AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!

Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!

| Updated on: Jul 19, 2026 | 8:11 PM
Share

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवणारे सरकार सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. दरम्यान, सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते घटनास्थळावरून रवाना झाले. मात्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आंदोलक शिवाजी पार्क मैदान सोडण्यास तयार नसल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांना शांततेत मैदान रिकामे करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सभा पार पडली. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 21 व्या दिवशी स्थगित करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आंदोलनाची धुरा अभिजित दीपके यांनी स्वीकारली असून, त्यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला विविध विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून, शिवसेना (ठाकरे गट) देखील सक्रियपणे सहभागी झाली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवणारे सरकार सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. दरम्यान, सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते घटनास्थळावरून रवाना झाले. मात्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आंदोलक शिवाजी पार्क मैदान सोडण्यास तयार नसल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांना शांततेत मैदान रिकामे करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. आंदोलकांची गर्दी आणि वाढलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे परिसरात काही काळ धावपळीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, दिल्लीतील आंदोलन आणि त्याला मिळणारा वाढता राजकीय पाठिंबा यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 08:11 PM

Follow Us