AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : धडाम् ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव खाली, आता 10 ग्रॅम सोनं फक्त..

Gold Price Today 20 July 2026 Latest News Updates in Marathi: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा कल इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज भारतातील प्रमुख शहरांत सोनं-चांदीचे किती ते जाणून घेऊया.

Gold Price Today :  धडाम् ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव खाली, आता 10 ग्रॅम सोनं फक्त..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 20, 2026 | 9:27 AM
Share

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,43,430 वर पोहोचला, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,31,440 प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4,000.55 डॉलरवर घसरला आहे. तसेच ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकन गोल्ड फ्युचर्सची किंमतही प्रति औंस 4,005.9 डॉलरवर आली आहे. सोन्याचे भाव खाली आल्याने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना ही गुड न्यूज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिळाली आहे.

दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 90 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा कल इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तसेच भूराजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अमेरिकेने इराणवर सलग नवव्या रात्री हल्ले केल्याचे वृत्त आहे. जॉर्डनवरील इराणी हल्ल्यांमध्ये किमान दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इराणने जॉर्डनच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरांत आजचे सोन्याचे दर

दिल्ली: 24 कॅरेट – 1,43,430 रुपये, 22 कॅरेट – 1,31,440 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

मुंबई, कोलकाता: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चेन्नई: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे, बंगळुरू: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

शहर 22  कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹) 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹)
दिल्ली 131440 143430
मुंबई 131340 143280
अहमदाबाद 131390 143330
चेन्नई 131340 143280
कोलकाता 131340 143280
हैदराबाद 131340 143280
जयपुर 131440 143430
भोपाळ 131390 143330
लखनऊ 131440 143430
चंदीगड 131440 143430

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण कायम आहे. 20 जुलैच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,29,900 रुपये इतका नोंदवला गेला. काही महिन्यांपूर्वी चांदीच्या भावाने उच्चांक गाठला होता, मात्र आता गेल्या काही काळत चांदीचे दरही खाली आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस 56.42 डॉलरवर आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...