AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : एका मराठी क्रिकेटरने जी बॅट गिफ्ट दिली, त्यानेच लॉर्ड्सवर खणखणीत शतक झळकवून रोहितने स्वत:ला केलं सिद्ध

Rohit Sharma : रोहित सहजासहजी हार मारुन आत्मसमर्पण करणार नाही हे स्पष्ट झालय. आता रोहितच्या जागी रिप्लेसमेंटचा विचार चालू असेल तर तो निर्णय सिलेक्टर्सच्या हातात आहे. रोहितने या शतकाने सिद्ध केलय की, त्याच्यामध्ये अजून बरच क्रिकेट बाकी आहे.

Rohit Sharma : एका मराठी क्रिकेटरने जी बॅट गिफ्ट  दिली, त्यानेच लॉर्ड्सवर खणखणीत शतक झळकवून रोहितने स्वत:ला केलं सिद्ध
Rohit Sharma Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 20, 2026 | 9:41 AM
Share

लॉर्ड्सच्या मैदानावर काल इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माने ऐतिहासिक, तुफानी शतक झळकावलं. रोहित शर्माचं हे शतक खास यासाठी आहे, कारण या मॅचआधी लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणार, तो रिटायर होतोय अशा चर्चा सुरु होत्या. रोहितने हे खणखणीत शतक झळकवून आपल्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, ते दाखवून दिलय. रोहित शर्माने झळकवलेल्या या शतकाबद्दल आता एक इंटरेस्टिंग खुलासा झाला आहे. रोहितने 110 चेंडूत 138 धावा केल्या. यात 17 चौकार आणि पाच षटकार होते. रोहितने ही शतक झळकवताना जी बॅट वापरली, ती ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरची आहे. 388 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने शार्दुलच्या बॅटचा वापर केला. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो होता. भारताला विजयासाठी 27 धावा कमी पडल्या. इंग्लंडने ही वनडे मालिका 2-1 ने जिंकली.

शार्दुल ठाकूरला सहकारी खेळाडू प्रेमाने लॉर्ड ठाकूर बोलतात. रोहित आणि शार्दुल एकाच शाळेत शिकले आहेत. बालपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघे मुंबईकडून खेळतात. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा ड्रेसिंग रुमही शेअर केलीय. शार्दुल ठाकूरने सांगितलं की, “माझा SS बॅट्ससोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. याचे मालक जतीन सरीन माझ्यासाठी चांगल्या, चांगल्या बॅट बनवून पाठवतात. रोहितने एकदा माझ्याकडून बॅट्स मागितल्या होत्या. कारण त्याला त्या आवडलेल्या” “आम्ही सर्व रोहितवर भरपूर प्रेम करतो. त्यांनी क्रिकेटमध्ये आम्हाला आनंदाचे इतके क्षण दिलेत की, बॅट द्यायला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आज लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मी दिलेल्या बॅटने रोहितने शतक झळकावलं, याचा मला आनंद आहे” असं शार्दुल ठाकूर म्हणाला.

सहजासहजी हार मारुन आत्मसमर्पण करणार नाही

39 वर्षाच्या रोहित शर्माच्या भविष्याबद्दल सस्पेन्स कायम आहे. त्याच्या शतकी खेळीने रोहित सहजासहजी हार मारुन आत्मसमर्पण करणार नाही हे स्पष्ट झालय. आता रोहितच्या जागी रिप्लेसमेंटचा विचार चालू असेल तर तो निर्णय सिलेक्टर्सच्या हातात आहे. रोहितने या शतकाने सिद्ध केलय की, त्याच्यामध्ये अजून बरच क्रिकेट बाकी आहे. रोहित शर्मासाठी 19 जुलैचा रविवार खूपच खास ठरला.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच