AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MWC Barcelona 2026 सुरु; संपूर्ण कार्यक्रम आणि नवीन फोन लाँचची जाणून घ्या अपडेट

MWC बार्सिलोना 2026 ची जोरदार सुरुवात झाली आहे! 'द आयक्यू एरा' या थीमखाली हा जागतिक मोबाइल तंत्रज्ञान मेळावा 2 ते 5 मार्चपर्यंत चालणार आहे. यात नवीन स्मार्टफोन लॉन्च, AI आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर विशेष भर दिला जाईल. तंत्रज्ञानाच्या भविष्याची दिशा ठरवणारे हे महत्त्वाचे इव्हेंट टेकप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय बनले आहे, जिथे अनेक मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

MWC Barcelona 2026 सुरु; संपूर्ण कार्यक्रम आणि नवीन फोन लाँचची जाणून घ्या अपडेट
barcelona 2026Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 03, 2026 | 6:23 PM
Share

MWC Barcelona 2026 ला जोरदार सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या मोबाइल तंत्रज्ञान मेळाव्यांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमात यंदा “The IQ Era” ही थीम ठेवण्यात आली आहे. या मेळाव्यात स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि इंटेलिजेंट सिस्टम्स यावर विशेष भर देण्यात येत आहे. जगभरातील आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन आणि कॉन्सेप्ट डिव्हाइस सादर करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे टेकप्रेमींचे लक्ष सध्या बार्सिलोना शहराकडे लागले आहे.

कधीपर्यंत चालणार?

MWC Barcelona 2026 चे आयोजन 2 मार्च ते 5 मार्च 2026 दरम्यान स्पेनमधील फिरा बार्सिलोना ग्रान व्हिया येथे सुरू झालं आहे. सलग 20व्या वर्षी स्पेनला या भव्य टेक इव्हेंटचे यजमानपद मिळाले आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान कार्यक्रम सकाळी 8:30 (CET) वाजता सुरू होऊन सायंकाळी 19:00 (CET) वाजेपर्यंत चालणार आहे. तर 5 मार्च या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात त्याच वेळी होईल, मात्र समारोप दुपारी 16:00 (CET) वाजता करण्यात येणार आहे.

यंदाचा खास अजेंडा काय?

MWC Barcelona 2026 मध्ये यावर्षी “The IQ Era” या थीमअंतर्गत इंटेलिजेंट कनेक्टिव्हिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नव्या मोबाइल तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. दररोज वेगवेगळ्या कंपन्या आपल्या सेशन्स आणि प्रेझेंटेशनमधून नवीन इनोव्हेशन सादर करणार आहेत. भविष्यातील टेक्नोलॉजी, स्मार्ट डिव्हाइसेस आणि कनेक्टेड सिस्टीम्स यावर सखोल चर्चा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. इव्हेंटमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आधी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे. तसेच अधिकृत वेबसाइटवर अकाउंट तयार करणे बंधनकारक आहे. यंदाचा कार्यक्रम भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा दाखवणारा ठरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्या लॉन्चकडे लागणार विशेष लक्ष?

MWC Barcelona 2026 मध्ये यंदा अनेक मोठ्या स्मार्टफोन लॉन्चची चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार Nothing Phone 4a आणि Nothing Phone 4a Pro सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय Xiaomi 17 आणि Oppo Find X9 Pro सारखे फ्लॅगशिप डिव्हाइसही या मंचावर पाहायला मिळू शकतात. मात्र, कंपन्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे टेकप्रेमींमध्ये उत्सुकता आणि सस्पेन्स कायम आहे.

MWC 2026 खास का आहे?

MWC Barcelona 2026 हा केवळ स्मार्टफोन लॉन्चसाठीचा मंच नाही, तर संपूर्ण मोबाइल इंडस्ट्रीची दिशा ठरवणारा महत्त्वाचा इव्हेंट मानला जातो. या ठिकाणी नवीन नेटवर्क तंत्रज्ञान, AI आधारित अ‍ॅप्स, तसेच सिक्युरिटी क्षेत्रातील इनोव्हेशन सादर केली जातात. त्यामुळेच जगभरातील मोठे ब्रँड, डेव्हलपर्स आणि टेक तज्ज्ञ दरवर्षी या इव्हेंटची आतुरतेने वाट पाहतात. यंदाही अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्या पुढील काही वर्षांसाठी टेक ट्रेंड निश्चित करू शकता.

Follow Us
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा