AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेने एकाच मंडपात दोन तरुणांसोबत केलं लग्न, अनोख्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल

Unique Wedding : थायलंडमधील एका लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका 37 वर्षांच्या महिलेने एकाच वेळी दोन पुरुषांशी लग्न केले आहे.

महिलेने एकाच मंडपात दोन तरुणांसोबत केलं लग्न, अनोख्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल
WeddingImage Credit source: Google
| Updated on: Mar 03, 2026 | 6:23 PM
Share

जगात दररोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. यातील काही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आताही थायलंडमधील एका लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका 37 वर्षांच्या महिलेने एकाच वेळी दोन पुरुषांशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे हे लग्न एकाच मंडपात झाले. या लग्नातील दोन्ही वर ऑस्ट्रियाचे रहिवासी आहेत. या अनोख्या लग्नाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुआंगदुआन केत्सारो या महिलेने दोन्ही पुरुषांसोबत दीर्घकाळ रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिघांच्या परस्पर संमतीने लग्नाचा हा निर्णय घेण्यात आला. हे लग्न पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने पार पडले. या सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. मात्र एकाच महिलेने दोघांशी एकाच मंडपात लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नात्याची सुरुवात कशी झाली?

दुआंगदुआनची पाच वर्षांपूर्वी पटाया येथे निवृत्त ऑस्ट्रियन पोलिस अधिकारी रोमन यांच्याशी ओळख झाली होती. नंतर तिची भेट रोमनच्या जवळच्या मित्र मैकी याच्याशी झाली. रोमनसोबत पाच वर्षे आणि मैकीसोबत एक वर्ष डेटिंग केल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी तिघांनी थायलंडमधील प्राखोन चाई जिल्ह्यात लग्न केले. हा समारंभ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला. हे लग्न स्थानिक थाई परंपरेनुसार पार पडले. या सोहळ्यानंतर दोन्ही वरांनी एकत्र तलावात उडी मारून आनंद साजरा केला. ऑस्ट्रियाच्या दोन्ही पुरुषांनी हुंडा म्हणून 10 लाख बात (सुमारे 29 लाख रुपये) दिले.

कुटुंबाने काय म्हटलं?

या लग्नाबाबत बोलताना वधूच्या आईने सांगितले की, आम्ही अनेक वर्षे मुलीच्या अडचणी पाहिल्या आहेत, आता माझी एकच इच्छा आहे की ती आनंदी राहावी आणि तिची चांगली काळजी घेतली जावी. समोर आलेल्या माहितीनुसार, दुआंगदुआन केत्सारो या महिलेल्या पहिल्या लग्नातून तीन मुले आहेत. लग्न करण्यापूर्वी दुआंगदुआनने आपल्या मुलांशी आणि आई-वडिलांशी मोकळेपणाने चर्चा केली होती.

नेटकरी काय म्हणाले?

या अनोख्या विवाहाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या नात्याला आधुनिक विचारसरणीचे उदाहरण मानत आहेत, तर काही जण याला सामाजिक परंपरांविरुद्ध केलेला विवाह मानत आहेत. अनेक युजर्सनी याला ‘फ्रीडम ऑफ लव्ह’ असं म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...