AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने मला ऑफर दिली होती, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट; शरदराव तर…

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला की भाजपने त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली. पंतप्रधान मोदींशी त्यांचे आणि शरद पवारांचे चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच मोदींच्या कामाचे कौतुक केले. भाजपमध्ये नव्याने आलेल्यांचे काय हाल होतात यावरही त्यांनी भाष्य केले.

भाजपने मला ऑफर दिली होती, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट; शरदराव तर...
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 5:40 PM
Share

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भाजपने मलाही काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे. मी आजही पंतप्रधानांसोबत बोलत असतो. शरद पवारही पंतप्रधानांसोबत बोलत असतात. इतकेच काय त्यांना बारामतीलाही घेऊन जातात, असंही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आहे.

सुशील कुमार शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. त्यावर बोलताना शिंदे यांनी थेट मोदी यांचंच कौकुतक केलं. मोदींकडून कितीतरी चांगल्या गोष्टी होतात, काही वाईटही होतात, असं शिंदे म्हणाले.

पवारांना कोणी बोलत नाही

मला भाजपने ऑफर दिली होती. पण काँग्रेसमध्ये आहे तर भाजपत येऊन काय करू? असा सवाल मी त्यांना केला होता. मी जिथे आहे तिथलंच काम करणार, इकडं (भाजपमध्ये) येऊन परत तुमच्यात ढवळाढवळ नको, असं त्यांना म्हणालो होतो, असं सांगतानाच देशाचे पंतप्रधान जितकं माझ्याशी बोलतात, तितकंच शरद पवारांशीही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात. त्यांना कोणी विचारत नाही. उद्घाटनाला वगैरे गेले तर काही बिघडत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

भाजपमध्ये काय हाल होतात…

भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी बघितलं आहे. आता नाही 25 वर्षांपूर्वी सुद्धा असंच होत होतं. एकत्रित सर्वजण भाजपमध्ये गेले आणि चार पाच वर्षात परतले हे मी पाहिलं आहे, असं सांगतानाच राजकारणात देखील चुका होत असतात. त्यामुळे पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे. नकळत एखाद्याकडून जर चूक झाली असेल तर ती समजून घेतली पाहिजे. आपली लोकशाही वर चढत जाणारी आहे, त्याला काळिमा लागता कामा नये, असं ते म्हणाले.

असं केल्याने काय बिघडलं?

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी नातू शिखर पहारिया यांची पाठराखण केली. पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले? असं म्हणत शिंदे यांनी शिखर पहारिया यांच्या कृतीचं समर्थन केलं. परवा बातमी आली, माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले. एक दिवस असं केल्याने काय बिघडलं? मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो. यामुळे काहीही बिघडत नाही आणि आपली विचारधारा बदलत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मध्यंतरी संघाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. मी आवर्जून ते पुस्तक चाळून बघितलं. राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. काल मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले. त्यांच्याविषयीही मी माहिती घेतली. त्यांचही साहित्य मी वाचतो. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास देखील कितीतरी मोठा आहे, असंही ते म्हणाले, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…