AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या व्हायरल व्हिडीओनंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सलमानने त्यावर मौन सोडलं आहे. सलमानने सोशल मीडियावर नवीन पोस्ट लिहिली आहे.

सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 20, 2026 | 4:32 PM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील सलमानची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी सलमान खूपच आजारी आणि थकलेला दिसला. आपल्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा सलमान यात खूपच खंगलेला दिसला. त्यामुळे सलमानच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर अनेकांनी सलमानच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. यादरम्यान आता सलमाननेच एक क्रिप्टिक पोस्ट लिहित मौन सोडलं आहे.

रविवारी सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘तुम्हा लोकांची तब्येत कशी आहे?’ व्हायरल व्हिडीओनंतर आता सलमानची ही नवी पोस्ट चर्चेत आली आहे. शुक्रवारी सलमानने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नव्याने बांधलेल्या ‘डेटा कलेक्शन अँड व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर’च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी त्याच्या दिसण्यावरून चर्चेला सुरुवात केली. सलमानची तब्येत बरी दिसत नाहीये, असं एकाने लिहिलं. तर सलमानला काहीतरी झालंय, असं दुसऱ्याने म्हटलंय.

सलमानची पोस्ट-

याआधीही सलमानने सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्हायरल चर्चांवर आणि व्हिडीओंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मे महिन्यात सलमानला मुंबईतील माहीम इथल्या हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना पापाराझींनी पाहिलं. तो तिथे एका जवळच्या मित्राला भेटायला गेला होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर आपल्या गाडीजवळ चालत जाताना पापाराझींनी त्याला घेरलं आणि त्याच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांचे फ्लॅशलाइट्स चमकले. हे पाहून सलमान खान संतापला आणि त्याने पापाराझींना खडसावलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने लिहिलं होतं, ‘जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा.. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य?’

सलमान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ असं आधी या चित्रपटाचं नाव होतं. याचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून यामध्ये अभिनेत्री चित्रांगदा सिंहसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट भारताच्या लडाखमधील वादग्रस्त सीमावर्ती भाग असलेल्या गलवान खोऱ्यात 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे.

Follow Us
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा..
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा...
दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
CJP Protest News | राज्यसभा स्थगित... पण आंदोलन थांबलं नाही! दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी...
Thane | वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच...
ठाकरे- पवारांच्या पक्षाला माणसं मिळत नसल्याने ते दुसऱ्यांच्या....
Girish Mahajan | ठाकरे- पवारांच्या पक्षाला माणसं मिळत नसल्याने ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात; गिरीश महाजनांचा हल्लाबोल
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक पूर्ण
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!.

CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो.

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं.

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं