AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी तुमच्याजवळ राहू इच्छित नाही..; एकटेपणाबद्दल सलमानची पोस्ट, ऐश्वर्या रायच्या ‘कार्बन कॉपी’ची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेता सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्वत:चा शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने तर इंटनेटचा पारा आणखी वाढवला आहेच, पण त्याचसोबत फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने जे लिहिलंय, त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

कोणी तुमच्याजवळ राहू इच्छित नाही..; एकटेपणाबद्दल सलमानची पोस्ट, ऐश्वर्या रायच्या 'कार्बन कॉपी'ची प्रतिक्रिया चर्चेत
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 18, 2026 | 10:00 AM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने रविवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना सरप्राइज दिला. सलमानच्या या शर्टलेस फोटोने तर सर्वांचं लक्ष वेधलंच, पण त्याचसोबत त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने जे लिहिलं, त्यावरून सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. या क्रिप्टिक पोस्टमध्ये सलमानने एकटेपणा आणि एकाकीपणाच्या भावनांबद्दल त्याचे विचार व्यक्त केले. सलमानच्या या फोटोवर रविवारपासून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. त्यातच ऐश्वर्या रायची ‘कार्बन कॉपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनेही कमेंट करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोमध्ये सलमान एका मंद प्रकाशाच्या खोलीस सोफ्यात बसलेला दिसत आहे. या शर्टलेस फोटोमधील सलमानचं फिटनेस पाहून अनेकजण त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सलमानने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘स्वत:सोबत असण्याचे दोन मार्ग आहेत. एकटं आणि एकाकी राहणं. त्यापैकी एकटं राहणं ही वैयक्तिक निवड असते आणि जेव्हा कोणीही तुमच्यासोबत राहू इच्छित नाही तेव्हा एकाकी वाटतं. आता याच्या पुढे तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे.’ सलमानची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर पसरली आणि त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देऊ लागले. सलमानने एकटेपणाबद्दल असं का लिहिलं, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. या वयात सलमानला एकटं वाटतंय का, असाही सवाल काहींनी कमेंटमध्ये केला.

2005 मध्ये ‘लकी’ या चित्रपटात सलमानसोबत काम केलेली अभिनेत्री स्नेहा उल्लालने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘उफ्फ आदी.. हे सगळं तू ‘लकी’च्या वेळी का केलं नाहीस?’ या चित्रपटात सलमानने आदी उर्फ आदित्य सेखरी नावाचं पात्र साकारलं होतं. तर स्नेहा हुबेहूब ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. तिला आजही ऐश्वर्याची ‘कार्बन कॉपी’ म्हटलं जातं. सलमानची कथित गर्लफ्रेंड आणि मॉडेल युलिया वंतूरनेही कमेंट बॉक्समध्ये फायरचे इमोजी पोस्ट केले आहेत. कोरिओग्राफर रेमो डिसूझा, अभिनेता वत्सल सेठ, अनिता हसनंदानी यांनीसुद्धा तसेच इमोजी पोस्ट केले.

चाहत्यांनीही सलमानच्या पोस्टवर विविध कमेंट्स केले आहेत. एका युजरने लिहिलं, ‘भाईजान तू एकटा नाहीस, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. चंद्र एकटाच असतो परंतु संपूर्ण जग त्याच्या प्रकाशाने तेजस्वी आहे.’ तर सलमानच्या फिटनेसवरूनही अनेकांनी कमेंट्स केले आहेत.

Follow Us
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...