Karwa Chauth आणि हिंदी सिनेमाचे आहे खास नाते, हे सीन झाले होते खूप प्रसिद्ध
'करवा चौथ' खरे तर नॉर्थ इंडियातील व्रत आहे. परंतू हिंदी सिनेमामुळे ते भारतभर प्रसिद्ध झाले आहे. 80 च्या दशकात करवा चौथचा सीन हिंदी सिनेमाचा अविभाज्य भाग बनला होता.

सिनेमा हा समाजाचा आरसा म्हटला जात असतो. भारतीय सिनेमात समाजाचे प्रतिबिंब उमटत आले आहे. करवा चौथ हे व्रत हिंदी सिनेमात खूपदा दाखवण्यात आले आहे. यातील अनेक सीन आजही चाहत्यांच्या स्मृतीत आहेत. करवा चौथ 2026 च्या निमित्ताने काही चित्रपटांना उजाळा देऊयात ज्यात करवा चौथ सीन गाजले होते.

srk and kajol
1. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) – ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट शाहरुख खान आणि काजल जोडीचा रेकॉर्डब्रेक सिनेमा म्हटला जातो. या चित्रपटातही करवा चौथचा सीन गाजला होता. करवा चौथच्या रात्री सिमरन ( काजोल ) राज ( शाहरुख ) याची वाट पाहत असते.आणि राज स्वत:च्या हाताने तिला घास भरवत तिचे व्रत साजरे करताना दाखवले आहे.

ajay devgan and aishwarya
2. हम दिल दे चुके सनम – हम दिल दे चुके सनम चित्रपटात ‘चांद छिपा बादल में’ हे गीत करवा चौथच्या थिमवर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे प्रचंड सुंदर दिसले आहेत. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आहे. या चित्रपटात करवा चौथचा सीन दोनदा आहे. एकदा सलमान आणि ऐश्वर्यात जेव्हा प्रेम होते. आणि दुसरा सीन अजय देवगण आणि ऐश्वर्या यांचे विवाह होतो तेव्हा आहे.

kajol and shahrukh khan
3. कभी खुशी कभी गम – ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करवा चौथ ग्रँड सेलिब्रेशनच्या रुपात दाखवले आहे. काजोल तिचा पती बनलेल्या शाहरुख खानसाठी हे करवा चौथ व्रताचा उपवास धरते. तर जया- अमिताभ बच्चन यांच्यासाठी तर करीना ऋतिक रोशनसाठी हे व्रत धारण करते.

big b and hema malini
4. बागबान – कौटुंबित ड्रामा असलेल्या ‘बागबान’ चित्रपटात हेमा मालिनी अभिताभ बच्चन यांच्यासाठी करवा चौथचे व्रत राखते. हा सीन खूपच लोकप्रिय आहे. कारण यात अमिताभ आणि हेमा मालिनी एकमेकांपासून खूप दूर जातात.त्यामुळे हा सीन खूपच भावनिक झाला आहे.

salman khan and rani mukharji
5. बाबुल – बाबुल चित्रपट अभिनेता सलमान खान याच्यासोबत राणी मुखर्जी आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या सोबत पुन्हा हेमा मालिनी दिसते. यात खास बाब म्हणजे पत्नीच नाही तर पती देखील पत्नींसाठी व्रत धरताना दाखवले गेले आहेत.
हिंदी सिनेमात करवा चौथचे सीन आयकॉनिक बनले आहेत. आणि करवा चौथ व्रताला प्रसिद्ध करण्यात या हिंदी सिनेमांचा मोठा रोल आहे. ८० च्या दशकातही करवा चौथचे सीन सिनेमाचे मुख्य बलस्थान झालेले पाहायला मिळत आहेत.
