Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाही, मग करा तुळशीचा हा सोपा उपाय, घर धनाने भरून जाईल
हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र माण्यात आलं आहे. तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी आज आपण तुळशीचा एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र माण्यात येतं. तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. असं म्हटलं जातं, ज्या घरात तुळस आहे, त्या घरातील कुटुंबाचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून संरक्षण होतं. तसेच अशी देखील मान्यता आहे की, जर तुमच्या घरातील तुळस अचानक वाळली असेल तर तुमच्या कुटुंबावर एखादं फार मोठं संकट येणार होतं, मात्र ते संकट तुळशीमुळे टळलं, त्यामुळे तुळस अचानक वाळते. अनेक ठिकाणी तुळस वाळली तर तो एक अशुभ संकेत माण्यात येतो, मात्र वास्तुशास्त्रानुसार तुळस वाळली तर तो एक शुभ संकेतच असतो. दरम्यान तुळस वाळल्यानंतर वाळलेल्या तुळशीचं काय करायचं? हे अनेकांना माहिती नसतं, त्यामुळे अनेकजण चूक करतात, यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. आज आपण वाळलेल्या तुळशीचं काय करायचं? आणि घरात पैसा टिकून ठेवण्यासाठी काय उपाय करायचा? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
तुळस वाळली तर काय करायचं? अनेकदा असं होतं की आपल्या घरातील तुळस अचानक वाळते, याला अनेकजण अशुभ संकेत समजतात. परंतु हा अशुभ संकेत नसून एक शुभ संकेत असतो, तुमच्या कुटुंबावरील एखादं फार मोठं संकट टळलं असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा तुमच्या घरातील तुळस सुकते, तेव्हा सर्व प्रथम ही तुळस कुंडीमधून काळजीपूर्वक वेगळी करावी आणि त्यानंतर या तुळशीच्या काड्या एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जीत कराव्यात, त्या इथे-तीथे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाळलेल्या तुळशीचं वाहत्या पाण्यातच विसर्जन करावं.
तसेच तुम्ही धन प्राप्तीसाठी एक उपाय देखील करू शकता, समजा तुमच्या घरातील तुळस जर अचानक वाळली असेल तर त्या तुळशीच्या छोट्या-छोट्या सात काड्या एकत्र करा, त्या काड्या एका पिवळ्या धाग्यामध्ये बांधा, या काड्या तुमच्या देवघरात असलेल्या भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या फोटोजवळ ठेवा, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. त्यानंतर एक दिवसभर या काड्या तिथेच ठेवा, दुसऱ्या दिवशी या काड्या एका लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, या उपयामुळे आयुष्यात तुम्हाला कधी धनाची कमी पडणार नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
