाल…

    आशिष शेलार यांनी म्हटले की, मुंबईत 50 पेक्षा जास्त ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे डिपोर्झिट जाणार. निवडणुकीच्या निकालापूर्वीच त्यांनी हे विधान केले.

  • 15 Jan 2026 03:23 PM (IST)

    त्यांच्या बुद्धीत हेराफेरी, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर यांच्यावर संतापले आशिष शेलार..

    उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार यांनी म्हटले की, त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे.

  • 15 Jan 2026 03:20 PM (IST)

    मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य का? आशिष शेलार यांचा थेट सवाल…

    मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का? हा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

  • 15 Jan 2026 03:12 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : अखेर निवडणूक आयोगाने मान्य केली ती मोठी चूक

    दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, मी मान्य करतो की, 2 टक्के EVM मध्ये बिघाड झाला आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 10 वर्षात नवीन मशीन खरेदी केल्या नसून या मशीन जुन्या झाल्या आहेत.

  • 15 Jan 2026 03:04 PM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : निवडणूक आयोग करणार थेट कारवाई

    निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, खोटे व्हिडीओ किंवा एडीट करून व्हायरल केली जात असतील तर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. तसे निर्देशही देण्यात आली आहेत.

  • 15 Jan 2026 03:02 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरली आहे- निवडणूक आयुक्त

    नुकताच निवडणूक आयोगाने मोठा खुलासा करत निवडणूक आयोगाने सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरतो आणि ती शाई योग्यच आहे.

  • 15 Jan 2026 02:18 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला थेट निवडणूक आयुक्तांचे उत्तर

    राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट उत्तर दिले असून त्यांनी म्हटले की, सत्ताधाऱ्यांना कोणतीही मदत केली जात नाही. चुकीच्या गोष्टी सेट केल्या जात आहेत.

  • 15 Jan 2026 02:07 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार पद? घडामोडींना प्रचंड वेग…

    नुकताच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केली आहेत. सत्ताधारी पक्षाचे काम निवडणूक आयुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्ाचा आरोप केला जात आहे.

  • 15 Jan 2026 01:57 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : रश्मी ठाकरे यांनी दाखवला शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ

    राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.

  • 15 Jan 2026 01:56 PM (IST)

    निवडणूक आयोगाचा स्टाफ दररोज काय करतो? उद्धव ठाकरेंचा मोठा प्रश्न…

    उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता. केलं काय. मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही मानत आहात.

  • 15 Jan 2026 01:45 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगितले निवडणुकीचा निकाल…

    देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक हारले आहेत, त्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत. निवडणूक पूर्ण होण्यापूर्वीच मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले…

  • 15 Jan 2026 01:42 PM (IST)

    निवडणूक आयुक्तांना निलंबित करा- उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांनी थेट म्हटले की, राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. ते फुकटचा पगार घेत असल्याचा त्यांनी आरोप केला.

  • 15 Jan 2026 01:39 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांचा अत्यंत गंभीर आरोप

    निवडणूक जिंकण्यासाठी आटापीटा केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असून यादरम्यान त्यांनी बोटावरीला शाई पुसली जात असल्याचा आरोप केला.

  • 15 Jan 2026 01:30 PM (IST)

    Nagarsevak Election 2026 : शाई पुसून मतदान करता येणार नाही- राज्य निवडणूक आयोग…

    शाई पुसून मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शाई पुसली जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

  • 15 Jan 2026 01:12 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : दानवेला अक्कल नाही… चंद्रकांत खैर यांचा चढला पारा…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका करत चंद्रकांत खैरे यांनी म्हटले की, अंबादास दानवेला अक्कल नाही…

  • 15 Jan 2026 01:11 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : एकनाथ शिंदे यांनी केले कुटुंबासह मतदान

    एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहन देखील लोकांना केले.

  • 15 Jan 2026 12:55 PM (IST)

    Nagarsevak Election 2026 : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंसह काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीका

    उद्धव ठाकरे यांचे राजकारण काही दिवसांचे राहिले आहे त्यामुळे ते तशी वक्तव्य करत आहेत. उद्धव ठाकरेंना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते असे वक्तव्य करत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांना माझे आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या उमेदवारांची किमान नावे सांगावीत. खासदार प्रणिती शिंदे या राहुल गांधींना खुश करण्यासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात

  • 15 Jan 2026 12:53 PM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : कल्याण पूर्व प्रभाग 18 मध्ये मतदानावेळी ईव्हीएम बंद

    कल्याण पूर्व नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान अडथळा. महानगरपालिकेच्या प्रबोधन बाळासाहेब ठाकरे शाळेतील ईव्हीएम मशीन अचानक बंद. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये काही काळ संभ्रम व गोंधळ. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती व मतदान पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया

  • 15 Jan 2026 12:35 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : राज ठाकरेंचा आरोप, सचिन सावंतांचा खळबळ उडवारा व्हिडीओ…

    मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यादरम्यानच नेते सचिन सावंत यांनी थेट शाई पुसली जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला.

  • 15 Jan 2026 12:34 PM (IST)

    नाशिकच्या सावता नगर परिसरात पैसे वाटत असल्याच्या अफवेने नागरिकांची गर्दी

    सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालय बाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांकडून आरोप. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा बडगुजर यांच्या कार्यालय बाहेर गोंधळ. मुकेश शहाणे प्रभाग सोडून बडगुजर यांच्या कार्यालयावर चालून आल्याने झाला गोंधळ

  • 15 Jan 2026 12:24 PM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : निवडणूक अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे वाद

    टिटवाळा प्रभाग क्रमांक 3 मध्ये ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावात गोंधळ. शरद पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव चुकीने शेख अप्पाराव वाकोडे असे नमूद. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप. या प्रभागात भाजप, उद्धवसेना, वंचित आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात. निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी, कायदेशीर लढ्याचा इशारा — शेखर अप्पाराव वाकोडे

  • 15 Jan 2026 12:22 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : जळगाव मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण

    जळगाव शहरातील आर. आर. महाविद्यालय मतदान केंद्रावर प्रभाग तणावाचे वातावरण. मतदान सुरू असताना दोन गटात वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. बोगस मतदार पकडून त्याला चोप देण्यात आला होता, यानंतर या ठिकाणी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.अपक्ष उमेदवार पियुष पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णू भंगाळे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

  • 15 Jan 2026 12:21 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत 16.03 टक्के मतदान

    पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीत 11:30 वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान झाले आहे. सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडलीत असा अंदाज आहे.

  • 15 Jan 2026 12:19 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या आई-वडिलांसह मतदानाचा अधिकार बजावला आहे नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन महाविद्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर हेमंत पाटील यांनी हा मतदानाचा अधिकार बजावला आहे. मागील 74 वर्षापासून नांदेड शहरामध्ये असलेली एकाधिकारशाही या निवडणुकीमध्ये मोडीस निघेल असा विश्वास यावेळी हेमंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे

  • 15 Jan 2026 12:04 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : रोहित पवार बनले अजित पवारांचे कैवारी, थेट पणे भाजपाला…

    रोहित पवार पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले असून त्यांनी थेट अजित पवारांची बाजू घेत आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपावर टीका केली. लांडगेंची दहशत संपणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

  • 15 Jan 2026 12:01 PM (IST)

    Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदान केंद्रांवर

    मुंबई महापालिकेच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे.

  • 15 Jan 2026 11:59 AM (IST)

    माजी नगरसेवक दिनकर आढाव बसलेल्या गाडीत सापडले पैसे

    नाशिकच्या प्रभाग 17 माजी नगरसेवक दिनकर आढाव बसलेल्या गाडीत सापडले पैसे. भरारी पथकाची कारवाई, फॉर्च्युनर गाडी जमा. निवडणुकीत पैसे दिल्या प्रकरणी कारवाई .

  • 15 Jan 2026 11:50 AM (IST)

    राज ठाकरे यांनी केलेल सर्व आरोप खोटे, देवेंद्र फडणवीसांनी थेट पाडले तोंडावर…

    मतदानाची नवीन पाडू मशीनबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला सांगण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हे आरोप चुकीचे आहेत. सर्व राजकीय पक्षांना ही मशीन दाखवण्यात आली होती.

  • 15 Jan 2026 11:45 AM (IST)

    महाराष्ट्राची जनता विकासाच्या पाठीमागे- देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टिकेवरही उत्तर दिले.

  • 15 Jan 2026 11:42 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : मतदानाचा हक्का बजावताच अमृता फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाल्या…

    सर्वात महत्वाची महापालिका निवडणूक नागपूरची आहे. सर्वात मोठा मुद्दा विकास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले.

  • 15 Jan 2026 11:40 AM (IST)

    Municipal Corporation Nagpur Election 2026 : जळगाव बोगस मतदानाच्या आरोपातून एका तरुणाला देण्यात आला चोप

    पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे तरुण थोडक्यात बचावला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कडे निघाले आहेत. बोगस मतदानासाठी आलेला तरुण चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे प्राथमिक माहिती

  • 15 Jan 2026 11:38 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

    आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या आणि शिवसेनेच्या उमेदवार दर्शना झोल यांनी देखील बजावला मतदानचा हक्क. शहरातील भाग्यनगर येथील मतदाना केंद्रावर अर्जुन खोतकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत थांबत खोतकर कुटुंबियांनी बजावला मतदानचा हक्क. मतदानाला जाण्यापूर्वी खोतकर यांच्या पत्नीकडून करण्यात आले औक्षण. जालना महापालिकेत आमचंच बहुमत येईल असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला

  • 15 Jan 2026 11:36 AM (IST)

    Municipal Corporation Nashik Election 2026 : नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

    शिवसेना शिंदे यांच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण दाबल्यानंतर ईव्हीएम मध्ये भाजपचा लाईट लागत असल्याचा दावा. मतदारांकडून देखील संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकवलं जात असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आरोप. प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ

  • 15 Jan 2026 11:34 AM (IST)

    Jalgaon Election Poll Percentage : जळगाव महानगरपालिका निवडणूक तब्बल इतके टक्के मतदान

    जळगाव महानगरपालिका निवडणूक. सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत मतदान. पुरुष मतदान = 14494, स्त्री मतदान = 9654, एकूण मतदान = 24148. टक्केवारी = 5.5%

  • 15 Jan 2026 11:31 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले 

    धरमपेठ प्राथमिक शाळेतील बूथ वर करणार मतदान. यावेळी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस मतदान केंद्रावर पोहोचल्याचे बघायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 11:22 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : पाडू मशीनवरून राज ठाकरे यांचा गंभीर आरोप…

    पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आली नसल्याचा नुकताच गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमध्ये पाडू मशीनवर निवडणुका घेतल्या जात आहेत.

  • 15 Jan 2026 11:15 AM (IST)

    Municipal Corporation PCMC Election 2026 : अजित पवारांच्या मदतीला धावून आले रोहित पवार…

    भ्रष्टाचारावर अजित दादा बोलले, कुणाला लक्ष केलं नव्हतं. आमदारमहेश लांडगे अजित दादांना एकेरी बोलल्याने आमचं मतदान वाढलं. भाजपच मतदान राष्ट्रवादीकडे वळल. लांडगे यांची दहशत आहेच. भाजपला मिरची लागली आहे. वातावरण एवढं फिरेल अस वाटलं नसेल नागरिकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. सत्तेत असल्याने भाजपला हंकार, पैशांचा माज होता. भाजप नेत्यांच्या मनात आता भीती आहे. भाजप आधी सव्वाशे पार नार दिला होता. आता केवळ महापौर म्हणतायत…

  • 15 Jan 2026 11:02 AM (IST)

    Nagpur Election Poll Percentage : नागपूरमध्ये पहिल्या दोन तासात 7 टक्के मतदान

    नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026. सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 7 टक्के नोंदवली गेली आहे.

  • 15 Jan 2026 11:00 AM (IST)

    महानगरपालिकेतील मतदान प्रक्रिया शांततेत- पोलीस आयुक्त प्रवीण पवार

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील मतदान हे शांततेत सुरू आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई असताना मोबाईल नेणारे 25 ते 30 मोबाईल जप्त केले आहेत. पैसे वाटपाच्या तक्रारी संदर्भात पोलिसांनी शहानिशा केली असून असा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.

  • 15 Jan 2026 10:54 AM (IST)

    Nagarsevak Election 2026 : राज ठाकरे पोहोचले मतदानासाठी

    राज ठाकरे सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित दिसत आहे.

  • 15 Jan 2026 10:48 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ

    महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर हे थेट आरओच्या गाडीसमोर बसले. यामुळं तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि बोगस मतदान होतंय. असा आरोप यावेळी करण्यात आलाय. निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा वापर करतायेत असा आरोप ही करण्यात आला

  • 15 Jan 2026 10:44 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : राज्य निवडणूक आयोगाकडून अत्यंत मोठी चूक…

    बोटावरील शाई पुसली जात असल्याचे नुकताच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मान्य केले असून मार्कर पेन आयोगाकडून देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

  • 15 Jan 2026 10:42 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार..

    मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला असून बोटावरील मार्कर खून पुसली जात असल्याचे मनपाने मान्य केले आहे. ही मार्कर पेन आयोगाकडून दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

  • 15 Jan 2026 10:34 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : मनसे नेते अविनाश जाधव यांची निवडणूक अधिकाऱ्याविरोधात तक्रार

    शिंदेंच्या शिवसेनेचे चिन्ह स्पष्ट दिसणारे बॅनर झळकत असल्याचा आरोप. वागळेतील निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्या विरोधात ऑनलाइन तक्रार दाखल. निवडणूकआचारसंहितेचा भंग करत करत असल्याची तक्रार. निवडणूक आयोग शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप

  • 15 Jan 2026 10:28 AM (IST)

    Municipal Corporation Pune Election 2026 : पुण्यात पहिल्या दोन तासांमध्ये 5.50 टक्के मतदान..

    सकाळी मोठी गर्दी मतदान केंद्रावर बघायला मिळाली. आता पहिल्या दोन तासांच्या मतदानाची आकडेवारी पुढे येताना दिसत असून पुण्यात दोन तासांमध्ये 5.50 टक्के मतदान झाले आहे.

  • 15 Jan 2026 10:24 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची

    भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली आहे. ठाकरे गटाच्या भगवा गार्डला पोलिसांनी 100 मीटरच्या दूर जाण्याच्या सूचना दिल्या असता वाद पेटला.

  • 15 Jan 2026 10:22 AM (IST)

    Nagarsevak Election 2026 : चंद्रकांत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..

    चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सांगलीत भिडे गुरूजी यांनीही मतदानाचा हक्का बजावला आहे.

  • 15 Jan 2026 10:06 AM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : मतदानाचा अधिकार बजावताच प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप…

    खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यादरम्यान माध्यमांसोबत बोलताना अत्यंत गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केले असून भापजाकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • 15 Jan 2026 10:02 AM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : भाजपावर शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर आरोप

    इंचलकरंजीत भाजपाने पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरेच्या शिवसेनेने केला आहे. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण मतदान केंद्राबाहेर बघायला मिळाले.

  • 15 Jan 2026 09:59 AM (IST)

    मतदान केंद्रांबाहेर लागल्या मतदारांच्या रांगा..

    राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला सुरूवात झाली असून मतदानाचा हक्का बजावण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून मोठी रांग मतदार केंद्राबाहेर बघायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 09:56 AM (IST)

    उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये, ईव्हीएम मशीन बंद..

    सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद. सकाळपासून मशीन बंद झाल्याने मतदान ठप्प. प्रभाग क्रमांक 20 मधील खोली क्रमांक चार मधील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड. मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा

  • 15 Jan 2026 09:48 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बजावला मतदानाचा अधिकार…

    अभिनोत्री हेमा मालिनी यांनी नुकताच त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला आहे. लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे हेमा मालिनी यांनी म्हटले असून सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी मतदान करा असे त्यांनी म्हटले.

  • 15 Jan 2026 09:47 AM (IST)

    Municipal Corporation pune Election 2026 : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा अधिकार..

    पुण्यातील वानवडी साळुंखे विहार प्रभागातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. वानवडीतील विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी मतदान केंद्रावर येत, लाईन मध्ये उभं राहात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे..त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निश्चित विजय होईल असं त्यांनी म्हंटलंय..

  • 15 Jan 2026 09:45 AM (IST)

    सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला संपूर्ण कुटुंबासोबत मतदानाचा अधिकार…

    सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पोहोचले आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत.

  • 15 Jan 2026 09:43 AM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : भाजप आणि इतर सर्व उमेदवारांमध्ये मोठा राडा

    भाजपच्या उमेदवारा विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांची निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार. सिडको एन 4 मधील संतवीरा या मतदान केंद्रावर गोंधळ. पोलिंग बूथ वर दिलेल्या पोलचीट वर भाजपचे चिन्ह आणि कोडींग असलेले टी-शर्ट घातल्याने दोन्ही शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी भाजपवर घेतला आक्षेप.

  • 15 Jan 2026 09:40 AM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : दिग्गज उमेदवारांचे भविष्य होणार मतपेटात बंद

    राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असून राज्यातील दिग्गज उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदापेटांमध्ये उद्या बंद होणार आहे.

  • 15 Jan 2026 09:39 AM (IST)

    Nagarsevak Election 2026 : आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क..

    मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून नुकता रवींद्र चव्हाण यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

  • 15 Jan 2026 09:23 AM (IST)

    Maharashtra Election 2026 : मतदानाच्या दिवशी अजित पवारांकडून मोठी राजकीय खेळी..

    मतदानाच्या दिवशी अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडत असल्याचे बघायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार भाजपाविरोधात लढताना दिसत आहेत.

  • 15 Jan 2026 09:20 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार 

    नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बजावला आहे मतदानाचा अधिकार. यासोबतच त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

  • 15 Jan 2026 09:18 AM (IST)

    धुळ्यात EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड…

    धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथील बुथ क्रमांक चार वरील पाच नंबर खोलीचे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा मतदान केंद्राबाहेर खोळंबा. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदारांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा

  • 15 Jan 2026 09:13 AM (IST)

    आमदार सुधाकर अडबाले यांनी बजावला मतदानाचा हक्क..

    नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी कुटुंबासह चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासासाठी शुद्ध पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

  • 15 Jan 2026 09:10 AM (IST)

    Municipal Corporation Parbhani Election 2026 : परभणीत मतदार केंद्राबाहेर पैसे वाटपाचा आरोप

    परभणीत मतदार केंद्राबाहेर पैसे वाटप करण्याचा आरोप अजित पवार गटाने नुकताच केला आहे. यामुळे काही वेळ गोंधळाचा वातावरण बघायला मिळाले.

  • 15 Jan 2026 09:09 AM (IST)

    सोलापुरात मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने भाजपला मतदान केल्याचा आरोप

    या घटनेमुळे अपक्ष उमेदवार आणि अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावर बाचाबाची. ईव्हीएम मशीनचे बटन दाबले जात नसल्याने मतदाराने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनंतर अधिकाऱ्याने मशीन तपासणी करताना थेट भाजपच्या उमेदवाराचे बटन दाबल्याचा आरोप. प्रभाग क्रमांक 10 मधील उर्दू स्कूल केंद्रावरील हा प्रकार समोर आलाय. युवा मतदार तसेच अपक्ष उमेदवाराने याबाबत तक्रार केलीय

  • 15 Jan 2026 09:07 AM (IST)

    प्रत्येकाने मतदान करावे, सचिन तेंडुलकर याचे आवाहन

    सचिन तेंडुलकर हा सकाळीच आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी घराबाहेर पडला असून सचिन तेंडुलकर याने मतदानाचा अधिकार बजावण्यास नागरिकांना आवाहन केले.

  • 15 Jan 2026 09:03 AM (IST)

    मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाड

    मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान मशीन सुरू करण्यात आलेला आहे. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झाला होता मात्र तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेला आहे. मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना अर्धा तास वाट बघावी लागली होती त्यामुळे सायंकाळी अर्धा तास मतदानासाठी चिवडा गल्लीतील 235 नंबरच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आली आहे…..

  • 15 Jan 2026 09:01 AM (IST)

    क्रिकेटर सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत पोहोचला मतदानाला

    क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा संपूर्ण कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा सर्वजण मतदान केंद्रात पोहोचले.

  • 15 Jan 2026 08:53 AM (IST)

    Maharashtra Election 2026 : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची पोलिसांना तंबी

    डोंबिवलीतील 29 क्रं प्रभागात रवींद्र चव्हाण यांनी गाड्या चेक करा बदलापूर मधून लोक आले आहे. बदलापूर मध्ये जो राडा झाला होता त्यामध्ये बदलापूरच्या लोकांनी राड्यात उमेदवाराच्या पतीला मारले होते, सर्व गाड्या चेक करा म्हणत त्यांनी पोलिसांना तंबी दिली आहे.

  • 15 Jan 2026 08:49 AM (IST)

    Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : EVM मशीन बंद पडल्याने नागरिक आक्रमक झाले

    संभाजीनगरचे EVM मशीन गेल्या अर्ध्या तासापासून बंद आहे. EVM मशीन बंद पडल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 08:47 AM (IST)

    दुबार मतदारांचा घोळ किशोरी पेंडणेकरांचा आरोप..

    दुबार मतदारांचा घोळ आधीच घालुन ठेवलाय. पाडु नावाचं मशिन आणलंय, मुंबईकर प्रतिकुल पारिस्थितीत मतदान करतायेत. अमित साटम यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, भगवा गार्ड लोकशाही मजबुत करण्यासाठी येतोय. तुमचे पैसे सापडले, गुंड पुंड सापडले तुमच्यावर कारवाई का नाही. दुबार मतदार सापडले तर कार्यक्रम होईलच

  • 15 Jan 2026 08:42 AM (IST)

    EVM मशिनचा खोळंबा उडाला असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

    छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, पनवेल येथील EVM मशीन बंद पडल्या असून मतदानाच्या सुरूवातींच्या तासांमध्येच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

  • 15 Jan 2026 08:39 AM (IST)

    Pune Election 2026 Voting : प्रभाग चार मधील मशीन बंद पडल्याने, काही काळ मदन प्रक्रिया खोळंबली

    नांदेड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे प्रभाग चार हनुमान गड मधील महात्मा फुले शाळा या मतदान केंद्रात एक ईव्हीएम मशीन बंद पडली होती. तांत्रिक बिघाड आल्याने मशीन बंद पडली. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती. काही वेळात मशीन सूरू करण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

  • 15 Jan 2026 08:35 AM (IST)

    पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील बंद पडलेले evm मशीन चालू

    पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील बंद पडलेले evm मशीन चालू करण्यात आलेय. गेल्या काही वेळापासून हे मशीन बंद होते.

  • 15 Jan 2026 08:31 AM (IST)

    Municipal Corporation Pune Election 2026 : 5 वेळा बटण दाबूनही लाईट लागेणा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

    लाईट लागत नाही, पुण्यातील मतदाराचा आक्षेप. मोठा गोंधळ. EVM मशीनमध्ये बिघाड असल्याची अंदाज…

  • 15 Jan 2026 08:29 AM (IST)

    कुणाचा झेंडा, कोण उधळणार गुलाल? जाणून घ्या प्रत्येक अपडेट…

    राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्या 16 जानेवारी 2026 रोजी मतदानाचा निकाल असेल, आज सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

  • 15 Jan 2026 08:25 AM (IST)

    Mumbai Corporation Election 2026 : ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांची ओरड

    सोलापुरातील संगमेश्वर पब्लिक स्कुल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले होते. आम्ही सकाळी साडेसात वाजता मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलो होतो. मात्र मशीन बंद असल्याने मतदान करता आले नाही. जवळपास 20 मिनिटे मशीन बंद होती. महापालिकेचा कारभार एकदम ढिसाळ असून याबाबत अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

  • 15 Jan 2026 08:18 AM (IST)

    Nagarsevak Election 2026 : राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

    राम नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुंबई पब्लिक स्कुल गोरेगाव पूर्व पाहाडी शाळेत बजावला मतदानाचा हक्क.

  • 15 Jan 2026 08:16 AM (IST)

    अंबादास दानवे यांनी बजावला मतदानाचा अधिकार..

    आमदार अंबादास दानवे यांनी बजावला आहे मतदानाचा अधिकार, मोहन भागवत यांनीही बजावला मतदानाचा अधिकार..

  • 15 Jan 2026 08:12 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : प्रभाग 24 मधील मतदान क्रमांक 3 मध्ये EVM मशीन बंद पडले

    काँग्रेसचे उमेदवार राहुल शर्मा संतापले. या ठिकाणी मशीन दुरुस्त करणारे व्यक्ती देखील नसल्याचा काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप. ईव्हीएम मशीन सुरू होण्यास जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ वाढवून देण्याची मागणी…

  • 15 Jan 2026 08:11 AM (IST)

    धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड.

    मतदान प्रक्रिया खोलबळी. 4,5,10,11 या प्रभागांमध्ये मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड. तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न ..

  • 15 Jan 2026 08:08 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीतून गायब

    गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सकाळीच मतदान केंद्रावर गणेश नाईक पोहोचले होते.

  • 15 Jan 2026 08:05 AM (IST)

    जळगावात उर्दू शाळा क्रमांक 15 येथील केंद्रावर मतदानापूर्वी गोंधळ

    ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्यावरून उमेदवार प्रतिनिधींचा आक्षेप. निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद. निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत मशीनचा क्रम बदलला. मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

  • 15 Jan 2026 07:52 AM (IST)

    Maharashtra Election 2026 Voting : अमरावतीमध्ये EVM मशीमध्ये तांत्रिक बिघाड

    मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून EVM मशीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मतदानाचा लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 07:46 AM (IST)

    Pune Municipal Corporation Election 2026: पुण्यात मतदान सुरू होताच मोठा गोंधळ, गंभीर आरोप

    पुण्यात काकडे नावाच्या एका मतदाराने गंभीर आरोप करत म्हटले की, मी बटण दाबले पण मशिनमध्ये लाईट पेटली नाही. मात्र, माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाहीये.

  • 15 Jan 2026 07:39 AM (IST)

    कोणत्याही उमेदवाराला मतदान करा- मोहन भागवत

    नुकताच मोहन भागवत यांनी मतदारांना मोठा आवाहन करत म्हटले की, कोणत्याही मतदाराला मतदान करा पण मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे.

  • 15 Jan 2026 07:33 AM (IST)

    Maharashtra Election 2026 Voting Time : 8 वाजचा होणार मतदानाला सुरूवात

    काही वेळात अगदी राज्यातील 29 महापालिकांच्या मतदान प्रक्रियेला सुरूवात होईल. 8 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहिल.

  • 15 Jan 2026 07:18 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : अमित साटम सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिम साटम हे सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.

  • 15 Jan 2026 07:16 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 प्रभागातून 859 उमेदवार महानगरपालिकेच्या रिंगणात

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 115 नगरसेवक पदासाठी आज पार पडणार मतदान प्रक्रिया. 29 प्रभागातून 859 उमेदवार महानगरपालिकेच्या रिंगणात. 11 लाख 17 हजार 477 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. 3 हजार 307 पोलीस अधिकारी कर्मचारी याशिवाय 1 हजार 928 होमगार्ड व SRPF च्या दोन तुकड्या बंदोबस्त कामी तैनात. 12 हजार 800 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात. 514 ठिकाणावरून वेब कास्टिंग, 170 क्षेत्रीय अधिकारी करणार पेट्रोलिंग.

  • 15 Jan 2026 07:07 AM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : जालना महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया

    16 प्रभागातल्या एकूण 65 जागेसाठी मतदान प्रक्रिया. जालना महापालिका निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असून शहरातील जवळपास अडीच लाख मतदार मतदानचा हक्क बजावणार आहे. जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

  • 15 Jan 2026 07:06 AM (IST)

    वसई विरारमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे

    मतदान प्रक्रिया सुरू होण्यास काही वेळ शिल्लक असताना वसईमध्ये य श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे फडकायला लागले आहेत. वसई वसंत नगरी सर्कल ते एव्हरशाइन पर्यंत हे झेंडे लावण्यात आली आहेत.

  • 15 Jan 2026 07:01 AM (IST)

    Nagarsevak Election 2026 : दुबार मतदानाकडे प्रशासनाची करडी नजर

    मतदान प्रक्रियेला अगदी काही वेळात सुरूवात होईल. मात्र, प्रशासनाची शेवटपर्यंत दुबार मतदान करणाऱ्यांकडे करडी नजर असणार आहे.

  • 15 Jan 2026 06:59 AM (IST)

    Maharashtra Mahapalika Election : मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगरच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

    मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून सर्वांच्या नजरा आहेत. राज्यात अजित पवार आणि भाजपा एकत्र असताना अजित पवारांचा पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या विरोधात निवडणूक लढताना दिसत आहे.

  • 15 Jan 2026 06:54 AM (IST)

    जळगाव महापालिकेतील 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक

    75 पैकी 12 जागा बिनविरोध 63 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 63 जागांसाठी तब्बल 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जळगाव शहरातील 516 केंद्रावर मतदान पार पडणार असून 4 लाख 38 हजार 523 एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

  • 15 Jan 2026 06:52 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी गुरुवारी मतदान

    सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया. शहरात एकूण 1563 मतदान केंद्रांवर मतदारांचा कौल. 266 मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील; विशेष पोलीस बंदोबस्त.  13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

  • 15 Jan 2026 06:45 AM (IST)

    धुळे महापालिकेतील 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक

    74 पैकी 4 जागा बिनविरोध 70 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 70 जागांसाठी तब्बल 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. धुळे शहरातील 557 केंद्रावर मतदान पार पडणार असून 50 केंद्र अतिरिक्त मतदान केंद्र 4 लाख 30 हजार 787 एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

Maharashtra Mahanagar Palika Election Results 2026 LIVE Counting and Updates: राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एक्झिटपोलही पुढे आले. एक्झिटपोलच्या आकड्यांनी अनेकांची थेट झोप उडाली. अनेक प्रस्थापितांना धक्का बसताना दिसत आहे. काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. राज्यात सत्तेत असलेले पक्ष काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होती. शेवटी आज राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. मोठ्या नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची निवडणूक बनलीये. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, नांदेड, सांगली, सातारा या महापालिकांच्या निवडणुकीकडे (Maharashtra Election) राज्याच्या नजरा आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. साधारणपणे सायंकाळपर्यंत राज्यातील 29 महापालिकांचे निकाल  स्पष्ट होतील. प्रशासनाकडून या निवडणुकीचे जय्यत तयारी करण्यात आली. 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला tv9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवर बघायला मिळेल. पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, जालना, परभणी, बीड, लातूर, अहिल्यानगर, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागणार आहे.

Published On - Jan 16,2026 6:43 AM

Follow us
मुंबईत सरवणकरांचं टेन्शन वाढल! पिछाडी वाढली, उबाठा इतक्या मतांनी पुढं
मुंबईत सरवणकरांचं टेन्शन वाढल! पिछाडी वाढली, उबाठा इतक्या मतांनी पुढं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी.
भाजपची मुसंडी; अजितदादांची राष्ट्रवादी मात्र अद्याप 13 जागांवर अडकली!
भाजपची मुसंडी; अजितदादांची राष्ट्रवादी मात्र अद्याप 13 जागांवर अडकली!.
महापालिकेचा रणसंग्राम! मुंबईत एकट्या भाजपची 50 जागांवर आघाडी
महापालिकेचा रणसंग्राम! मुंबईत एकट्या भाजपची 50 जागांवर आघाडी.
जेलमधून निवडणूक लढवणारे शिंदेंचे उमेदवार आघाडीवर, अटीतटीच्या लढतीत...
जेलमधून निवडणूक लढवणारे शिंदेंचे उमेदवार आघाडीवर, अटीतटीच्या लढतीत....
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आघाडीवर; पाहा निकाल
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आघाडीवर; पाहा निकाल.
भाजपचे सुनिल महाजन, जयश्री महाजन आघाडीवर
भाजपचे सुनिल महाजन, जयश्री महाजन आघाडीवर.
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पुढे, बविआची शिट्टी जोरदार वाजणार?
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पुढे, बविआची शिट्टी जोरदार वाजणार?.
Jalna Muncipal Result Updates : जालन्यात भाजपचे भास्कर दानवेंची आघाडी!
Jalna Muncipal Result Updates : जालन्यात भाजपचे भास्कर दानवेंची आघाडी!.
महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी, तर लातूरमध्ये..
महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी, तर लातूरमध्ये...