AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voter List: मतदार यादीत असे तपासा नाव…कुठंय तुमचं मतदान केंद्र, एका क्लिकवर जाणून घ्या…

Municipal Corporation Election 2026 Polling Booth: 15 जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेत मतदान होत आहे. 18 वर्षांवरील मतदारांना लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होता येईल. तुमचे नाव मतदार यादीत असे तपासा...तुमचे मतदान केंद्र कुठंय हे एका क्लिकवर जाणून घ्या...

Voter List: मतदार यादीत असे तपासा नाव...कुठंय तुमचं मतदान केंद्र, एका क्लिकवर जाणून घ्या...
मतदार यादीत असे तपासा तुमचे नावImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 13, 2026 | 3:37 PM
Share

BMC Election 2026 Voter List: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. मुंबईतील 227 जागांसाठी चुरशीचा सामाना रंगणार आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू,भाजप-शिंदेसेना, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष असा सामना दिसेल. लोकशाहीच्या या महोत्सवात तुम्हालाही भाग घेता येईल. मतदान करता येईल. त्यासाठी तुमचे वय 18 वर्षे वा त्यापेक्षा अधिक हवे. मतदानासाठी तुम्ही त्या त्या महापालिका क्षेत्रातील रहिवाशी हवेत. तुमचे नाव तिथल्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. बीएमसी निवडणूक एकाच टप्प्यात होईल. या निवडणुकीत एक कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे एका क्लिकवर माहिती करा.

सर्वात श्रीमंत महापालिका

मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागा आहेत. यासाठी 1,700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 879 महिला आणि 821 पुरुष उमेदवार आहेत. बृहन्मुंबई महानगरापालिका ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका आहे. पीटीआयनुसार, 2026 मधील निवडणुकीत उमेदवारांची संख्या फेब्रुवारी 2017 च्या तुलनेत 25.27 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2017 मध्ये एकूण 2,275 इतके उमेदवार होते. त्यावेळी महापालिकेच्या रिंगणात 1,190 पुरुष आणि 1,084 महिला होत्या. तर एक तृतीयपंथी उमेदवार निवडणूक मैदानात होता.

मतदार यादीत असे तपासा तुमचे नाव

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासणार? असा सवाल तुम्हाला पडला असेल तर हे नाव सहजरित्या तु्म्हाला तपासता येईल. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in वर जाऊन तुमचे नाव, EPIC नंबर टाकून तुमचे नाव तपासू सकता. याशिवाय तुम्ही राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलची (NSVP) साईट voters.eci.gov.in वर जाऊन तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव शोधू शकता. हा पर्याय निवडल्यावर तुमचे नाव EPIC क्रमांकाआधारे पाहु शकता.

मतदार हेल्पलाईन ॲप असे करा डाऊनलोड

निवडणूक आयोगाचे मतदार हेल्पलाईन ॲप आहे. हे ॲप तुम्ही eci.gov.in वरून डाऊनलोड करू शकता. या ॲपवर तुम्ही तुमचे नाव सहज पाहू शकता. तुमचे नाव, मतदार यादीत नोंदवल्यावर मतदान करतेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड वा पासपोर्ट सारखे कागदपत्रे अथवा ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

राज्यात 15,931 उमेदवार मैदानात

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एकूण 2,869 जागा आहेत. या जागांसाठी 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक उमेदवार आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार होणार आहे. मुंबईत 227 जागांसाठी 1,700 उमेदवार, पुण्यात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपराजधानी नागपूरमध्ये 151 जागांसाठी 993 उमेदवार फडात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी 859 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ.
20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल.
... तरी लाडकी बहीण बंद होणार नाही! एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
... तरी लाडकी बहीण बंद होणार नाही! एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
भायखळ्यातून आदित्य ठाकरेंचा प्रचार आणि जोरदार शक्तिप्रदर्शन
भायखळ्यातून आदित्य ठाकरेंचा प्रचार आणि जोरदार शक्तिप्रदर्शन.
मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली
मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली.
निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप.
असं कधीच घडलं नव्हतं... आकाशातून आले जळते दगड... भंडाऱ्यात एकच खळबळ
असं कधीच घडलं नव्हतं... आकाशातून आले जळते दगड... भंडाऱ्यात एकच खळबळ.
... तर एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही! राज ठाकरेंचा मोठा खुलासा
... तर एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही! राज ठाकरेंचा मोठा खुलासा.
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग!
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग!.
पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने
पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने.