सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन! अभिजीत दिपकेंचा व्हिडिओ चर्चेत; ज्ञानेश कुमारांना पुन्हा लक्ष्य, काय घडलं?
Abhijeet Dipke Video: आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. यानंतर अभिजीत दिपकेंनी एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीतील एसईएम न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी आश्वासन दिले आहे की, जोपर्यंत जंतर मंतरला आंदोलनाच्या ठिकाणांच्या यादीतून वगळले जात नाही, तोपर्यंत तेथे कोणत्याही आंदोलनाचे आवाहन केले जाणार नाही. यानंतर अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातून पुन्हा ज्ञानेश कुमारांवर निशाणा साधला आहे.
आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. सौरभ तुरुंग क्रमांक २ मध्ये, तर आशुतोष तुरुंग क्रमांक ४ मध्ये होते. दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला नाही. आशुतोष रांका यांनी गाडीत बसताना फक्त ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशी घोषणा दिली. अभिजीत दीपकेंनी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या सुटकेनंतर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, “जर निर्भयतेला चेहरा असता तर.” यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
अभिजीत दीपके यांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांचा भारत माता की जय म्हणत आणि सीईसी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर आता चर्चांना उधाण आले आहे. याआधी एसईएम न्यायालयाने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचा आदेश जारी केला. एसईएम न्यायालयाने आपल्या आदेशात दोन्ही सीजेपी नेत्यांना एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे.
एसईएम न्यायालयाच्या आदेशात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सौरव आणि आशुतोष यांनी म्हटले आहे, आम्ही शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्याची आमची वचनबद्धता आणि आश्वासन पुन्हा एकदा व्यक्त करतो. आम्ही विशेषतः हे स्पष्ट करतो की, जोपर्यंत कायद्यानुसार जंतर मंतरला आंदोलनाचे ठिकाण म्हणून पुन्हा अधिसूचित केले जात नाही, तोपर्यंत आम्ही तिथे कोणत्याही आंदोलनाचे आवाहन करणार नाही. आम्ही हे देखील पुन्हा स्पष्ट करतो की, कोणतेही आंदोलन संविधानाच्या चौकटीत राहूनच केले जाईल.
