AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणी

टी20 वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीचे चार संघ ठरले आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यापैकी दोन संघ अंतिम फेरीत जाणार आहे. असं असताना कोणते दोन संघ अंतिम फेरीत भिडतील, याची भविष्यवाणी दिग्गज क्रिकेटपटूंनी आधीच केली आहे.

T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणी
T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणीImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Mar 03, 2026 | 6:35 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या दोन सामन्यातील विजेत्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 4 मार्चला, भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 5 मार्चला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला होणार आहे. 8 मार्चला अंतिम फेरीत कोणते दोन संघ भिडणार याची उत्सुकता लागून आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीचा निकाल काय लागणार? याबाबत अजून तरी काही सांगता येत नाही. असं असताना दिग्गज क्रिकेटपटूंनी भाकीत वर्तवण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा यांनी अंतिम फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे.

मोहम्मद युसूफ आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्या मते, अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होईल. त्यामुळे आतापासून क्रीडाप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कारण टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभूत केलं होतं. तसेच दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका लढत झाली तर हा सामना अतितटीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मोहम्मद युसूफ आणि ग्लेन मॅक्ग्रा यांचं भाकीत खरं ठरतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भारताची या स्पर्धेतील कामगिरी ठिकठाक राहिली आहे. साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही. पण सुपर 8 फेरीत दिग्गज संघांचं आव्हान पेलताना नाकी नऊ आले. आता इंग्लंडचं आव्हान उपांत्य फेरीत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हाय स्कोअरिंग सामना असेल यात काही शंका नाही. पण नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावेल हे मात्र तितकंच खरं आहे.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?