AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे शंभर जाळून टाकेन, तुरुंगात टाकणार..; सलमान खान भडकला, रागात लिहिले 4 पोस्ट

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या चार वेगवेगळ्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने पापाराझींना खडसावलं आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

असे शंभर जाळून टाकेन, तुरुंगात टाकणार..; सलमान खान भडकला, रागात लिहिले 4 पोस्ट
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 8:25 AM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे काही पोस्ट लिहितोय, ज्यामुळे चाहते पेचात पडले आहेत. सलमान त्याच्या मनात असलेल्या गोष्टी थेट इन्स्टाग्रामच्या कॅप्शनमध्ये पोस्ट करतोय आणि त्यावरूनच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हेच सुरू आहे. या संपूर्ण घटनेची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा सलमानला मुंबईतील माहीम इथल्या हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना पापाराझींनी पाहिलं. तो तिथे एका जवळच्या मित्राला भेटायला गेला होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर आपल्या गाडीजवळ चालत जाताना पापाराझींनी त्याला घेरलं आणि त्याच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांचे फ्लॅशलाइट्स चमकले. हे पाहून सलमान खान संतापला आणि त्याने पापाराझींना खडसावलं. आता संतप्त सलमानने पुन्हा एकदा पापाराझींना इशारा दिला आहे. असं पुन्हा घडलं, तर तो गंभीर कारवाई करेल, असा इशाराच त्याने दिला आहे.

रुग्णालयाबाहेर घडलेल्या घटनेनंतर सलमान खानने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हॉस्पिटलबाहेर इतके फ्लॅशलाइट्स आणि कॅमेरे पाहून त्याने कठोर प्रतिक्रिया दिली. सलमानने खडसावताच पापाराझी घाबरले आणि त्यांनी त्याची माफी मागितली. त्यानंतरही त्याने पुन्हा असं करू नका म्हणत एकपाठोपाठ एक चार पोस्ट शेअर केल्या आहेत. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चेच चार वेगवेगळे सेल्फी पोस्ट केले आणि त्याच्या कॅप्शनमध्ये पापाराझींना इशारा दिला.

पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ‘जर मला हॉस्पिटलमध्ये कोणताही पत्रकार माझ्या वेदनांचा आनंद घेताना दिसला, ज्यांच्यासाठी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांच्याशी मी बोललो, ज्यांची मी काळजी घेतली आणि त्यांना उदरनिर्वाह करता येईल याची खात्री केली.’ यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘पण जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा.. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य?’

‘असे मी शंभर जाळून टाकेन. भाईच्या दु:खावर पुढच्या वेळी माझ्यासोबत प्रयत्न करून पहा. फक्त प्रयत्न करून पहा. जेव्हा कधी तुमची व्यक्ती रुग्णालयात असेल, तेव्हा मी असं वागेन का? साठ वर्षांचा झालो आहे, परंतु लढायला विसरलो नाही, हे लक्षात ठेवा. तुरुंगात टाकणार का.. हा हा हा’, असं सलमानने पुढच्या दोन पोस्टमध्ये म्हटलंय. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...