AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : जंतर-मंतरवर पोहोचले CM थलपती विजय? कारजवळ तरुणांचा गराडा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Fact Check : दिल्लीच्या जंतर-मंतरवर आज सीजेपीतं आंदोलन आहे. या आंदोलनस्थळी मुख्यमंत्री विजय पोहोचल्याचा दावा केला जात आहे. परंतु हा दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे.

Fact Check : जंतर-मंतरवर पोहोचले CM थलपती विजय? कारजवळ तरुणांचा गराडा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
| Updated on: Jul 20, 2026 | 9:26 AM
Share

दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी हजारो लोक जमू लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दिल्लीतील आंदोलनस्थळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनीही भेट दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री विजय हे एका कारमध्ये आहेत. त्यांच्या कारजवळ तरुणाचा गराडा पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.

थलपती विजय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून थलपती विजय यांनी आंदोलनाला समर्थन दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओविषयी महत्वाची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, ‘सोशल मीडियावर मुख्यमंत्री थलपती विजय यांचा हा व्हिडिओ खोटा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री थलपती विजय हे रात्री आंदोलनस्थळी गेले नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

एका महिन्यापासून सुरू आहे सीजेपीचं आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीचं 20 जूनपासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी जंतर-मंतरवर पोहोचून पाठिंबा दिला आहे.

थलापति विजय पहुंचे जंतर-मंतर, दिल्ली | छात्रों के आंदोलन को मिला बड़ा समर्थन?

Really ?

𝗧𝗵𝗮𝗹𝗮𝗽𝗮𝘁𝗵𝘆 𝗩𝗶𝗷𝗮𝘆 | 𝗝𝗮𝗻𝘁𝗮𝗿 𝗠𝗮𝗻𝘁𝗮𝗿 | 𝗗𝗲𝗹𝗵𝗶 | 𝗖𝗝𝗣 𝗦𝘂𝗽𝗽𝗼𝗿𝘁#cockroachjantaparty #CJP #ThalapathyVijay #Vijay #JantarMantar #Delhi pic.twitter.com/ZbaUeeK4Ky

— VINI 💞 (@_Attitude_Vini) July 19, 2026

आज संसदेवर मोर्चा

कॉकरोच जनता पक्षाने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यात आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. त्यांचं रुग्णालयातूनही उपोषण सुरू असल्याची माहिती मिळतेय. त्यांची पत्नी गितांजली यांनी आज घोषणा केली आहे की, संसदेत विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणी आवाज उचलल्यास सोनम हे उपोषण सोडतील’.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी